Jump to content

भारतीय दुर्मिळ पक्ष्यांची यादी


हंसक,बाड्डे,हंस

१.१ शराल हंसक (bewick's or western whistling swan (cygnus columbianus)

१.२ धार्तराष्ट्र (whooper swan (cygnus cygnus)

1.3 पकहंस (mute swan (cygnus olor)

1.4 अंदमान हंसक (grey andman or ocenic teal (anas glibberifrons albogularis)

1.5 अरुण बाड्डा (pinkhead duck (rhodonesia caryphyllacea)

१.६ देवहंस whitewinged wood duck (cairina scutulata)

शराल हंसक,धार्तहंसक,आणि पाकहंसक हे स्थलांतर करणारे पक्षी क्वचितच आढळून येतात.नदीचा विस्तृत पात्रे व झिलाणी या त्यांच्या निवासस्थानांचा उत्तरोत्तर संकोच होत आहे.अशा क्षेत्रांचे संवर्धन व संरक्षण करण्याची आवश्यकता आहे.अंदमान बेटांच्या समूहात दिसणारे अंदमान हंसक तेथील गोडया पाण्याच्या झिलाणी,दलदली,तसेच,खाडी आणि खाऱ्या पाण्यात आढळून येतात;परंतु ते राहत असलेल्या परिसराचा विनाश झाल्यामुळे आता फक्त मध्य व उत्तर अंदामानातच ते सापडतात.हिमालयाचा पायथा,तराई क्षेत्र,तसेच नेपाल व पूर्वेकडील मणिपूर या प्रदेशांत असलेल्या वनांतील दलदलीमध्ये अरुण बड्डे आढळून येतात.एखाद-दुसरा पक्षी उत्तर भारतात पंजाब,तर दक्षिणेकडे तामिळनाडू येथे क्वचित दिसतात.परंतु १९३० पासून त्यांचे अस्तित्वाचे पुरावे कोठेही सापडले नाही.भारतात त्या नामशेष झाल्या आहेत.आसाम,अरुणाचल प्रदेश,मणिपूर,व बांगला देशात आढळून येणारा हा पक्षी पाण्यात उष्ण असलेल्या झाडांच्या ढोलीत घरटी घालतो.त्यांचे वसतीस्थान असलेल परिसर दुर्मिळ पक्षी अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.

ससाणा, गिधाड

२.१ ब्लीथाचा बाज blyth's baza or northern brown lizard hawk (aviceda jeridoni jeridoni)

२.२ काळ्या शेंडीचा बाजा Indian blackcrested baza or lizard hawk ( Aviceda leuphotes leuphotes

२.३ सुवर्णगरुड Himlayan Golden Eagle ( aquila chrysaetos dephanea)

२.४ कळ गरुड Black egale (Ictinaetus malayensis perniger)

२.५ पांढऱ्या पोटाचा समुद्रगरुड _Whitebellied sea Eagale (Haliaeetus leacogaster)

ब्लिथाचा बाज दार्जीलिंग जिल्हा (प.बंगाल),सिक्कीम ते पूर्व आसाम या प्रदेशातील पर्वतीय क्षेत्र,तसेच,पायथ्यावरील सदाहरितपर्णी वृक्षांच्या जंगलात आढळून येतो.कळ्या शेंडीचा बाज दक्षिणेकडे केरळ,तसेच पूर्व नेपाळ,सिक्कीम,उत्तर पश्चिम बंगाल,बांगला देश ते पूर्व आसाम या प्रदेशातील पर्वतांतील सदाहरितपर्णी वृक्षाची वने, तसेच,पायथ्यावरील जंगलाआढळून येतो. बलुचिस्थान, वायव्या,सरहद्द प्रांत,पूर्वेकडे आसाम व नेपाळ या प्रदेशांतील पर्वतीय भागात सुवर्णगरुड आढळून येतो.कळ्या गरुडाच्या निवसास्थानाची नोंद पश्चिम पाकिस्तानात ते हिमाचल प्रदेश, नेपाळ ते पू.आसाम व पश्चिम बंगाल ओरिसा,तसेच आंध्र प्रदेश ते तामिळनाडूप्रदेशातील पूर्वघाट,व उ.कर्नाटक, गुजरात व मुंबई येथे करण्यात आली.पांढऱ्या पोटाचा समुद्रगरुड मुंबईपासून पश्चिम किनाऱ्याचा प्रदेश, लक्षद्वीप बेटे,श्रीलंका,अंदमान व न्निकोबर बेटे या सागरी प्रदेशांत आढळून येते. वरील बाज व गरुड कुळातील पक्षी दुर्मिळ होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या वस्तीस्थानांचा संकोच.त्यांच्या निवासासाथानाचे संरक्षण व संवर्धन केल्यामुळे आपण या पक्ष्यांना नष्ट होण्यापासून वाचवू शकू.

