भेळपुरी
भेळपुरी हा भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील हा एक खारट,आंबट,गोड,तिखट एकत्रित करून बनविलेला चवदार उपहार आहे. हा गप्पा मारता मारता खाण्यासाठीही उपयोगात आणला जातो. हा चाट चा एक प्रकार आहे. हे बनविण्यासाठी जाडे तांदूळ, भाज्या आणि सॉस यांचा वापर करतात.[१]
भेळपुरी मुंबईचे गिरगाव, जुहू, या चौपाटीवर नियमित मिळते. मुंबईतील सर्व गल्लीबोळातून याच्या फिरत्या गाड्या पाहावयास मिळतात. हा उपहार रस्त्यावर खाण्याचाच आहे हे विचार ग्रहित धरलेले आहेत. भेळपुरीचा प्रसार अगदी भारतातील कानाकोपऱ्यात झालेला आहे. भारताचे विविध प्रदेशात त्या त्या हवामानानुसार किंवा परिस्थितीनुसार भेळपुरी बनविण्यासाठी तेथील उपलब्ध पदार्थांचा वापर केला जातो. भेळपुरीचे मूळं स्वरूप भडंग आहे. भडंग हा पच्छीम महाराष्ट्रातील उत्तम असा तेलकट, आंबट, गोड, तिखट, चवीचा पदार्थ आहे. भडंगचा वापर करून कोरडी भेळपुरी तयार केली जाते. कोलकत्ता मध्ये भेळपुरीला झालमुरी म्हणतात. तेथे ही तेल वापरून जाडे भातापासून बनवितात. मैसूर मध्ये भेळपुरीला चुरुमुरी आणि बंगलोर मध्ये चुरमुरी म्हणतात.[२] कोरडी भेळपुरी जी भडंग म्हणून प्रसिद्ध आहे तिच्यावर कांदा, लिंबू रस, कोथिंबीर, यांचा दिमाखदार थर पसरवून लिंबूरस पिळून ती खावयास देतात.
इतिहास
भेळपुरी कोठे आणि केव्हा बनविली याचा कोठेही उल्लेख नाही पण मुंबई आणि पूर्ण भारतभर गल्लो गल्ली मौज म्हणून मित्रा मंडळी एकत्र येऊन तसेच कुटुंबे चवदार भेळपुरीचा दिल खुश होऊन आस्वाद घेतात.
भेळपुरी बनविण्यासाठीचे पदार्थ
भेळपुरी बनविण्यासाठी साधारणपने जाडा भात, बेसन पिठापासून बनविलेले विविध आकाराचे नूडल्स, व बटाटा, कांदा, चाट मसाला, चटणी, आणि विविध प्रकारचे तळलेले मसाले यांचे मिश्रण वापरतात.[३]
गिऱ्हाइकाच्या सवयीनुसार नुसार आणि आदेशानुसार चाट मसाला, तिखट, यांचे प्रमाण वापरून भेळपुरी बनविली जाते. उत्तर भारतात शिजविलेल्या बटाट्याचे लहान लहान तुकडे करून वापर करतात. चाट साठी मुख्यता दोन प्रकारच्या चटणी असतात. त्यात एक म्हणजे गोडी असणारी तपकिरी रंगाची प्रसिद्धचटणी आणि दुसरी हिरव्या रंगाची तेलकट की जी हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरी पासून बनविलेली असते! यांचा वापर करतात.
विविधता
भेळपुरी बनविताना ते विविध प्रकारे बनविली जाते. त्यात भात पसरवून त्यावर आंबट - गोड आंब्याच्या बारीक बारीक चकत्या पसरवितात. शिवाय त्यावर कांदा, कोथिंबीर, लिंबू रस, बटाटा टोमॅटो, चाट मसाला यांची पेरणी असतेच.[४] कधी कधी हे सर्व मिश्रण लहानश्या पुरीवर पसरवून ती पुरी सहीसलामत मुखात जाईल अशा प्रकारे सर्व्ह केली जाते. किंवा गव्हाचे पिठापासून बनविलेल्या ब्रेडचाही वापर केला जातो.
भेळपुरीच्याच ज्या अनेक विविधता आहेत त्यांची नावे अनेक आहेत त्यात सेवपुरी, दहिपुरी, सेव पापडी चाट, चुरमुरी, यांचा समावेश होतो.
- सेवपुरी – भेळपुरीतील पदार्थाबरोबर सेव, पापडी असते.
- दहिपुरी – भेळपुरीतील पदार्थाबरोबर सेव, पापडी व चटकदार दही मिश्रण असते.
- सेव पापडी चाट – भेळपुरीतील पदार्थाबरोबर सेव, पापडी व वेगवेगळ्या तीन चटणी चाट असतात.
- चुरमुरी – भेळपुरीतील पदार्थाबरोबर कांद्याचे तुकडे, टोमॅटो, कोथिंबीर,मिरची पूड, यांचे मिश्रणात दोन तीन खोबरेल तेलाचे थेंब,कांही वेळा भाजलेले शेंगदाने ही मिसळतात.
खावयास देण्याची पद्दत
भेळपुरी साधारणपने कागदाचा गोलाकार किंवा कोण करून त्यात खावयास देतात. ती खाण्यासाठी जाड पेपरचा एक तुकडा देतात किंवा पापडी देतात. कधी कधी प्लेट मध्ये देऊन ती खाण्यासाठी पापडी देतात.
संदर्भ
- ^ "भेळ पुरी रेसिपी". ३१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "व्हॉट इज चुरमुरी". १८ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.
- ^ "हाऊ टू मेक भेळ पुरी - भेळ पुरी रेसिपी". ३१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "इझी ॲंड हेल्दी चाट रेसिपी". ३१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.