भारवाही यक्ष
भारवाही यक्ष ही भारतातील मंदिरांचे बाह्य भागात आढळणारी एक कोरीव मूर्ती आहे. कोरीव काम केलेल्या मंदिरांचे स्तंभांवर ही मूर्ती सहसा असते. स्तंभाचा वरचा भाग जो तुळईला टेकलेला असतो तेथे हिचे स्थान असते. या मूर्तीचा भाव जणूकाही तो पूर्ण तुळईचाच भार उचलीत आहे असा असतो. त्याचे दोन्ही हाताचे तळवे व डोके वरचे बाजूचा भार तोलतांना दाखविण्यात येतात.