Jump to content

भार्गवराम विठ्ठल वरेरकर

भार्गवराम विठ्ठल वरेरकर
जन्म नाव भार्गवराम विठ्ठल वरेरकर
टोपणनाव मामा वरेरकर
जन्मएप्रिल २७, इ.स. १८८३
चिपळूण, महाराष्ट्र, भारत
मृत्यूसप्टेंबर २३, इ.स. १९६४
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्र नाट्यलेखन, साहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारनाटक, कादंबरी

भार्गवराम विठ्ठल वरेरकर ऊर्फ मामा वरेरकर (जन्म : चिपळूण, २७ एप्रिल १८८३; - २३ सप्टेंबर १९६४]) हे मराठी नाटककार, कादंबरीकार, लेखक होते.

जीवन

वरेरकरांचा जन्म एप्रिल २७, इ.स. १८८३ रोजी महाराष्ट्रात चिपळुणात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मालवणरत्‍नागिरी येथे झाले. शिक्षणानंतर ते टपाल खात्यात नोकरीस लागले.

वडिलांबरोबर मामा वरेरकर कोकणात कोकणातल्या दशावतारी नाटकांना जायचे. ती पाहून आपणही नाटक लिहावे असे मामांना वाटले. वयाच्या आठव्या वर्षी, म्हणजे तिसरीत असताना भा.वि. वरेरकरांनी ’नवीन रासक्रीडा’ नावाचे नाटक लिहिले. या छोट्या नाटकाचे पुढे काहीच झाले नसले, तरी आपण नाटक लिहू शतो असा विश्वास वरेरकरांना वाटला. त्यानंतर कोकणात येणाऱ्या नाटक मंडळींशी वरेरकरांनी परिचय वाढवला, आणि त्यांच्या नाट्य प्रयोगांचे ते सतत निरीक्षण करत राहिले या जिज्ञासेतून त्यांनी इब्सेन, मोलियर सारख्या पाश्चात्त्य नाटककारांचा अभ्यास केला.

वरेरकरांनी वाचनाची विलक्षण आवड होती. ते ललितकलादर्श’चे लोकप्रिय नाटककार होते. त्यांनी एकूण ३७ नाटके, सहा नाटिका लिहिल्या. शिवाय कथा कांदंबऱ्या आणि रहस्यकथाही त्यांच्या नावावर आहेत.

बंगालीतले उत्तम साहित्य त्यांनी मराठीत आणले. मराठी वाचकांना बंकिमचंद्र, शरच्चंद्र यांची ओळख वरेरकरांमुळेच झाली. शरच्चंद्र चटर्जींच्या कादंबऱ्यांच्या भा.वि, वरेरकरांनी केलेल्या अनुवादाची ४० पुस्तके वा.वि. भट यांनी प्रकाशित केली. ’एकविंशती’ या पुस्तकात रवींद्रनाथ टागोर यांच्या वरेरकरांनी अनुवादित केलेल्या २१ कथा आहेत..

इ.स. १९०८ साली त्यांनी 'कुंजविहारी' हे पहिले नाटक लिहिले. परंतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक म्हणजे रंगभूमीवर ७ सप्टेंबर, इ.स. १९१८ रोजी आलेले 'हाच मुलाचा बाप' हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली व लेखनावरच लक्ष एकवटले. १९२० ते १९५० या काळातील मराठी साहित्यातील ते प्रसिद्ध नाटककार होते.

नाटककार व साहित्यिक म्हणून ओळख असणारे वरेरकर राजकारणातदेखील सक्रिय होते. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. पुढे राज्यसभेवर त्यांची नियुक्तीही झाली होती. या साहित्यिकाला माणसांची आणि गप्पागोष्टींची अतोनात आवड होती. त्यांच्यासारखा दर्दी साहित्यिक विरळाच!

त्यांच्या नाटकांचे भारतातील अनेक भाषांत अनुवाद झाले.

वरेरकरांच्या नाटकांचे अनुवाद

  • अछूता प्यार
  • और भगवान देखता रहा
  • द्वारकेचा राजा : हिंदीत - द्वारका का राजा, अनुवादक रामचंद्र रघुनाथ सरवटे
  • नंदिनी
  • प्रजापति लंडन : हिंदीत - श्री प्रजापति, अनुवादक रामचंद्र रघुनाथ सरवटे
  • बडा भाई
  • माझ्या कलेसाठी : हिंदीत - कला के लिये
  • लयाचा लय : हिंदीत - नाश का विनाश, अनुवादक रामचंद्र रघुनाथ सरवटे
  • संतुलन
  • सत्तेचे गुलाम : हिंदीत - हक के गुलाम, अनुवादक रामचंद्र रघुनाथ सरवटे
  • संन्याशाचे लग्न : हिंदीत - संन्यासी का विवाह, अनुवादक रामचंद्र रघुनाथ सरवटे
  • सात लाख में से एक
  • सिंगापूरहून : हिंदीत - सिंगापूर से, अनुवादक ???

