भालचंद्र हरी पाटील
भालचंद्र हरी पाटील ह्यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९२६ रोजी बोर्डी येथे झाला. मँट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी कोसबाड येथील कृषी शिक्षण आणि संशोधन संस्थेत काम चालू केले.त्यांनी नीरा आणि ताडगूळ काढण्याचे शास्रोक्त प्रशिक्षण ज्येष्ठ गांधीवादी विचारांचे कार्यकर्ते गजानन नाईक ह्यांच्याकडून घेतले.पुढे त्यांनी शिंदीच्या झाडांची रोपे तयार करणे, त्यांची शास्त्रीय पद्धतीने लागवड, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी नियोजन, पीक संरक्षण, काढणी, हाताळणी, आणि विक्रीव्यवस्था याविषयी सखोल संशोधन केले.पुढे त्यांनी चिकू भेट कलम पद्धती विकसित केली. पुढे त्यांनी मानवी श्रम, वेळ,आणि पैसा वाचविणारी अवजारे विकसित केली.इसवी सन १९७४ साली त्यांनी संस्थेत पावर टिलर बनवले.त्यांनी आधुनिक शेतीवर विविधांगी प्रयोग केले. दिनांक १६ जानेवारी २०११ रोजी त्यांचे देहावसान झाले.[१]
परदेशीं भाज्या
त्यांनी आपल्या शेतात पेप्रिका, आर्टिचोक, ब्रोकोली, अस्परगस, ब्रसेल्स स्प्राऊट,बेबी कॉर्न, लेट्यूस,स्पिनॅश इत्यादी परदेशी भाज्यांची लागवड केली. त्यांनी अनेक शेतकऱ्यांना परदेशी भाजीपाला लागवडीसाठी मार्गदर्शन केले.[२]