भाषिणी
भाषिणी हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अंड इन्फॉर्मेशेन टेक्नॉलॉजी आणि नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
'भाषा अनेक, भारत एक' हे या प्रकल्पाचे घोषवाक्य आहे.
उद्देश
सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था, संशोधन गट आणि नव-उद्योजक (स्टार्ट-अप) यांच्या सर्व योगदानाला मुक्त ज्ञानसंचयामध्ये (ओपन रिपॉझिटरी) आणण्यासाठी, भाषिणी एक वैविध्यपूर्ण नेटवर्कचे एकत्रीकरण करण्यासाठी संचालक म्हणून काम करेल.
उद्दिष्टे
- सर्व भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत इंटरनेट व डिजिटल सेवा उपलब्ध करून देणे.
- भारतीय भाषांमधील सामग्रीमध्ये भर घालणे.
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि अन्य उदयोन्मुख तंत्रज्ञानाची शक्ती वाढविणे आणि त्याद्वारे नागरिकांसाठी सेवा आणि उत्पाद विकसित करणे.
- भारतीय भाषांसाठी राष्ट्रीय सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणे. [१]
अपेक्षित परिणाम
- भारतातील सुविधा अधिक समावेशक होतील.
- भाषेचे अडसर दूर होतील.
- विविधातेमधील एकात्मतेस पोषक, पूरक वातावरण निर्माण होईल.
भाषादान उपक्रम
अधिकृत संकेतस्थळ
https://www.bhashini.gov.in/[permanent dead link]
संदर्भ
- ^ "bhasini.gov.in". bhasini.gov.in. 2022-06-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-07-22 रोजी पाहिले.