भूक
अन्न खाण्याच्या तीव्र इच्छेला भूक म्हणतात. अस्वस्थ करणारी ही भावना मेंदुच्या "हायपोथालामस" ह्या ग्रंथीतुन उगम पावते.योग्य आहार घेणारी व्यक्ती काही आठवडे अन्नावाचुन आरामात जगु शकते, परंतु भूक ही भावना सहसा अन्न खाल्ल्याच्या दोन-तीन तासात उद्भवते.अन्न ग्रहण केल्या नंतर ही भावना नष्ट होते.
साहित्यात
एका कवीचे मनोगत: कसे हे बांधावे,भुकेचे तांडव, शब्दांचे मांडव,कुचकामी. [ संदर्भ हवा ].
दुसरे:कशी मी जोडावी,देवाजीशी नाळ,पोटातला जाळ विझेचची ना .[ संदर्भ हवा ].