भावना जाट
वैयक्तिक माहिती | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
जन्मदिनांक | १ मार्च, १९९६ |
जन्मस्थान | काब्रा, राजसमंद जिल्हा, राजस्थान, भारत |
खेळ | |
खेळ | २० किमी चालणे |
भावना जाट (१ मार्च, १९९६:काब्रा, राजसमंद जिल्हा, राजस्थान, भारत - ) ही एक भारतीय मैदानी खेळाडू आहे. ही २० किमी चालण्याच्या शर्यतीत भाग घेते [१] हिने २०२० उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तेथे ती ३२व्या क्रमांकावर आली. [२]
जाटचा जन्म हरयाणातील एका शेतकरी कुटुंबात झाला. आपल्या तीन भावंडांपैकी ती सर्वात लहान आहे.
शाळेत असताना शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी तिला एकदा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत घेउन गेले होते. त्यावेळी फक्त ३ किमी चालण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी जागा उरली होती. जाटने यात भाग घेउन दुसरा क्रमांक मिळवला.[३]
यानंतर तिने या खेळप्रकारात भाग घेणे सुरू ठेवले. आपल्या गावातील जुनकट विचारांच्या लोकांनी आपल्याला सराव करताना आखूड चड्डीमध्ये पाहू नये म्हणून ती पहाटे सराव करण्यास जात असे. [४] तिचे आई वडील गरीबीत असल्याने भावनाला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. इतकेच नव्हे तर बुटांसाठी पैसे नसल्याने तिला स्पर्धांमधून अनवाणीही भाग घ्यायला लागत असे.[५] [३]
२०१४-१५ दरम्यान जाटने विभागीय आणि राष्ट्रीय कनिष्ठ स्तरावरील स्पर्धांमध्ये पदके जिंकली. २०१६मध्ये तिने भारतीय रेल्वेमध्ये पश्चिम बंगालमधील हावडा येथे तिकीट कलेक्टर म्हणून नोकरी पत्करली. [३]
संदर्भ
- ^ "India's Bhawna Jat makes the Olympic cut in 20km race walk". India Today (इंग्रजी भाषेत). 15 February 2020. 2021-07-26 रोजी पाहिले.
- ^ "Priyanka Goswami 17th, Bhawna Jat 32nd in women's 20km race walk, Gurpreet fails to finish in men's event". indiatvnews.com. PTI. 6 August 2021. 25 May 2022 रोजी पाहिले.
- ^ a b c Selvaraj, Jonathan (16 February 2020). "Bhawana Jat's journey from grazing cattle to the Olympics". ESPN.in. 26 February 2020 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "espn" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ Basu, Suromitro (19 February 2020). "From practicing at 3am, Bhawna Jat is now living the race walking dream". Olympic Channel. 26 February 2020 रोजी पाहिले.
- ^ Asnani, Rajesh (16 February 2020). "Rajasthan's Bhwana Jat sets new national record in race walking, qualifies for Tokyo Olympics". The New Indian Express. 26 February 2020 रोजी पाहिले.