मंकी हिल रेल्वे केबिन
मंकी हिल मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | रायगड जिल्हा |
मार्ग | मुंबई-चेन्नई मार्ग |
फलाट | ० |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | MHLC |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | मध्य रेल्वे |
मंकी हिल रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाच्या आसपास मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या माकडांमुळे याचे नाव मंकी हिल ठेवण्यात आले.
बोर घाटात असलेल्या या स्थानकावर मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या ब्रेक तपासणीसाठी थांबतात. गाडीचे ब्रेक निकामी झाले असतील तर गाडी थांबविण्यासाठी टेकडीवर चढवून तेथे मुद्दाम रुळांवरून घसरविण्याची सोय येथून जवळ आहे.
येथे प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही.