भारतीय बॅडमिंटन लीग ही स्पर्धा भारतीय बॅडमिंटन संघटनेने आयोजित केलेली स्पर्धा आहे. सर्वात पहिली भारतीय बॅडमिंटन लीग १४ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आयोजित केली गेली[१] या स्पर्धेमध्ये भारतीय तसेच विदेशी खेळाडू सहभागी होतात.. पहिल्या भारतीय बॅडमिंटन लीगसाठी खेळाडूंचा लिलाव दिल्ली येथे २२ जुलै २०१३ रोजी झाला. या स्पर्धेमध्ये ६ संघ सहभागी होतील.[२]
अभिनेता अमीर खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोन हे या स्पर्धेचे ब्रॅंड ॲम्बेसेडर[मराठी शब्द सुचवा] असणार आहेत. त्याशिवाय सुनील गावस्कर यांना प्रशंसक म्हणून बोलाविले जाणार आहे.[३]
आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. ही स्पर्धा १४ ऑगस्ट २०१३ ते ३१ ऑगस्ट २०१३ दरम्यान आयोजित केली गेली आहे. स्पर्धेच्या शुभारंभाचा सोहळा दिल्ली येथे १३ ऑगस्ट २०१३ रोजी तर अंतिम सामने मुंबई[४] येथे ३१ ऑगस्ट रोजी होतील. उपांत्य फेरीचे सामने हैदराबाद व बंगळूर येथे होतील. [५]
लिलाव
पहिल्या भारतीय बॅडमिंटन लीगसाठीचा लिलाव ३० जून २०१३ रोजी ठेवण्यात आला होता. परंतु आधी १९ जुलै २०१३ व नंतर २२ जुलै २०१३ असा दोन वेळा पुढे ढकलण्यात आला. [६] २०१३चा लिलाव दिल्लीमध्ये करण्यात आला.[७] मलेशियाचा ली चोंग वेई लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला मुंबई मास्टर्स संघाने १,३५,००० अमेरिकन डॉलरला (जवळपास ८०,१९,०३२ रुपये) विकत घेतले. तर भारतीय स्टार खेळाडू सायना नेहवालवर १,२०,००० अमेरिकन डॉलरची (जवळपास ७१,२७,७९६ रुपये) बोली लावून हैदराबाद हॉटशॉट्स संघाने करारबद्ध केले.
राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या पारूपल्ली कश्यपवर बांगी बीट्सने ७५,००० अमेरिकन डॉलरची (जवळपास ४४,५५,६२२ रुपये) बोली लावली. भारताची युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला लखनौ वॉरियर्सने ८०,००० अमेरिकन डॉलरला (जवळपास ४७,५२,६६४ रुपये) विकत घेतले. व्हिएतनामच्या टिन्ह मिन्ह युगेन याला विकत घेण्यासाठी दिल्ली आणि पुणे पिस्टॉन्स यांच्यात चुरस रंगली होती. अखेर पुणे संघाने त्याला ४४,००० (२६,१४,०२४ रुपये) विकत घेतले.
भारताच्या दुहेरीतील उत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या ज्वाला गुट्टा व आश्विनी पोनप्पा यांना त्यांच्या ५०,००० यांना त्यांच्या अमेरिकन डॉलर या बेसप्राईजपेक्षा कमी किंमतीत करारबद्ध केले गेले. दिल्ली स्मॅशर्सने ज्वाला गुट्टाला ३१,००० डॉलरला (जवळपास १८,४१,६९९ रुपये) करारबद्ध केले तर आश्विनी पोनप्पा हिला अवघ्या २५,००० डॉलरला पुणे पिस्टॉन्सने करारबद्ध केले. महिला दुहेरीत लोकप्रिय खेळाडूंची वानवा, सामन्यांना मिळणारा प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद, यामुळे आयबीएल संयोजकांनी महिला दुहेरी हा प्रकारच काढून टाकला. या निर्णयामुळे ज्वाला तसेच आश्विनी यांचे स्पर्धेतील अस्तित्व मिश्र दुहेरीच्या एका लढतीपुरते मर्यादित झाले. त्यामुळे ‘आयकॉन’ खेळाडू असूनही त्यांना खरेदी करण्यासाठी बेसप्राइसची मोठी रक्कम खर्च करण्यास फ्रॅंचायझींनी नकार दिला. आर्थिक आणि स्पर्धात्मक समीकरणे लक्षात घेतली तर त्यांची भूमिका रास्त होती. यावर तोडगा म्हणून आयबीएल व्यवस्थापन आणि सहा फ्रॅंचायझी यांच्यात गुप्त बैठक झाली. त्यानुसार या दोघींची बेसप्राइज ५०,००० अमेरिकन डॉलरवरून २५,००० अमेरिकन डॉलर अशी कमी करण्यात आली. फ्रॅंचायझींना आर्थिक फटका बसू नये, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. मात्र या बैठकीबाबत तसेच निर्णयाबाबत ज्वाला आणि आश्विनी कल्पना देण्यात आली नाही. दरम्यान, फ्रॅंचायझींनी या दोघींना लिलावात सुधारित बेसप्राइजनुसार विकत घेतल्यानंतर, त्यांच्या मूळ बेसप्राइसमधून विकत घेतलेली रक्कम वजा केली जाईल आणि जी रक्कम समोर येईल, ती रक्कम ज्वाला आणि आश्विनी आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी देण्याचा निर्णय आयबीएल व्यवस्थापनाने घेतला आहे. [८]
