Jump to content

मंगला गोडबोले

मंगला गोडबोले
जन्म २ फेब्रुवारी, १९४९
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकार विनोदी कथा, ललित, वैचारिक

मंगला गोडबोले (जन्म : २ फेब्रुवारी, १९४९) या सामाजिक जाणीवेने लिहिणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. ह्यांच्या अनेक कथावजा लेख मराठी वृत्तपत्र ’लोकसत्ता’त साप्ताहिक सदरे म्हणून प्रकाशित झाले. इ.स. २००० सालच्या सदराचे नाव ’अशी घरं अशी माणसं’ हे, २००९साली ’पण बोलणार आहे’ हे आणि २०१३सालच्या साप्ताहिक सदराचे नाव ’जुनी विटी नवे राज्य’ हे होते. हे साप्ताहिक लेख पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले.

मंगला गोडबोले यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी बहुसंख्य विनोदी साहित्य ह्या स्वरूपातली आहेत. त्यातून निवडलेल्या ३५ लेख, कथा आणि एक प्रहसन अशा लेखनाने 'निवडक मंगला गोडबोले' हे पुस्तक तयार झाले आहे. डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांनी त्याचे संपादन केले आहे.

मंगला गोडबोले यांचे प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशक प्रकाशन वर्ष (इ.स.)
अमृतसिद्धीदोन खंडी समीक्षा (सहलेखक - स.ह. देशपांडे
अल्बमललित
अशी घरं, अशी माणसंव्यक्तिचित्रणअस्मिता प्रकाशन
अळवावरचे थेंबकादंबरीउन्मेष प्रकाशन
आई, तुझ्याच ठायीललित
आडवळणललितउत्कर्ष प्रकाशन
... आणि मीललित
आरंभललित
आरशात डोकावण्यापूर्वी, धोक्यात हरवणारी वाटललित
ऋतू हिरवटविनोदीउत्कर्ष प्रकाशन
कधी बहर कधी शिशिरकरमणूकपर, विनोदी, कादंबरीनवचैतन्य प्रकाशन
काय तुझ्या मनातस्त्री-आरोग्यविषयक
कुंपण आणि आकाशस्त्री विषयकनाविन्य प्रकाशन
कोपराकथासंग्रह
खुणेची जागाकथासंग्रह
गाठ आहे लग्नाची/शीवैचारिक
गिरकीकथासंग्रह
गुंडाबळीकथासंग्रह
गोंदणकादंबरी
जिथली वस्तू तिथेविनोदी कथासंग्रह
जुनी विटी नवे राज्यललित
झुळूकललित
तदेव लग्नम्ललित
दत्तक घेण्यापूर्वीवैचारिक
दामलेमामाचरित्र
नवी झुळूकललित
निवडक मंगला गोडबोलेसंपादित कथासंग्रह
नीरू आणि नेहाकथासंग्रह
पण बोलणार आहेललित
पर्स हरविलेली बाईविनोदी
पुन्हा झुळूकललित
पुरुषोत्तमाय नमः
पु.ल. चांदणे स्मरणाचे
पेज थ्रीकथासंग्रह
पोटाचा प्रश्नविनोदी कथासंग्रहमेनका प्रकाशन१९९७
प्रवेशकथासंग्रह
बाकीकथासंग्रह
ब्रह्मवाक्यविनोदी कथासंग्रह
भलं बुरंविनोदी कथासंग्रह
मध्यकथासंग्रह
माई (आशा शेठ)चरित्र२०१५
मुरलीकथासंग्रह२०१९
वयात येतानाआरोग्यविषयक
वार्धक्य विचारआरोग्यविषयक
शुभेच्छाललित
सती ते सरोगसीमाहितीपरभारतातील महिला कायद्याची वाटचाल
सह-वास हा सुखाचाविनोदी कथासंग्रह
सही रे सहीबालसाहित्य
सात, आठ ते सातावर आठविनोदी
सुखी स्त्रीची साडीविनोदी
सुनीताबाईव्यक्तिचित्रण
सुवर्णमुद्राललित
सोबतकथासंग्रह
हे करून पाहू नकाविनोदी

पुरस्कार

  • मंगला गोडबोले यांच्या ऋ्तु हिरवट या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा विनोदी वाङ्‌मयासाठीचा २०१४ सालचा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार मिळाला. (६-२-२०१६ची बातमी)