Jump to content

भास्कर रामचंद्र भालेराव

भास्कर रामचंद्र भालेराव


सुभेदार भास्कर रामचंद्र भालेराव
जन्म नाव भास्कर रामचंद्र भालेराव
जन्म १८/२५ ? मे १८९५
मृत्यू २१ नोव्हेंबर १९५८
शिक्षण बी.ए.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहास संशोधन
भाषामराठी
साहित्य प्रकार इतिहास
वडील रामचंद्र भालेराव

भास्कर रामचंद्र भालेराव हे ग्वाल्हेर संस्थानात नायब सुभेदार होते. इतिहास विषयक काही ग्रंथाचे लेखन त्यांनी केले. महादजी शिंदे यांचे सेनापती व काही काळ दिल्लीचे किल्लेदार असलेले खंडेराव हरी यांच्या घराण्यात भास्कर भालेराव ह्यांचा जन्म झाला. अनेक ठिकाणी फिरून नाणी , कागदपत्रे, जुने ग्रंथ ह्यांच्या संग्रह त्यांनी केला. ह्या साधनांवर लेखन करून माळवा प्रांत व मध्य भारतातील मराठेशाहीच्या ऐतिहासिक घटनांवर प्रकाश टाकला. महादजी शिंदे ह्यांच्या कवितांचे संशोधन करून , राजकारणी , मुत्सद्दी, योद्धा म्हणून प्रसिद्ध असलेल्या महादजींच्या साहित्यिक अंगाची ओळख त्यांनी करून दिली.

विजय , चित्रमयजगत , जयाजीप्रताप, धर्मसेवक, महारथी, हितचिंतक ह्या नियतकालिकांचे संपादन भा.रा.भालेराव यांनी केले.

ग्रंथसंपदा

  • राजकवी महाराज महादजी शिंदे उर्फ पाटिलबाबा आलिजाबहाद्दर कृत कविता , १९२१
  • मराठ्यांचे श्रेष्ठत्व , १९२३
  • मराठ्यांचा देशाभिमान अर्थात मराठेशाही बुडाल्यांची मीमांसा