कारकीर्द

नाट्यलेखन

नाटक लेखन वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
अ-पूर्व बंगाल१९५३मराठीलेखन
उडती पाखरेइ.स.मराठीलेखन
करग्रहणइ.स. ?मराठीलेखन
करीन ती पूर्वइ.स. १९२७मराठीलेखन
कुंजविहारीइ.स. १९०४मराठीलेखन
कोरडी करामतइ.स.मराठीलेखन
चला लढाईवरइ.स.मराठीलेखन
जागती ज्योतइ.स. ?मराठीलेखन
जिवाशिवाची भेटइ.स. १९५०मराठीलेखन
तुरुंगाच्या दारातइ.स. १९२३मराठीलेखन
त्याची घरवालीइ.स.मराठीलेखन
दौलतजादाइ.स.मराठीलेखन
संगीत द्वारकेचा राजामराठीलेखन
धरणीधरइ.स.मराठीलेखन
न मागतांइ.स.मराठीलेखन
नवा खेळइ.स.मराठीलेखन
नामा निराळाइ.स.मराठीलेखन
पतित पावनइ.स.मराठीलेखन
पापी पुण्यइ.स.मराठीलेखन
भूमिकन्या सीताइ.स. १९५०मराठीलेखन
माझ्या कलेसाठीइ.स.मराठीलेखन
मुक्त मरुताइ.स. ?मराठीशेक्सपिअरच्या टेंपेस्टचा मराठी अनुवाद
मैलाचा दगडइ.स. ?मराठीलेखन
लंकेची पार्वतीइ.स.मराठीलेखन
लयाचा लयइ.स.मराठीलेखन
वरेरकरांच्या एकांकिका भाग १ ते ३इ.स. ?मराठीलेखन
संगीत वरवर्णिनी अथवा सती सावित्रीइ.स. ?मराठीलेखन
संगीत संजीवनीइ.स.मराठीलेखन
सत्तेचे गुलामइ.स. १९३२मराठीलेखन
सदा बंदिवानइ.स.मराठीलेखन
संन्याशाचा संसारइ.स. १९२०मराठीलेखन
समोरासमोरइ.स.मराठीलेखन
संसारइ.स.मराठीलेखन
सात लेखांतील एकइ.स.मराठीलेखन
सारस्वतइ.स. १९४१मराठीलेखन
सिंगापूरहूनइ.स.मराठीलेखन
सिंहगडइ.स.मराठीलेखन
सोन्याचा कळसइ.स. १९३२मराठीलेखन
स्वयंसेवक (गद्यपद्यात्मक नाटक)मराठीलेखन
हाच मुलाचा बापइ.स. १९१७मराठीलेखन

एकांकिका

  • एक पोरगी तीन आत्महत्या
  • चंद्रचकोरी
  • तिच्या नवऱ्याचो माहेर
  • तिला ते कळते
  • ती का गेली
  • नवा जमाना
  • नवा बैरागी
  • पुन्हा गोकुळ
  • पुन्हा डॉक्टर
  • प्रजापति लंडन
  • शुभमंगल

कादंबऱ्या/दीर्घकथा

  • अनुपमेचे प्रेम
  • उघडझाप
  • एकादशी
  • कडकलक्ष्मी
  • काशीनाथ
  • कुलदैवत
  • खेळघर
  • गावगंगा
  • गीता
  • गोदू गोखले
  • चिमणी
  • जगलेली आई
  • झुलता मनोरा
  • तरते पोलाद
  • तीन एकांकिका
  • दुर्जनांचा काळ
  • द्राविडी प्राणायाम
  • धावता धोटा (या कादंबरीवरून वरेरकरांनी ’सोन्याचा कळस’ हे नाटक लिहिले).
  • धूर्त एदलजी
  • न पूजलेली देवता
  • निरुपमेचे प्रेम
  • निष्कृती
  • परत भेट
  • पेटते पाणी
  • बहकलेला ब्रह्मचारी
  • भानगड गल्ली
  • मलबार हिल अर्थात सौंगडी
  • मी रामजोशी
  • लढाईनंतर
  • लांडग्याची शिकार
  • विकारी वात्सल्य
  • विधवाकुमारी
  • वेणू वेलणकर
  • वैमानिक हल्ला आणि इतर गोष्टी (कथासंग्रह)
  • शेवटचा परिचय
  • षोडशी
  • सात लाखांतील एक
  • सारस्वत
  • स्थित्यंतर
  • स्वामी
  • स्वैरसंचार
  • हरिलक्ष्मी