कुल: कोंगा

मेगॅपोडीडी:मेगॅपोडीस

३.१ उत्तर निकोबार कोंगा North Nicobar Megapode(Magapodius freycinet Nicobariensis)

3.2 दक्षिण निकोबार कोंगा South nicobar Megappode (Megapodius freycinet abbottii)

वरील दोन प्रकारचे कोंगा अंदमान-निकोबार बेटांवर आढळून येतात.पुळणीनजीकच्या घनदाट जंगलातील झुडपात आढळतो.

कुल: जीवजीवक,तित्तिर,लावा

फॅसिएनिडी:फीझंट,पाट्रिज,क्वेल,इ.

४.१ वेणु तित्तिर Assam Bamboo patridge (Bambusicola fytchii hopkinsoni)

४.२ चीकोत्री Red Spurflow ( Galloperdix spadicea spadicea)

४.३ गिरी लावा Mountain Quail (ophrysia superciliosa)

४.४ तांबड्या कंठाचा जीवाजीवक Nepal Blood Pheasant (Ithaginis cruentus cruentus)

४.५शिन्ग मोनाल Western Horned Pheasant (Tragopan melanocephala)

४.६ लाल शिंग मोनाल Crimson horned pleasant or satyaTragopan ( Yragopan satyara)

४.७ हिमालय निलमोर Impeyan or Himalayan Monal Pheasant ( Lophophorus impejanus)

४.८ मिश्मी निलमोर Scalater's or Mishmi monal phesant (Lophophorus scalateri)

४.९ इलवेसचा निलमोरा Elwes's Eared Monal Phesant (Crossoptilon Crossoptilon harmani)

४.१० कोकला Kokalas phesant ( pucrasia macrolopha macrolopha)

४.११ चीर Chir phesant (Catreus wallichii)

४.१२ पृष्ठरेखी जीवाजीवक Mrs.Hume's Barredback phesant ( Syrmaticus humiae humiae)

४.१३ भूतान मयूर जीवाजीवक bhutan peacock phesant ( polypectron bicalcaratum bekeri)

वेणू तित्तीर: आसाम,नागा,कचार,खासी,जैनतिया,गारो,मिझो,मणिपूर,बांगला देश,प्रदेशातील झुडपी जंगलानजीकच्या भातशेती व गवती कुरणात आढळतात.

चकोत्री: उत्तर भारतातील तराई ते दक्षिणेकडे केरळपर्यंत आढळून येतात.या प्रदेशातील शुष्क व आद्र पानगळीच्या वनात चकोत्र्या सापडतात.

चित्रित चकोत्री : भारतीय द्विक्ल्पातील डोंगराच्या पायथ्यावरील गोटे असलेले झुडपी जंगल,तसेच बांबूच्या वनातील ओढे नाले असलेल्या खुरट्या झाडात चित्रित चकोत्री आढळून येते.

गिरी लावा: एकोणिसाव्या शतकात देहरादून-नैनीतील भागातील डोंगरउतारावरील गावात व खुरट्या झाडीत आढाळून येत असलेल्या गिरी लावाचे शेवटचे दर्शन १८७६ मध्ये झाले.डॉ. सलीम आली यांनी या पक्ष्यांच्या निवासस्थानाच्या प्रदेशात पुन्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु तो दिसला नाही.

तांबड्या कंठाचा जीवाजीवक: हिमालयात २०००ते ४५०० मी.उंचीचा पहाडी प्रदेश,तसेच,नेपाळपासून पूर्वेकडे अरुणाचल प्रदेशातील देवदारांच्या वनातील ज्युनिपर,बांबूच्या बेटांत,तांबड्या कंठाचे जीवाजीवक आढळून येतात.

