Jump to content

भिडेवाडा (पुणे)

भिडेवाडा
सर्वसाधारण माहिती
प्रकार वाडा
ठिकाण बुधवार पेठ, पुणे
देश भारत
मालकी मूळ मालकी: तात्यासाहेब भिडे
Other information
Number of stores


भिडेवाडा ही पुण्यातील २५७, बुधवार पेठ येथील ऐतिहासिक वास्तू आहे.[] या वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी इ.स. १८४८ साली मुलींची शाळा सुरू केली होती.[][] भारतामध्ये सर्वप्रथम स्थापन करण्यात आलेल्या मुलींच्या शाळांपैकी एक ही शाळा होती. यामध्ये शिक्षण देण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केले.[]

सध्या या ठिकाणी पहिल्या शाळेचे स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे. फुले दांपत्याने शाळा सुरू केली तो काळ, त्यासाठी त्यांना आलेल्या अडचणी आणि त्यावर त्यांनी केलेली मात हा सगळा इतिहास स्मारकाच्या रूपात उभारण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मुलींसाठी शाळा देखील पुणे महानगरपालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे . []

न्यायालयीन प्रकरण

अनेक वर्षे या जागेवर स्मारक व्हावे ही मागणी होती. परंतु भाडेकरूंसोबतच्या वादामध्ये हा विषय प्रलंबित राहिला होता. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर भिडे वाड्याच्या जागेवर स्मारक उभारण्यास परवानगी देण्यात आली. एकूण तेरा वर्षे न्यायालयात हे प्रकरण होते. न्यायालयीन निकालानंतर पुणे महापालिकेने ही जागा स्वतःकडे घेतली.

भाडेकरूंनी जागेचा ताबा सोडल्यानंतर सोमवार, ५ डिसेंबर २०२३ रोजी रात्री उशिरा यंत्रांच्या साहाय्याने ही जागा मोकळी करण्यात आली.

लोकप्रिय संस्कृतीत

  • पत्रकार रवीश कुमार यांनी २०२२ मध्ये भिडेवाड्यावर आधारित एक माहितीपट तयार केला.
  • २०२३ मध्ये व्हेअर इज भिडेवाडा हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "'भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करा'". Maharashtra Times. 2022-01-01 रोजी पाहिले.
  2. ^ "Minister orders PMC, dist admin to form committee to solve Bhide wada issue". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-02-15. 2022-01-01 रोजी पाहिले.
  3. ^ missphuleinpune (2016-11-23). "Bhide Wada: where it all began". Savitribai Phule and Women's Education in India (इंग्रजी भाषेत). 2022-01-01 रोजी पाहिले.
  4. ^ "आजच्या दिवशी तरी, सावित्रीबाईंची शाळा आठवतेय का? | Sakal". www.esakal.com. 2022-01-01 रोजी पाहिले.
  5. ^ पुणे, मंदार गोंजारी, एबीपी माझा (2023-12-05). "मुलींच्या पहिल्या शाळेचं स्मारक उभं राहण्याचा मार्ग मोकळा; अतिक्रमण हटवलं!". marathi.abplive.com. 2024-01-03 रोजी पाहिले.