अनुवादित कादंबऱ्या

  • अखेरची ओळख (अनुवादित, मूळ बंगाली - नब विधान, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • अनुराधा (एकांकिका)
  • अभागीचा स्वर्ग
  • अरक्षणीया (अनुवादित, मूळ बंगाली - अरक्षणीया, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • आनंदमठ (अनुवादित, मूळ बंगाली - आनंदमठ, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • इंदिरा (अनुवादित, मूळ बंगाली - इंदिरा, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • इंदिरा व युगलांगुरीय (अनुवादित)
  • एकविंशती (टागोरांच्या २१ बंगाली कथांचा अनुवाद)
  • कपालकुंडला (अनुवादित, मूळ बंगाली - कपालकुंडला, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • कृष्णकांताचे मृत्युपत्र (अनुवादित, मूळ बंगाली लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • गृहदाह (अनुवादित, मूळ बंगाली - गृहदाह, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • चंद्रनाथ
  • चंद्रशेखर (अनुवादित, मूळ बंगाली - चंद्रशेखर, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • चरित्रहीन (अनुवादित, मूळ बंगाली - चरित्रहीन, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • चौथे चिमणराव
  • छोटाभाई (अनुवादित, मूळ बंगाली, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • ठाकुरांची नाटके (अनेक भाग)
  • तोंड मिळवणी
  • दर्पचूर्ण
  • दुर्गेश नंदिनी (अनुवादित, मूळ बंगाली - दुर्गेश नंदिनी, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • देवदास (अनुवादित, मूळ बंगाली - देवदास, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • देवदास आणि बिंदूचे बाळ (अनुवादित, मूळ बंगाली, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • देवी चौधुराणी (अनुवादित, मूळ बंगाली - देवी चौधुरानी, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • पंडित महाशय (अनुवादित, मूळ बंगाली - पंडित मोशाय, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • पथनिर्देश (अनुवादित, मूळ बंगाली - पथेर दाबी, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • परिणीता (अनुवादित, मूळ बंगाली - परिणीता, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • परेश (एकांकिका)
  • फाटकी वाकळ
  • ब्राह्मणाची मुलगी (अनुवादित, मूळ बंगाली - विप्रकन्या, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • भैरवी
  • मंदिर
  • माधवी
  • माधवी-काशिनाथ
  • मुक्त मरुता (शेक्सपिअरच्या टेंपेस्ट या नाटकाचा मराठी अनुवाद, सह‍अनुवादक शशिकला वझे)
  • मृणालिनी (अनुवादित, मूळ बंगाली - मृणालिनी, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • रजनी (अनुवादित, मूळ बंगाली - रजनी, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • रजनी आणि राधाराणी
  • रत्‍नदीप
  • रवींद्र ठाकुर निबंधमाला खंड १ ते २
  • राजसिंह (अनुवादित, मूळ बंगाली - राजसिंह, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • वनहंसी
  • वाळवी (अनुवादित, मूळ बंगाली - विषवृक्ष, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • विजया (अनुवादित, मूळ बंगाली - विजया, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • विप्रदास
  • विषवृक्ष (अनुवादित, मूळ बंगाली - विषवृक्ष, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • विराजवहिनी (अनुवादित, मूळ बंगाली - बिराज बऊ, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • शरद साहित्य (अनेक भाग)
  • शिपायाची बायको
  • शुभदा (अनुवादित, मूळ बंगाली - शुभदा, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • शेषप्रश्न (अनुवादित, मूळ बंगाली - शेषप्रश्न, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • श्रीकांत भाग १ ते ४ (अनुवादित, मूळ बंगाली - श्रीकांत, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • सती (एकांकिका)
  • सत्यबाला (अनुवादित, मूळ बंगाली - सत्यबाला, लेखक प्रभातकुमार मुखोपाध्याय)
  • समर्थ भिकारी अर्थात चंद्रशेखर
  • सव्यसाची (अनुवादित, मूळ बंगाली सव्यसाची, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • सापत्‍नभाव .. भारती (अनुवादित, मूळ बंगाली - पथेरदाबी, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • सीताराम (अनुवादित, मूळ बंगाली - सीताराम, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • सौभाग्य (अनुवादित, मूळ बंगाली - सौभाग्य, लेखक प्रभातकुमार मुखोपाध्याय)
  • हेमांगिनी

ललित पुस्तके

  • आघात (भा.वि.वरेरकर यांची निवडक भाषणे व लेख)
  • कापशीकर सेनापति घोरपडे घराण्याची कागदपत्रे
  • गजानन स्मृती
  • ठाकुरांची नाटके (अनेक भाग)
  • ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतील भा.वि. वरेरकर यांचे अध्यक्षीय भाषण
  • बंकिंमचंद्र चट्रटोपाध्याय (चरित्र)
  • माझा नाटकी संसार (दोन खंडी आत्मचरित्र)
  • माझ्या हिमालयातील यात्रा (प्रवासवर्णन)

भा.वि. वरेरकरांच्या साहित्यावरील पुस्तके

  • मराठी नाटक - नाटककार : काळ आणि कर्तृत्व (खंड दुसरा) - भा वि वरेरकर ते विजय तेंडुलकर (वि.भा. देशपांडे)
  • महाराष्ट्र मानस : भा.वि.तथा मामा वरेरकर जन्मशताब्दी विशेषांक जानेवारी १९८४

गौरव

अधिक वाचन

बाह्य दुवे