Jump to content

भोपाळ−बिलासपूर एक्सप्रेस

भोपाळ ते बिलासपूर दरम्यान धावणारी ही वेगवान प्रवासी रेल्वे आहे.[] मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ शहरातील भोपाळ जंकशन रेल्वे स्थानक ते छत्तीसगड मधील बिलासपूर दरम्यान ही रेल्वे धावते.

क्रमांक आणि पारिभाषित नामकरण

भोपाळ ते छत्तीसगड मधील बिलासपूर दरम्यान धावणारी गाडी १८२३५ या क्रमांकाची आहे आणि छत्तीसगडमधील बिलासपूर ते भोपाळ दरम्यान धावणारी गाडी १८२३६ या क्रमांकाची आहे. बिलासपूर हे आगमन आणि गंतव्य अशा दोन्ही वेळचे स्थानक असल्यामुळे ही रेल्वे बिलासपूर या नावाने परिचित आहे.

आगमन आणि गंतव्य विषयक तपशील

दोन्ही स्थानकाकडून रोज ही रेल्वे धावते. भोपाळ जंक्शनवरून रोज सकाळी ८ वाजता १८२३५ ही रेल्वे निघते आणि परतीची गाडी १७.३० वाजता भोपाळमधील भोपाळ निशातपुरा रेल्वे स्थानकापर्यंत जाते.[] []

मार्ग आणि स्थानके

ही रेल्वे बिना – कठनी या रेल्वे मार्गावर ६३ स्थानकांपेक्षा जास्त स्थानकांवरून प्रवास करते. उपनगरी तसेच मुख्य शहरातील रेल्वे स्थानकांवर या रेल्वेचा थांबा आहे. महत्त्वाची स्थानके खालीलप्रमाणे आहेत.[] [] []

  • भेापाळ जंक्शन
  • भोपाळ निशातपुरा
  • भोपाळ सुखसेवानगर
  • भोपाळ देवानगंज
  • सलामतपुर
  • सांची
  • विदिशा
  • गुलाबगंज
  • कल्हार
  • मंडी बमोरा
  • बिना जंक्शन
  • मालखेडी
  • खुराई बघेारा
  • खुराई
  • खुराई सुमरेरी
  • जेरूवाखेडा
  • ईसारवारा
  • सुमेर
  • नैरोली
  • सौगोर रतोना
  • सौगोर
  • सौगोर मकरोनिआ
  • सौगोर गणेशगंज
  • पथारीआ
  • लिढोरा खुर्द
  • गिरवार
  • अस्लाना
  • डामोह
  • डामोह बदाकपूर
  • कुंडालपुर
  • सलैया
  • सागोनी
  • कठनी
  • शाहडोल
  • नौरोजाबाद
  • बिरसिंगपूर
  • उमारीआ
  • अनुपूर जंक्शन
  • भंवर टोंक
  • रूपाउंड
  • बिलासपूर जंक्शन

डब्याची रचना

या रेल्वेगाडीला एकूण १९ डबे जोडलेले आहेत. त्यामध्ये १ वातानूकूलित व्दितीयस्तर , १ वातानूकूलित तृतीयस्तर, १ खूर्ची यान, ५ शयनयान, ८ सामान्य, १ महिलांसाठी विशेष , १ सामान वाहतूकीसाठी अशा डब्यांचा समावेश आहे.

सरासरी वेग आणि पुनरावृत्ती

१८२३५ भोपाळ – बिलासपूर एक्स्रप्रेस भोपाळ जंक्शन ते खुराई रेल्वे स्थानकांपर्यंत सरासरी ५४ कि.मी प्रति तास या वेगाने धावते. नंतर खुराई रेल्वे स्थानकापासून छत्तीसगड मधील बिलासपूर पर्यंत तीचा सरासरी वेग ४0 कि.मी प्रति तास इतका कमी होतो.

१८२३६ बिलासपूर – भोपाळ एक्सप्रेस ही एकमेव प्रवासी गाडी आहे जी भेापाळपर्यंत प्रत्येक स्थानकांवर सरासरी ३४ किमी प्रति तास या वेगाने धावते.[]

स्लीप सेवा

  • १८२२९/१८२३० भोपाळ – चिरमिरी प्रवासी

भोपाळ ते बिलासपूर व परत बिलासपूर ते भोपाळ दरम्यान इतर रेल्वे

  • महानंदी एक्स्रप्रेस (रदद)
  • नर्मदा एक्सप्रेस
  • अमरकंटक एक्सप्रेस
  • गोंडवाना एक्सप्रेस
  • छत्तीसगड एक्सप्रेस

भोपाळ ते बिलासपूर दरम्यान धावणा-या गाडया

  • बिलासपूर राजधानी
  • गोंडवाना एक्सप्रेस
  • जोधपूर- पूरी एक्सप्रेस
  • बलसाढ पूरी सूपर फास्ट एक्सप्रेस

बिलासपूर ते भोपाळ दरम्यान धावणा-या गाडया

  • गोंडवाना एक्सप्रेस
  • नर्मदा एक्सप्रेस
  • बिलासपूर – नवी [दिल्ली]] राज एक्सप्रेस
  • छत्तीसगड एक्सप्रेस

दुर्घटना

७ ऑगस्ट २०१3 रोजी बिलासपूर जंक्शन पासून १०० कि.मी. अंतरावर असलेल्या सरबेहारा भागामध्ये मालगाडीचे ब्रेक निकामी झाल्यामुळे २७ मालगाडीचे डबे रुळावरून घसरून झालेल्या दुर्घटनेमुळे हा मार्ग काही काळापुरता बंद ठेवावा लागला होता.

संदर्भ व नोंदी

  1. ^ भोपाळ
  2. ^ ""भारतीय प्रवासी आरक्षण चौकशी विभागामध्ये स्वागत आहे."" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "विलासपुर एक्सप्रेस".
  4. ^ ""बिलासपूर ते भोपाळ एक्सप्रेस पेसेंजेर टाइम टेबल"" (PDF) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ रन्निंग स्टेटस
  6. ^ "महत्त्वाची स्थानके". 2014-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-12-30 रोजी पाहिले.
  7. ^ बिलासपूर – भोपाळ एक्सप्रेस