Jump to content

भुजरिया

भुजरिया हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील साजरा होणारा सण आहे.[] राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे श्रावण वद्य प्रतिपदेला, मध्य प्रदेशातील गावांमध्ये भुजरिया नावाचा सण साजरा होतो.[]तृतीयपंथी समुदायातील सदस्य यात विशेषत्वाने सहभाग घेतात.[] हा किन्नरांचा विशेष उत्सव मानला जातो.[]

स्वरूप

गव्हाच्या कोवळ्या रोपांना भुजलिया किंवा कजलिया म्हणतात. काही पंचांगांत या सणाचे नाव कजलिया पर्व असे दिलेले आढळते.[] बुंदेलखंड येथे याचे विशेष महत्त्व आहे.[] या सणादरम्यान लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेक व्यक्ती भुजलियांची देवाणघेवाण करताना दिसतात. देशात समृद्धी आणि शांती रहावी अशी कामना या दिवशी केली जाते. गावातील लोकांमधील जातिभेद दूर होऊन सद्‌भाव नांदावा यासाठी हा सण उत्साहात साजरा होतो. भुजरिया पर्वाच्या दिवशी विविध संस्था भुजरिया संमेलन भरवतात. भुजरिया सणाच्या निमित्ताने घरात राखून ठेवलेल्या गव्हाच्या बियाणांची गुणवत्ता तपासली जाते.[] या सणाच्या काही दिवस आधी, म्हणजे श्रावण शुक्ल नवमीला एका बांबूच्या आणि मोहाच्या पानांनी बनलेल्या टोपलीत माती भरून तीत कोठारात बिजाणे म्हणून जपून ठेवलेल्या गव्हाचे थोडे दाणे पेरतात. भुजरियाच्या दिवशी टोपलीत उगवलेली कोवळी रोपे उपटून ती तलावावर किंवा नंतर त्यांची पूजा करून त्यांची मिरवणूक काढतात. []नंतर गावकरी त्या रोपांची आपआपसात देवाणघेवाण करून त्यांची गुणवत्ता तपासतात. या सणाच्या दिवशी तलावांवर जत्रेचे वातावरण असते.[]

हे ही पहा

संदर्भ

  1. ^ Gopal, Dr Krishna; Girota, Phal S. (2003). Fairs and Festivals of India: Chhattisgarh, Dadra and Nagar Haveli, Daman and Diu, Goa, Gujarat, Madhya Pradesh, Maharashtra (इंग्रजी भाषेत). Gyan Pub. House.
  2. ^ Bhatt, Shankarlal C. (2005). Land and people of Indian states and union territories : (in 36 volumes). 15. Madhya Pradesh (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788178353715.
  3. ^ a b "किन्नरोे से राजा ने कहा था भगवान से ये प्रार्थना करने, इस कारण मनाते हैं ये फेस्टीवल / किन्नरोे से राजा ने कहा था भगवान से ये प्रार्थना करने, इस कारण मनाते हैं ये फेस्टीवल". ९. ८. २०१७. ३०.. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ Association, American Anthropological (2007). Abstracts of the Annual Meeting (इंग्रजी भाषेत). American Anthropological Association.
  5. ^ a b "कजलियां पर्व का महत्‍व - Kajalia Ka Mahatva". 2019-07-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३०.७. २०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "कजली मेला, महोबा". ३०. ७. २०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ Sharma, Usha (2008-01-01). Festivals In Indian Society (2 Vols. Set) (इंग्रजी भाषेत). Mittal Publications. ISBN 9788183241137.