भारतीय नोबेल पारितोषिक विजेते
नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले.
ऑक्टोबर २०१५ पर्यंत एकूण ८७० (पुरुष ८२१, आणि स्त्री ४९) व्यक्तींना २३ संस्थाना नोबेल पारितोषिक देण्यात आले आहेत.
पारितोषिक विजेते
अर्थशास्त्र
- १९९८ : अमर्त्य सेन
रसायनशास्त्र
- २००९ :वेंकटरमण रामकृष्णन*
साहित्य
- १९०७ :रुडयार्ड किपलिंग*
- १९१३ : रविंद्रनाथ टागोर
- २००१ : व्ही.एस. नायपॉल*
शांतता
- १९७९ : मदर तेरेसा
- २०१४: कैलाश सत्यार्थी*
भौतिकशास्त्र
- १९३०: सी.व्ही. रमण
- १९८३ : सुब्रम्हण्यन चंद्रशेखर*
वैद्यकशास्त्र
- १९०२: रोनाल्ड रॉस*
- १९६८ : हर गोविंद खुराना*