Jump to content

भूषण हर्षे

हिमाचल प्रदेश येथील पीरपंजाल शिखर रांगेतील इंद्रासन हे ६२२१ मीटर उंचीचे शिखर आहे. हे शिखर चढाईसाठी अत्यंत अवघड आहे. पण, हे शिखर सर करण्याची मोहीम गिरिप्रेमी या संस्थेच्या माध्यमातून भूषण हर्षे यांनी पहिल्यांदा १९ जून २०१५ला शिखर सर करण्यास सुरुवात झाली. पण, खराब हवामानामुळे कॅंप २ वरून संघाला परत फिरावे लागले.
यानंतर बर्फवृष्टी थांबल्यानंतर २७ जूनला या चौघा गिर्यारोहकांनी नेपाळहून आलेला नोर्पू शेर्पासह पुन्हा चढाईला सुरुवात केली. हिमालयातील बऱ्याचशा मोहिमांमध्ये शेर्पा किंवा स्थानिक लोक शिखराचा मार्ग खुला करतात आणि दोरखंडाच्या साहाय्याने तो सुरक्षित करतात. त्यानंतर मोहिमेचे सदस्य या मार्गावरून चढाई करतात. परंतु, या मोहिमेत गिरिप्रेमीच्या सदस्यांनी सर्वच्या सर्व मार्ग खुला केला.
‘या शिखराच्या चढाईची प्रत्यक्ष सुरुवात ४५०० मीटरपासून होते. तेथून पुढचा टप्पा खड्या चढणीचा व धोकादायक आहे. या चमूने दोन दिवसांत ३ हजार फुटाचा मार्ग संपूर्ण मार्ग दोरखंडाने सुरक्षित केला. दुसऱ्या प्रयत्नात चमूचे सभासद २७० मीटरपर्यंत पोहचले होते..
पण, पुन्हा वातावरण बिघडले आणि हिमप्रपात सुरू झाला. यात त्यांचा एक सहकारी काही वेळासाठी दिसेनासा झाला. या वेळी सर्वजण चांगलेच घाबरले.. हिमप्रपातीच्या तडाख्यात सापडतो, की काय असे त्यांना वाटू लागले होते. त्यामुळे त्यांनी आम्ही वेळीच परतण्याचा निर्णय घेतला. आता या चमूने ही अपुरी मोहीम पुढील वर्षी पूर्ण करण्याचे ठरविले आहे..[]

गिरिप्रेमी संस्था

गिरिप्रेमी संस्थेच्या १० गिर्यारोहकांनी १५ मे २०१९ रोजी कांचनगंगा शिखरावर यशस्वी चढाई करून भारतीय गिर्यारोहण इतिहासात नवा अध्याय जोडला आहे. खडतर आव्हानाचा सामना करत या गिर्यारोहकांनी पहाटे साडेपाच ते सहा या कालावधीत कांचनगंगा शिखरावर पाऊल ठेवले.
ही अभिमानस्पद कामगिरी करणाऱ्यांमध्ये भूषण हर्षे, आशिष माने, रुपेश खोपडे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ठोकळे, डॉ. सुमीत मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर, जितेंद्र गवारे यांचा समावेश होता. उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली गिरिप्रेमी संस्थेने सातवी अष्टहजारी मोहीम फत्ते केली. या पद्धतीचे यश संपादन करणारी गिरीप्रेमी ही एकमेव नागरी संस्था ठरली असून, झिरपे एकमेव मोहीम नेते ठरले आहेत.
गिरिप्रेमींच्या दहा गिर्यारोहकांसह जगभरातील २० गिर्यारोहक हे शिखर सर करत होते. यातील २१ गिर्यारोहकांना शिखर सर करण्यात यश आले. []

माऊंट कांचनगंगाविषयी

उंची : ८५८६ मीटर
- माऊंट एव्हरेस्ट आणि माऊंट "के २ 'नंतर उंचीनुसार जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर
- भारतातील सर्वांत उंच शिखर
- कांचनगंगेवर एकूण पाच शिखरे आहे. मुख्य शिखर ८५८६ मीटर, पश्‍चिम शिखर ८,५०५ मीटर, मध्य शिखर ८४८२ मीटर, दक्षिण शिखर ८४९४ मीटर, कांगबाचेन शिखर ७९०३ मीटर []
चढाईचे मार्ग
भारताकडून : कांचनगंगा झेमू ग्लेशियरच्या बाजूने (हा मार्ग सध्या बंद)
नेपाळकडून : यालुंग ग्लेशियर मार्गे (गिरिप्रेमींची चढाई याच मार्गाने) []

या मार्गातील आव्हाने

बेस कॅम्पची उंची : ५४७५ मीटर
कॅम्प 1 : अंदाजे ६ हजार मीटर
कॅम्प 2 : अंदाजे ६३०० मीटर
कॅम्प 3 : अंदाजे ६९०० मीटर
कॅम्प 4 : अंदाजे ७५०० ते ७७०० मीटर.[]

बाह्य दुवे

  1. https://maharashtratimes.indiatimes.com/sports/other-sports/bhushan-harshe[permanent dead link]
  2. http://www.zeemarathidisha.news/tag?tagname=Bhushan%20Harshe[permanent dead link]
  3. https://maharashtratimes.indiatimes.com/sports/other-sports[permanent dead link]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "सुदैवानेच आम्ही हिमप्रपातातून बचावलो". 2019-10-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "गिर्यारोहकांनी घडविला इतिहास". https://www.esakal.com. 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  3. ^ [read:https://www.esakal.com/pune/10-mountaineer-completed-kanchenjunga-everest-189101 "गिर्यारोहकांनी घडविला इतिहास; 'कांचनगंगा' केले सर"] Check |दुवा= value (सहाय्य). 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले.
  4. ^ [read:https://www.esakal.com/pune/10-mountaineer-completed-kanchenjunga-everest-189101 "गिर्यारोहकांनी घडविला इतिहास; 'कांचनजुंग' केले सर"] Check |दुवा= value (सहाय्य). 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "गिर्यारोहकांनी घडविला इतिहास". https://www.esakal.com. 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)