भोईर
भोईर हे एक मराठी आडनाव आहे. महिकावतीच्या (माहिमच्या) बखरीत भोईर कुळाचा उल्लेख आला आहे, ्यामध्ये मुखें इतर जात म्हणजेच सोमवंशी क्षत्रियांची मुख्य शाखा व इतर शाखा त्यामधील इतर शाखा म्हणजेच बारा खुमें ज्ञात, त्यांत कवळी , दरणे, भोईर, पड्या, माळी, घरठी, भटयारी, सांखळे, उभार, नाईते, गाण, विर ही कुळे असुन यांस गोत्रे देवनाम. तसेच ह्या कुळांपैकी कवळी, भोईर आणि माळी ह्या कुळांतील सोमवंशी क्षत्रियांचे राज्य यवनी आक्रमकांनी बुडविल्यामुळे ह्या क्षत्रियांनी
शस्त्र सोडुन वाडीमे केचा उदिम धरिला , पुढे हेच बारा खुमें ज्ञातीतील सोमवंशी क्षत्रिय त्यांच्या मिठ ,शेती ,वाडी मळे पिकवण्याच्या धंद्यामुळे आगरी म्हणून ओळखले जाऊ लागले.
सोमवंशाचा बिंबराजा मुंगी पैठणला येण्यापुर्वी उत्तर व दक्षिण कोकणात शिलाहार साम्राज्याचे राज्य होते हे शिलाहार प्रचंड मोठे शिवभक्त होते, शिलाहार साम्राज्याच्या पूर्वी पासून उरण गावाच्या काही अंतरावर आवरे व पिरकोन ही गावे होती , ठाणे येथिल उत्खननात सापडलेल्या ताम्रपटात ह्या गावांचा उल्लेख सापडतो ह्यात जोशी नावांच्या पंधरा ब्राह्मणांना ही गावे दान करण्यात आली असा उल्लेख आहे त्यापुर्वी शिलाहार राजाने शिवाचे पुजन केले, ह्या शिलाहार राजाच्या साम्राज्यात हे आगरी ज्ञातीतले लोक राहत असत तर पाताळगंगा नदीच्या दक्षिणेला व अंबा नदीच्या उत्तरेला आगरी ज्ञातीतले भोईरकुटुंब राहत असे त्यांचे कुळदैवत जेजुरीचे खंडोबा देव म्हणजे मार्तंड भैरव व भैरीभवानी तर कूल स्वामिनी तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी व महिषासुरमर्दिनी ह्या होय हे कुटुंब १८६० सालापुर्वी तत्कालीन ठाणे जिल्हात राहण्यासाठी आले , तत्कालीन काळामध्ये त्यांनी जमिन क्रय करण्यासाठी सुरुवात केली, कुळ कायद्यात यांना जमिनी मिळाल्या नाहीत. हे कुटुंब गाई दूध दुभते व शेतीत रमलं होत.ते ते पुर्वी तत्कालीन कुलाबा जिल्ह्यात राहत होते येथिल जमिनीत सोडून ह्या कुटुंबाची एक पिढी निघून गेली व ईतर पिढ्या कायमस्वरूपी वास्तव्यास राहिल्या.
सुमंती राजा शेषवंशी त्याचे कूळ, उपानाम ह्माडिक, माल्यवंत ऋषि गोत्र, कुळदैवत कात्यायनी, खेचरी मुद्रा, पंचाक्षरी मंत्र, तक्तगादी बागलकोट, निळी गादी, निळे नि- शाण, निळा वारू, विवाह (लग्न) कार्यास देवक कळंबाचें अथवा पिंपळाचे. विजयादशमीस (दसचास ) शस्त्र कट्यार किंवा तलवार पूजणे. यांची कुळे येणेप्रमाणेः- ह्माडिक, गवळी, भोगले, भोईर, ठाकूर ही कुठे मिळोन ह्माडिक. सोवळें शुभ्र वस्त्र परिधान करणे, यज्ञोपवीत घालणे, गोग्रास देणे, अतीत अभ्यागत पाळणे, पुराण श्रवण करणे,असे झाडीक जाणावे.
स्वैर अन्वय
शेष(नाग)वंशीय राजा सुमंती याने ह्माडिक/महाडिक या कुळाचा पाया रचला आहे. ह्माडिक/महाडिक कुळाचे गोत्र माल्यवंत आहे. ह्माडिक/महाडिक कुळाची कुलदेवी कात्यायनी म्हणजेच सिंहारूढ महिषासुरमर्दिनी आहे. ह्माडिक/महाडिक यांची गादी(सत्ता) बागलकोट, कर्नाटक येथे आहे. यांच्या सिंहासानाच्या गादीचा रंग नीळा आहे. त्यांच्या झेंड्याचा रंग निळा असून त्यावर खेचरी मुद्रा असलेल्या घोड्याचे चित्र आहे. ह्माडिक/महाडिक या कुळाचा यल्गार(एल्गार) पंचाक्षरी मंत्र आहे. विवाह(लग्न)कार्याला ह्माडिक/महाडिक कुळाचे कळंबाचे किंवा पिंपळाचे झाड किंवा फांदीचे पूजन करतात. विजयादशमीला या कुळाने तलवार आणि कट्यारीची पूजा करावी. ह्माडिक/महाडिक या कुळात महाडिक, गवळी, ठाकूर(टागोर), भोगले, भोईर हे येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे शुभ्र(पांढरे) कपडे परिधान करावे. जानवे घालावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.