Jump to content

भावार्थ (पुणे)

पुणे येथील भावार्थ पुस्तक वाचन उपक्रम सुशोभन

भावार्थ (पुणे) हा मराठी साहित्याशी संबंधित एक वाचन उपक्रम आहे.[] याच्या पुणे आणि चिपळूण अशा दोन ठिकाणी शाखा आहेत.TWJ फाऊंडेशन - द सोशल रीफॉर्म्स या सामजिक संस्थेतर्फे हा उपक्रम राबविला जातो. पुणे शहरात कोथरूड, कर्वे पुतळ्याजवळ हे दालन आहे.

वैशिष्ट्ये

भावार्थ,पुणे येथील कोशसाहित्य

भावार्थ हे एक पुस्तकाचे दालन आहे. येथे वाचकांना पुस्तके विकत घेता येतात तसेच या ठिकाणी बसून पुस्तके विनामूल्य वाचता येतात हे याचे वेगळेपण आहे. विविध विषयांवर आधारित सुमारे ६,००० पुस्तके येथे उपलब्ध आहेत. वाचनासाठी पोषक असे वातावरण आणि सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

उपक्रम

भावार्थ पुणे येथील पुस्तके (१)
  • मराठी साहित्य विषयक-
  • ग्रंथ प्रदर्शन
  • स्पर्धा
  • कार्यशाळा
  • शब्दमंच- येथील वाचकांसाठी स्वरचित कविता,कथा, नाट्यछटा सादर करण्यासाठी मंच
  • शब्दयात्री- अनुभवी साहित्यिकांचा साहित्य प्रवास उलगडण्याचा कार्यक्रम[]
  • शब्दयात्री-भावार्थ मैफल- साहित्य, संगीत या क्षेत्रातील ज्येष्ठ सदस्यांचे कार्यक्रम[]
  • सामाजिक-
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना साहित्य प्रसार करण्यासाठी येथे काम करण्यासाठी संधी दिली जाते. हे काम पूर्ण झाल्यावर त्याचे प्रमाणपत्र दिले जाते.

  • दुर्गम भागातील नागरिक आणि शाळा यांच्यासाठी भावार्थ वाचनालय

संदर्भ

  1. ^ "भावार्थ पुस्तकं आणि बरंच काही…|भावार्थ" (इंग्रजी भाषेत). 2023-08-26 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "भावार्थमध्ये रंगला जेष्ठ साहित्यिक कविवर्य ज्ञानेश्वर झगडे | Guhagar News | Word Travel - Dnyaneshwar Zagade" (इंग्रजी भाषेत). 2023-03-24. 2023-08-26 रोजी पाहिले.
  3. ^ Chavan, Varsha (2023-05-31). "CHIPLUN: कवितेतून समाज वास्तव मांडायला हवे – कवी राष्ट्रपाल सावंत – प्रहार डिजिटल : Prahaar Digital" (इंग्रजी भाषेत). 2023-08-26 रोजी पाहिले.