भारतीय पारपत्र
भारतीय पासपोर्ट भारतीय पारपत्र | |
---|---|
भारतीय पारपत्राचे वरचे कव्हर | |
प्रथम जारी करण्याचा दिनांक | १९२० (प्रथम आवृत्ती) १९८६ (सध्याची आवृत्ती) २०१६ (बायोमेट्रिक आवृत्ती) |
तर्फे वितरीत | भारत |
दस्तावेज प्रकार | पासपोर्ट |
उद्देश | ओळखण |
पात्रतेच्या अटी | भारतीय नागरिकत्व |
मुदतबाह्यता | वय वर्षे १८ व अधिक यांचेसाठी प्राप्त केल्यानंतर १० वर्षांनी, नाहीतर ५ वर्षांनी |
किंमत | वयस्क(३६पाने)[१]
वयस्क(६०पाने)[१]
अवयस्क(१८ वर्षांखालील ३६पाने)[१]
नोंद: जर तत्काळ योजनेअंतर्गत नवीन पारपत्रासाठी अर्ज करण्यात आला तर, तत्काळ शुल्क हे नेहमीच्या शुल्काव्यतिरिक्त भरावे लागते.[१] सर्व किंमती ह्या भारतीय रुपयात आहेत. INR (). |
भारतीय पारपत्र (पासपोर्ट) हे भारताच्या राष्ट्रपतींनी भारताच्या नागरिकांच्या परदेशगमनासाठी दिलेला परवाना आहे. पासपोर्टधारक भारतीय पासपोर्ट ॲक्ट (१९६७) नुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रमण करणास सक्षम असतो. मात्र हा परवाना बाळगणाऱ्याला परकीय देशात प्रवेश मिळण्यासाठी त्या देशाने दिलेला 'व्हिसा' असणे आवश्यक असते. नेपाळ, भूतान आणि बाली या काही देशांत प्रवेश करण्यासाठी व्हिसा लागत नाही.
काही देशात आपण व्हिसाशिवाय किंवा ‘व्हिसा आॅन अरायव्हल’वर जाऊ शकतो.
उदा. अंटार्क्टिका, बोलिव्हिया, ब्रिटिश व्हर्जिन आइसलॅण्ड, कंबोडिया, कूक आइसलॅण्ड, फिजी, ग्रेनाडा, वानूआतू, तुर्क अॅण्ड काइकोस आइसलॅण्ड, थायलंड, त्रिनिदाद आणि टोबॅगो, मकाऊ, माइक्रोनेसिया, नेपाळ, सेंट व्हिन्सेंट अॅण्ड ग्रेनाडीन्स, मॉरिशस, सेंट किट्स अॅण्ड नेव्हिस, जॉर्डन, हॉंगकॉंग.
भारती. पासपोर्ट चे प्रकार
भारतामध्ये तीन प्रकारची पारपत्रे प्रचलित आहेत.
- पर्सनल पासपोर्ट
- डिप्लोमॅटिक पासपोर्ट
- ऑफिशियल पासपोर्ट
१) पर्सनल पासपोर्ट:- यालाच Ordinary Passport असे देखील म्हणतात. हा दिसायला गडद निळा कव्हर चा असतो. सामान्य नागरिकाला सामान्य प्रवास करण्यासाठी म्हणून दिले जाते, जसे की सुट्टीतील, अभ्यास आणि व्यवसाय ट्रिप. हा "P" पासपोर्ट आहे. P म्हणजे पर्सनल.
२) डिप्लोमॅटिक पासपोर्ट:- हा दिसायला मायऑन कव्हर चा असतो. भारतीय राजनैतिक, जारीक सदस्य, केंद्रीय कौन्सिल ऑफ मंत्री, काही उच्च दर्जाचे सरकारी अधिकारी आणि राजनयिक कौशल्यांचे सदस्य यांना हे पासपोर्ट देण्यात येते. तसेच विनंती केल्यावर अधिकृत व्यवसायावर प्रवास करणार्याला, उच्च-रँकिंग स्टेट-लेव्हल अधिकार्यांनाही हे दिले जाऊ शकते. हा "D" पासपोर्ट आहे. D म्हणजे डिप्लोमॅटिक.
३) ऑफिशियल पासपोर्ट:- हा पांढऱ्या रंगाचे पासपोर्ट असतो. अधिकृत व्यवसायावर भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींना दिले जाते. हा "S" पासपोर्ट आहे. S म्हणजे सर्विस.
१९९५ मध्ये, २६ युरोपियन देशांनी एकमेकांशी विना सीमा नियंत्रणाशिवाय जाणे येण्यास करार केला होता. परंतु विमान प्रवाशांना कधी कधी ओळखण्यासाठी पासपोर्ट देखील विचारू शकतात.
संदर्भ
परदेशात फिरायचय पण व्हिसाची कटकट वाटतेय मग या देशात फिरायला जा. कारण इथे व्हिसा लागत नाही.