ज्वाला गुट्टा व आश्विनी पोनप्पा यांच्या शिवाय रूपेश कुमार आणि सनावे थॉमस यांनाही आधारभूत किंमत कमी झाल्याचा फटका बसला. सुरुवातील १५,००० अमेरिकन डॉलर अशी किंमत ठरविण्यात आलेल्या या जोडीला पुणे पिस्टॉन्स संघाने प्रत्येकी ५,००० अमेरिकन डॉलर्सला खरेदी केले.[९]
६ भारतीय आणि ४ विदेशी खेळाडू असलेले संघ आणि त्यांच्या लिलावातील किंमती खालीलप्रमाणे:
[[Image:|border|25px]] बांगा बिट्स
देश | खेळाडू | किंमत ($) |
---|
भारत | पारूपल्ली कश्यप | ७५,००० |
हाँग काँग | ह्यु युन | ५०,००० |
चिनी ताइपेइ | ताई झ्यु यिंग | २५,००० |
स्पेन | कॅरोलिना मारिन | १०,००० |
डेन्मार्क | कार्स्टन मॉगेनसेन | ५०,००० |
भारत | अक्षय देवलकर | ३६,००० |
भारत | अपर्णा बालन | १२,००० |
भारत | आदित्य प्रकाश | ५,००० |
भारत | अरविंद भट | ७,५०० |
भारत | जे. मेघना | ४,००० |
[[Image:|border|25px]] हैदराबाद हॉटशॉटस्
देश | खेळाडू | किंमत ($) |
---|
भारत | सायना नेहवाल | १,२०,००० |
इंडोनेशिया | तौफिक हिदायत | १५,००० |
भारत | अजय जयराम | २५,००० |
मलेशिया | व्ही. शेम गोह | १०,००० |
भारत | तरुण कोना | २८,००० |
भारत | प्रज्ञा गद्रे | ४६,००० |
मलेशिया | खिम वाह लिम | १०,००० |
थायलंड | तानोनग्साक | १५,००० |
भारत | कांती विशालक्षी | ३,००० |
भारत | शुभंकर डे | ३,००० |
[[Image:|border|25px]] दिल्ली स्मॅशर्स
देश | खेळाडू | किंमत ($) |
---|
भारत | ज्वाला गुट्टा | ३१,००० |
हाँग काँग | वोंग विंग की | २०,००० |
भारत | एच्. एस्. प्रणॉय | १६,००० |
भारत | साई प्रणीथ | ४०,००० |
भारत | [[अरुंधती पंतावाने] | १५,००० |
मलेशिया | वून हुअंग तान | ५०,००० |
मलेशिया | केन केट कू | ५०,००० |
भारत | व्ही. दिजू | ३०,००० |
थायलंड | निचाआन जिंदापॉन | १५,००० |
भारत | प्राजक्ता सावंत | ७,००० |
[[Image:|border|25px]] मुंबई मास्टर्स
देश | खेळाडू | किंमत ($) |
---|
मलेशिया | ली चोंग वेई | १३५,००० |
जर्मनी | मार्क झ्वाइल्बर | १५,००० |
डेन्मार्क | टिने बून | ३०,००० |
भारत | प्रणव चोप्रा | ३६,००० |
भारत | मनू अत्री | १०,००० |
भारत | सिकी रेड्डी | ११,००० |
भारत | पी. सी. तुलसी | १०,००० |
रशिया | व्लादिमीर इव्हानोव्ह | १५,००० |
भारत | रसिका राजे | ३,००० |
भारत | सुमीत रेड्डी | ७,५०० |
[[Image:|border|25px]] पुणे पिस्टन्स
देश | खेळाडू | किंमत ($) |
---|
भारत | आश्विनी पोनप्पा | २५,००० |
व्हियेतनाम | युगेन टिइन मिन्ह | ४४,००० |
भारत | सौरभ वर्मा | २०,००० |
भारत | अनुप श्रीधर | ६,००० |
जर्मनी | ज्युलिअन शेंक | ९०,००० |
डेन्मार्क | जोकॅइम नेल्सन | ३५,००० |
भारत | सनावे थॉमस | ५,००० |
भारत | अरुण विष्णू | २६,००० |
मलेशिया | वी किआंग तान | १५,००० |
भारत | रूपेश कुमार | ५,००० |
[[Image:|border|25px]] अवध वॉरियर्स
संघ
एकूण २९ संघांपैकी ६ संघ स्पर्धेसाठी निवडले गेले. प्रत्येक संघात ४ परदेशी खेळाडूंसहित एकूण १२ खेळाडू असतील.
आय.बी.एल्. संघांची ठिकाणे
निवडले गेलेले संघ खालीलप्रमाणे:[१०]
प्रक्षेपण
संदर्भ आणि नोंदी