Jump to content

भारतीय शिल्पकला

यक्ष-भारतीय शिल्पे यांचा विचार करताना त्यामध्ये बौद्धांचे स्तूप,शैलग्रुहे, पुराणातील हिंदू देवतांची मंदिरे, जैनांची मंदिरे, मूर्ती या सर्वांचा समावेश होतो.

भारतीय शिल्पकलेची माहिती घेताना सिंधू संस्कृतीचा आढावा प्रारंभी घ्यावा लागेल. सिंधू संस्कृतीच्या कलात्मक अवशेषात वास्तुशिल्प आणि मूर्तीकला यांचा समावेश होतो. सिंधू संस्कृतीमध्ये वापरात असलेली मातीची भांडी, मातीच्या मूर्ती, मुद्रिका हा सुद्धा कलेचा नमुना समजला जातो. मुद्रिकावर बैल, गेंडा, हत्ती अशी प्राण्यांची चित्रे दिसून येतात. या काळातील नगराच्या रचनेत उत्तम भाजलेल्या विटांचा वापर दिसून येतो. सांडपाण्याचा निचरा करण्याची उत्तम व्यवस्था हेही या काळाचे एक वैशिष्ट्य होय. स्नानाचे कुंडे, गोदामे, जहाज दुरुस्त करण्याची गोदी अशा वास्तू या सिंधू संस्कृतीच्या वास्तुकलेची माहिती देतात. पशुपती ही सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा म्हणून ओळखली जाते. ही संस्कृती नागर संस्कृती होती, त्यामुळे आर्थिक स्थैर्य आल्यानंतरचे कलेचे आविष्कार हे यामध्ये पहायला मिळतात. भारतीय शिल्पकला जाणणे आवश्यक आहे.

मौर्यकालीन

इ.स.पू. चौथ्या शतकातील मौर्यकालीन कला अवशेष  बिहार व उत्तर प्रदेश येथे सापडतात. पाटलीपुत्र येथील मौर्य राजधानीचे अवशेष, शैलगृहे, यक्ष मूर्ती यांचा यामध्ये समावेश होतो. पाटलीपुत्र येथील राजसभेच्या अवशेषात तळघडे आणि मंचक व त्यावरील फुलांची नक्षी, मण्यांची माळ यांचे वैशिष्ट्य आहे.

स्तूप

स्तूप या वास्तूप्रकाराचे स्वरूप मृतदेहाच्या दफनावर उभारलेला मातीचा ढिगारा एवढे साधे होते. याला विशेष महत्त्व मिळाले ते गौतम बुद्धामुळे. त्याचा महापरिनिर्वाणानंतर त्याच्या अनुयायांनी त्याच्या अस्थी, केस, दात अशा विविध अवशेषांवर स्तूप बांधले. सांचीचा स्तूप हे याचे जुने उदाहरण म्हणून सांगता येईल. अंड, पेटी, हर्मिका, छत्रावली, कठडा, वेदिका, प्रवेशद्वारावर तोरण हे स्तूपाचे मुख्य भाग असतात.

हीनयान गिरीशिल्पे

हीनयान पंथाच्या प्रचारक व्यक्तींना व्यापारी लोकांचा आश्रय लाभल्याने त्यांनी दिलेल्या आर्थिक दानातून डोंगरामध्ये शैलगृहे बांधण्याची परंपरा सुरू झालेली दिसते. भाजे (पुणे), कोंडाणे (कुलाबा), नाशिक, जुन्नर, कान्हेरी अशा वेगवेगळ्या धीकानी अशी शैलग्रुहे बांधण्यात आली.

यक्ष

मथुरा शिल्पकलेला कुशाण कला असेही नाव दिलेले आहे. यक्ष मूर्ती काहिशा स्थूल, झुकलेल्या आहेत. या शरीराने भक्कम अशाही आहेत.

चित्रदालन

[]

  1. ^ प्राचीन कलाभारती ,माटे म. श्री.