भारतीय नुकसानभरपाई कायदा १९२३
भारतीय नुकसानभरपाई कायदा १९२३ नुसार कामगारास कामामुळे व कामावर असताना अपघात झाल्यास त्याची नुकसानभरपाई देणे मुख्य काम देणाऱ्यास - प्रिन्सिपल एम्प्लॉयर - याच्यावर बंधनकारक आहे.[ संदर्भ हवा ]
या कायद्यानुसार कंत्राटदाराकडे काम सोपविताना कंपनीने, विकसकाने कंत्राटदारास असा कामगार नुकसानभरपाई विमा करणे आवश्यक असते.[ संदर्भ हवा ]
हा विमा करताना प्रस्तावकाचे नाव, पत्ता, व्यवसाय व कामाविषयीचा तपशील याबरोबरच कामगारांचे त्यांच्या कामानुसार, वेतनानुसार वर्गीकरण याची माहिती भरून द्यावी लागते. कंत्राटदाराकडील कामाच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व कामगारांचा असा विमा उतरविणे आवश्यक असते. काम करणाऱ्या कामगारांपेक्षा कमी कामगारांचा विमा करणे विम्याच्या नियमांचा भंग करणारे असून, नंतर कामगार भरपाईचा दावा आल्यास प्रसंगी विमा कंपनी भरपाई नाकारू शकते.[ संदर्भ हवा ]