Jump to content

भोरवाडी

  ?भोरवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरनगर
जिल्हाअहमदनगर जिल्हा
लोकसंख्या१,८६९ (२०११)
भाषामराठी
सरपंचभास्कर भोर
बोलीभाषामराठी
कोड
पिन कोड
• आरटीओ कोड

• 414005
• एमएच/ 16

भोरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील एक गाव आहे.

स्थानिक माहिती

भोरवाडी हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील एक आदर्श ग्रामपंचायत क्षेत्र आहे. या गावाची निसर्ग सौंदर्याने भरलेली वादळांनी न्हालेली भूमि, शांत वातावरण आणि पारंपारिक परंपरांचा संगम यामुळे भोरवाडी एक अनोखी ओळख प्राप्त करते.

                            भोरवाडी गाव अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्या पण सुंदर गावांपैकी एक आहे. या गावाची लोकसंख्या  २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 1,869 आहे.  भोरवाडी या गावांमध्ये भोर, खैरे, गायखे, , ठाणगे, जासुद, पानसरे, जाधव, घुले, गायकवाड , शेळके,बोठे, लोमटे,उमाप या आडनावची  प्रतिष्ठित ग्रामस्थ राहतात .गावाच्या शेजारील गावांमध्ये अकोळनेर, चास कामरगाव, रायतळे आणि अस्तगाव यांचा समावेश होतो.

भोरवाडीच्या वाळुंबा नदीच्या किनाऱ्यावर गाव स्थित आहे, ज्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य अधिक खुलते. गावात विविध वस्त्यांची नावे जसे की सपरवाडी, पिपळपाटी, खडकवाडी, माळवाडी, वडाचामळा, वाघवाडी आणि पद्मावती आहेत, ज्यामुळे गावाच्या विविध भागात असलेल्या पारंपारिक आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते.

हवामान

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन

भोरवाडी गावचा मुख्य व्यवसाय शेती आहे.याचबरोबर भोरवाडी गाव कुक्कुटपालन व्यवसाय बद्दल पंचक्रोशीतील गावांमध्ये प्रसिद्ध आहे.गावातील लोक मनाने अत्यंत प्रेमळ व माणुसकीला जपणारे आहेत .गावाच्या मातीशी घट्ट असणारे नाते आणि आपल्या गावाच्या संस्कृतीवर गावकऱ्यांचा सार्थ अभिमान आहे.मनाने अत्यंत साधी आणि भोळी-भाबडी लोक "माझं गाव माझा अभिमान"या या ब्रीद वाक्याला धरून गावच्या विकासासाठी नेहमीच तत्पर असतात. मोठी-मोठी शहरे आजही ग्रामीण जीवनशैली चा हात धरू शकत नाही हे भोरवाडी गावाला पाहुन कळते.प्रकृतीच्या सौंदर्यात नटलेले गाव म्हणजे "भोरवाडी".

सांस्कृतिक वारसा

भोरवाडीच्या सांस्कृतिक परंपरा अत्यंत समृद्ध आहेत. गावाचे ग्रामदैवत रामभक्त हनुमान असून,देवाची पूजा आणि उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जातात.

   भोरवाडी गावातील प्रमुख उत्सव म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह या उत्सवात, विशेषतः हनुमान मंदिर व तेथील आजुबाजूच्या परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येते, मंदिरात पारायण, हरिपाठ, किर्तन केले जाते. हरिनामाच्या जयघोषाने भोरवाडी गाव भक्तीमय होवून जाते.

या उत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे: १)अखंड हरिनाम सप्ताह: आषाढी एकादशीच्याआठदिवस अगोदर हनुमान मंदिरात हा सप्ताह उभा राहतो.हा सप्ताह भक्तिभावाने सर्वपरीयांनक जपला जातो.

२)कावड यात्रा: गावातील तरुण युवक पुणतांब्यावरून कावडी घेऊन गंगा गोदावरीचे पाणी मारुतीला अर्पण करण्यासाठी घेऊन येतात. कावड मिरवणुकी नंतर गंगेच्या अमृतजलाचा अभिषेक होतो.

३)महाप्रसाद: उत्सवाच्या निमित्ताने, विशेष पुरणपोळीचा महाप्रसाद तयार करून, सर्व गावकऱ्यांना वितरित केला जातो. हा प्रसाद सर्व भक्तांना दिला जातो आणि यामुळे उत्सवाची पर्वणी अधिक आनंददायी बनते.

या उत्सवांमध्ये गावातील सर्व लोक उत्साहपूर्वक भाग घेतात आणि धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांची मनोभावे पूजा केली जाते.

शैक्षणिक सुविधा

प्राथमिक शाळा:भोरवाडी गावात प्राथमिक शाळा उपलब्ध आहे. इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण येथे दिले जाते. मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही शाळा महत्वपूर्ण आहे. हायस्कूल:गावात हायस्कूल देखील आहे. इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण येथे दिले जाते. मुलांच्या माध्यमिक शिक्षणासाठी ही सुविधा उपलब्ध आहे. अंगणवाडी:लहान मुलांसाठी अंगणवाडीची सुविधा उपलब्ध आहे. येथे लहान मुलांच्या सुरुवातीच्या शिक्षणाच्या गरजा पूर्ण केल्या जातात. अंगणवाडीमध्ये मुलांच्या पोषण आणि शिक्षणाचा देखील विचार केला जातो. भोरवाडी गावातील या शैक्षणिक सुविधांमुळे गावातील मुलांना शिक्षणाच्या विविध स्तरांवर संधी मिळते आणि त्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळते.

जवळपासची गावे

अकोळनेर,चास, कामरगाव,रायतळे,अस्तगाव,सारोळा,घोसपुरी,केडगाव,पारनेर,ही गावे भोरवाडीच्या जवळपास स्थित आहेत आणि त्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंध भोरवाडी गावाशी जोडलेले आहेत.

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate