Jump to content

मंगळ (ज्योतिष)

मंगळ हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. मंगळाला चवथी, सातवी आणि आठवी दृष्टी असते. मंगळ हा पापग्रह आहे. १, ४, ७, ८ अथवा १२ व्या स्थानी मंगळ स्वराशिवा अथवा उच्च राशिचा मंगळ असेल तर तो अपवादात्मक ठरतो. तसेच कर्क, सिंह राशीना मंगळ राजयोगकारक ग्रह ठरतो. त्यामुळे कर्क अथवा सिंह लग्नाच्या कुंडलीत मंगळ राजयोगकारक ग्रह ठरतो. ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • अनुकूल भाव : तृतीय, षष्ठ, दशम, एकादश.
  • प्रतिकूल भाव : द्वितीय, अष्टम, द्वादश;
  • बाधस्थान : सप्तम स्थान;
  • अनुकूल राशी : मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक, धनु, मकर व मीन;
  • प्रतिकुल राशी: मिथुन, कन्या, तुला व कुंभ;
  • मित्र ग्रह : रवि, चंद्र, गुरू; शत्रु ग्रह: बुध;
  • सम ग्रह ; शुक्र व शनि.
  • नवीन ग्रहाशी शत्रू-मैत्री : हर्षल ( प्रजापती ) मंगळाचा शत्रू, नेपच्यून ( वरुण )
  • मंगळाशी सम, प्लुटो ( रुद्र ) मंगळाचा मित्र.
  • मूल त्रिकोण राशी - मेष,
  • मूल त्रिकोण राश्यंश ० ते १२ अंश,
  • स्वराशीचे अंश १३ ते ३० अंश;
  • उच्च राशी :- मकर उच्चांश २८ अंश ;
  • नीच राशी - कर्क, नीचांश २८ अंश;
  • मध्यम गती २३ कला व ३० विकला दररोज,
  • संख्या - ९,
  • देवता- कर्तिकेय;
  • अधिकार- सेनापती;
  • दर्शकत्व - शारीरिक बल;
  • शरीर वर्ण- तांबूस;गौर वर्ण;
  • शरीरांगर्गत धातू - मज्जा;
  • तत्त्व अग्नी; विषय- नेत्रांनी ग्रहण होणारा व ज्ञान होणारा असा रुपविषय;
  • कर्मेन्द्रिय - हात;
  • ज्ञानेन्द्रिय - नेत्र,
  • त्रिदोषांपैकी दोष - पित्त,
  • त्रिगुणापैकी गुण- तमोगुण,
  • लिंग पुरुष;
  • रंग- लालभडक,
  • द्र्व्य- सुवर्ण; धातू लोखंड.
  • निवासस्थान - अग्निस्थान - स्वयंपाकघर;
  • दिशा - दक्षिण;
  • जाती क्षत्रिय;
  • रत्न - पोवळे;
  • रस - कडू,
  • ऋतू - ग्रीष्म,
  • वय - बाल ४ वर्षेपर्यंत;
  • दृष्टी - ऊर्ध्व;
  • उदय - पृष्ठोदय;
  • स्थलकारकत्व- पर्वत, अरण्ये, किल्ले,
  • भाग्योदय वर्ष २८ वे.

जन्म पत्रिकेतील मंगळ दो़ष

पत्रिकेत मंगळ ग्रह हा प्रथम स्थानी (तनु स्थानी), चतुर्थ स्थानी (सुख स्थानी), सप्तम स्थानी (विवाह स्थानी ), अष्टम स्थानी (मृत्यू स्थानी ) किंवा द्वादश स्थानात (शैय्या सुख स्थानी ) असेल तर ती पत्रिका मंगळी असते. ज्या लोकांना मंगळदोष असतो अशा लोकांचा स्वभाव हा तापट, हट्टी, भांडकुदळ असतो, असे फलज्योतिष सांगते. ज्याच्या जन्मपत्रिकेतील मंगळ अशुभ स्थानी असेल त्यांनी पत्रिकेत असाच दोष असणारा जोडीदार शोधून लग्न करावे असा ज्योतिष्यांचा सल्ला असतो.

