भूतान कम्युनिस्ट पार्टी (मार्क्स-लेनिन-माओवादी)
भूतान कम्युनिस्ट पार्टी (मार्क्स-लेनिन-माओवादी) | |
---|---|
स्थापना | एप्रिल २००३ |
मुख्यालय | भूतान |
राजकीय तत्त्वे | साम्यवाद (मार्क्सवाद-लेनिनवाद), माओवाद |
राष्ट्रीय आघाडी | भूतान |
रंग | लाल |
पक्ष ध्वज | |
भूतान |
भूतान कम्युनिस्ट पार्टी (मार्क्स-लेनिन-माओवादी) हा भूतान मधला एक बंदी घातली असलेला राजकीय पक्ष आहे.
भूकपा (मालेमा) हे एका नव लोकशाही क्रांतीची मागणी करते व भूतानातील राजेशाही व वांगचुक घराण्याचे पाडाव करण्याचे भाष्य करते. त्यांच्या सैनी दलाचे नाव 'भूतान टायगर फोर्स' आहे. सध्या पक्षात अंदाजे ६०० - १००० सदस्य आहेत.[१] भूतान सरकार द्वारा पक्षावर बंदी घालण्यात आलेली आहे.[२]
इतिहास
१९९० च्या दशकात भूतानातील नेपाळी बोलणाऱ्या लोकांने लोकशाहीकरण व स्वीकृत भाषा बदलांसाठी भूतान सरकार विरुद्ध आंदोलन केले. सरकारने जब्रण ह्या लोकांना बंदीत घातले, व त्यांना पूर्व नेपाळातील निर्वासित तळांमध्ये ठेवले. जे भूतानातच राहिले त्यांना मोठ्या पातळीवर भेदभावाला सामोरे जावे लागले. त्या निर्वासित तळांमध्ये बंडखोर गट जन्माला आले, ज्यापैकी एक भूकपा (मालेमा) आहे.[३] भूकपा (मालेमा) ह्याचे संस्थापन २२ एप्रिल २००३ला झाले ज्याची बातमी नेपाळची कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) ह्यांची संकेतस्थळावर आली.[२]
कालक्रम
- २००३
भूकपा (मालेमा) हे नेकपामा ह्यांच्या संकेतस्थळावर २२ एप्रिल २००३ रोजी आले.
- २००७
रॉयल भूतान सैन्याने भूकपा (मालेमा) ने भारत सिमे जवळील फुएंतशोलिंग गावला लावलेला बॉम्ब ढवळला.[४]
- २००८
२००८ साली घटनात्मक राजेशाही मध्ये संक्रमण होत असतांना पक्षाच्या माओवाद्यांनी भूतानात ५ स्फोट केले, ज्या मधला एक राजधानी ठीम्पू येथे झाला. त्यांने 'लोकांचे युद्ध' सुरू झाल्याचे जाहीर केले.[५]
मार्च २००८ साली भूतानातील पोलीसने ५ आरोपी माववाद्यांना ठार केले व १७ इथारांना दाक्षिणात अटक केली.[५] डिसेंबर ३० २००८ला माओवाद्यांनी गनिमी कावा करत ४ वन सैनिकांना ठार केले व त्यांचे हत्यार घेतले. ही घटना सिंग्ये झोंग, जे कि राजधानीच्या २५० किमी दूर आहे, येथे झाली.[६]
- २००९
एका भूतानी पत्रकाराला माओवादी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.[७]
२०१०
१६ व्या दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेच्या भेटीच्या वेळेस माववाद्यांच्या धमक्यांमुळे सुरक्षा घट्ट करण्यात आली.[८]
विचारधारा
पक्षाची पहिली रचना एका दहा मुद्द्याच्या क्रमाची होती जी त्यांची सरकारकडे मागणी होती.[९] पक्षाची विचारधारा माओवादी आहे व ते लोकांचे युद्ध व नव लोकशाही क्रांती करण्याची मागणी करतात.
पक्ष नेपाळी निर्वासितांचा प्रत्यावार्तानाची मागणी करतात. ते भूतानला एक स्वतंत्र लोकशाही व गणतंत्र बनवण्याची इच्छा व्यक्त करतात.[२][१०]
आंतरराष्ट्रीय संबंध
भूतानी माववाद्यांचे संबंध नेपाळी माववाद्यांशी आहे ज्यांना ते आपले प्रेरणास्थान मानतात.[१०]
त्यांने भारतीय उत्तर पूर्व नक्षलवाद्यानसोबतही संबंध केले आहे व त्यांच्या कडून बॉम्ब बनवणे व इतर प्रशिक्षण ते घेतात.[११]
संदर्भ
- ^ [१] : Global Post : The Bhutan Insurgencies
- ^ a b c [२]: Bhutan Assesment 2008
- ^ [३] : Reuters : Bhutan tolerate democracy but not dissent
- ^ [४] : Tight security in Bhutan after Bomb found
- ^ a b [५] : Maoists killed by Bhutan Police
- ^ [६] : Communist guerillas kill four Bhutanese forest guards
- ^ [७] : Bhutanese reporter imprisoned
- ^ [८] : Bhutan's problem with Maoist insurgency groups
- ^ [९]: Archive : The ideology
- ^ a b [१०] Archived 2011-09-05 at the Wayback Machine.: Rise of red army in the last Shrangi - La
- ^ [११] : India - Bhutan rebel links exposed