भूमिका कलम
भूमिका कलम (१ जुलै, १९७७ - इंदूर, मध्य प्रदेश - ) या एक भारतीय लेखिका आणि पत्रकार आहेत.[१] २० फेब्रुवारी २०२१ रोजी तिला ओडिशा येथे भारत सेवा रत्न सुवर्णपदक पुरस्काराने गौरविण्यात आले.[२]
कारकीर्द
कलम यांनी २००१ मध्ये पत्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. २००२-२०१० मध्ये त्यांनी एपीबी हिंदी, झी न्यूझ आणि दैनिक भास्कर यासारख्या दूरचित्रवाणी वाहिन्यांसमवेत पत्रकार म्हणून काम केले. ऑगस्ट २०२० रोजी तिने कुंडली भाग आणि उपाय पुस्तक प्रकाशित केले. २०२१ मध्ये तिला ओडिशाच्या भुवनेश्वर येथे महात्मा गांधी जागतिक शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले. २०२१ जानेवारी रोजी तिने तिचे नुमरॉलॉजिचे पुस्तक प्रकाशित केले.[३]
लेखन
- नुमरॉलॉजी
- कुंडली भाग आणि उपाय
पुरस्कार
- भारत सेवा रत्न सुवर्ण पदक पुरस्कार (२०२१)
- महात्मा गांधी ग्लोबल पीस पुरस्कार (२०२१)
संदर्भ
- ^ "Bhoomika Kalam, India's best astro analyst". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2019-09-17. 2021-07-03 रोजी पाहिले.
- ^ "ज्योतिष शास्त्र वैज्ञानिक आधार पर भी खरा - भूमिका कलम". इंदोर: पिपुल्स समाचार. २०२१.
- ^ "किसानी की नई इबारत लिख रही, कभी खोजी पत्रकारिता करने वाली ये महिला पत्रकार". https://www.samachar4media.com. 2021-07-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-07-03 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य)