मंगळ राहु सोबत युतीत असता अतिशय क्रुर असा अंगारक योग तयार होतो. हा योग व्यक्तीला अतिशय क्रुर क्रोधी बनवतो मंगळाच्या पराक्रमाला गुन्हेगारी स्वरूप देते. शुभ ग्रहांची द्रुष्टी नसल्यास अत्यंत घातक परीणाम दिसून येतात.

मंगळाचे उदयास्त

मंगळ सूर्याभोवती फिरताना सूर्यामागे गेल्याने आकाशात दिसत नाही, अशावेळी मंगळाचा अस्त झाला असे म्हणतात. काही दिवसांनी तो परत दिसायला लागला की त्याचा उदय झाला असे म्हणायची पद्धत आहे. पंचांगात हे उदयास्त दिलेले असतात. उदा०

२०१९ या इसवी सन वर्षात १५ जुलै ते १४ ऑक्टोबर या ९१ दिवसांच्या काळात त्याचा अस्त झाल्याने मंगळ आकाशात दिसला नाही.

२०२१ सालचे मंगळाचे राशी परिवर्तन

सन २०२१मध्ये मंगल सात वेळा आपली राशी बदलेल. २२ फेब्रुवारीला तो मेष राशीतून वृषभ राशीत जाईल आणि १४ एप्रिल, २ जून, २० जुलै, ६ सप्टेंबर, २२ ऑक्टोबर आणि ५ डिसेंबर २०२१पर्यंत मिथुन-कर्क-सिंह-कन्या-तूळ-वृश्चिक असा प्रवास करेल.

वक्री मंगळ

इतर ग्रहांप्रमाणे मंगळही कधीकधी वक्री होतो,. म्हणजे आकाशातून फिरताना मागे सरकल्यासारखा भासतो. हा सूर्यापासून १३५0 दूर गेल्यावर वक्री होतो. मंगल ज्या राशीत वक्री होतो, तेथे तो ६० ते ८० दिवस राहून पुढल्या राशीत जातो.

२०१३, २०१५, २०१७ व २०१९ साली मंगळ वक्री नव्हता. २०१८ साली तो ६२ दिवस (२७ जून ते २७ ऑगस्ट) वक्री होता. २०२० साली तो १० सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर (६६ दिवस) या काळात वक्री होता. मंगळ वक्री नसल्यास एका कॅलेंडर वर्षात ८ राशी फिरतो, वक्री असल्यास ६. असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत मंगळाला सूर्य प्रदक्षिणेस ६८७ दिवसच लागतात. उदा०

३०-११-२०१७ रोजी मंगळाने तूळ राशी प्रवेश केला.
१७ जानेवारी २०१८ रोजी वृश्चिक राशीत
७ मार्च धनू रास
२ मे मकर
२७ जून ते २७ ऑगस्ट मकर राशीत वक्री म्हणून मुक्काम.. ६ नोव्हेंबर कुंभ
२३ नोव्हेंबर मीन
६ फेब्रुवारी २०१९ रोजी मेष राशीत प्रवेश केला
२२ मार्च वृषभ
७ मे मिथुन
२२ जून कर्क
९ ऑगस्ट सिंह
२५ सप्टेंबर २०१९ ते ९ नोव्हेंबर २०१९ कन्या राशीत मुक्काम. नंतर १० नोव्हेंबरला तूळ राशीत प्रवेश. १८ ऑक्टोबरला ६८७ दिवस पूर्ण झाले.

हिंदू धर्मातील नवग्रह स्तोत्रात असा श्लोक आहे की,

धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् I
कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणाम्यहम् II

याचा अर्थ असा की, "मंगळ हा ग्रह पृथ्वीपासून निर्माण झाला, त्याला विजेसारखी अंगकांती आहे, त्याने हातात शक्ती हे शस्त्र धारण केले आहे, अशा कुमार स्वरूप मंगळाला मी नमस्कार करतो."

हे सुद्धा पहा