शिंग मोनल:पश्चिम हिमालयात काश्मीर ते गढवाल या पहाडी प्रदेशात १००० ते ३००० मी. उंचीवरील देवदार व ओकच्या जंगलातील बांबू व इतर झुडपात लालशिंग मोनल दिसून येतो.

तिबेटी शिंग मोनल: पूर्व भूतान व अरुणाचल प्रदेश ते मिश्मी या पर्वतीय प्रदेशात १८००ते ३५०० मी. उंचीवरील झुडपी जंगले व बांबूच्या वनात तिबेटी शिंग मोनल संचार करतात.

चीनी शिंग मोनल : नेफा येथील २१०० ते ३५०० मी. उंचीच्या पहाडी प्रदेशातील सदाहरितपर्णी जंगलातील खुरटी झाडे व बांबूच्या दाट वनांत राहतात.

हिमालय निलमोर: पू. अफगानिस्तानापासून हिमालयात भूतान व अरुणाचल प्रदेशातील देवदारच्या वनातील ओक व इतर झाडे झुडपे, तसेच, विखुरलेली गवती कुरणे ही हिमालय निलमोरांची आवडती निवासस्थाने आहेत.

'मिश्मी निलमोर : नेफा भागात २५०० ते ४५०० मी. उंचीच्या पहाडी प्रदेशातील सूचीपर्णी वृक्षांच्या जंगलात मिश्मी निलमोर आढळून येतात.

इलावेसचा निलमोर: नेफा या भागात ३००० ते ५००० मी. उंचीच्या पहाडी प्रदेशातील ज्युनिपरच्या खुरट्या झाडीत इवलेसे निलमोर वावरते.

कोकाला: हिमालयात द. काश्मीर,हिमाचल प्रदेश, गढवाल,ते प. नेपाळ या भागात १५०० ते ४००० मी. उंचीच्या पहाडी प्रदेशातील ओक व सूचीपर्णी वृक्ष असलेल्या अतिउअतरव्र कोकला संचार करतात.

चीर: हिमालयातील काश्मीर,हिमचल प्रदेश,गढवाल,व कुमाऊ तसेच,पंजाब या भागात १४०० ते ३५०० मी. उंचीवरच्या प्रदेशात अतिउअतरवरिल ओक वृक्षांच्या विरळ जंगलात चीर आढळतात.

पृष्ठरेखी जीवजीवक : मणिपूर,मिझोरम या प्रदेशात १५०० ते ३००० मी. उंचीवरील पहाडी क्षेत्रातील उतारावरील विरळ जंगलातील गवताळ भागात पृष्ठरेखी जीवजीवक आढळतात.

भूतान मयूर जीवाजीवक: सिक्कीम,उ.बंगाल,भूतान,अरुणाचल प्रदेश,आसाम,व मणिपूर या प्रदेशातील सदाहरितपर्णी वृक्षांच्या घनदाट जंगलात भूतान मयूर जीवाजीवक संचार करतात.पश्चिम व पूर्व हिमालयातील जीवाजीवक, मोनल,कोकला,व चिर हे पक्षी दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे हिमालयातील त्याच्या निवासस्थानाच्या वर्षानुवर्षे संकोच ह्होत आहे.त्याचे संवर्धन होण्यासाठी त्या त्या परिसराचे संरक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे.

कुल: क्रौंच

ग्रुइड: क्रेन

५.१ क्रौंच Eastern Common Crane (Grus grus lilifordi)

५.२ कळ्या मानेचा क्रौंच cked Crane ( Grus nigricollis)

५.३ पांढऱ्या मनचा क्रौंच Hooded Crane (Grus monacha)

५.४ सैबेरियन क्रौंच Siberian or Great White Crane ( Grus leucogeranus)

क्रौंच:'सिंध,राजस्थान,गुजरात,पंजाब,उत्तर प्रदेश,पूर्वेकडील बिहार,ओरिसा,प.बंगाल,आणि मध्यप्रदेश,महाराष्ट्र,दक्षिणेकडे आंध्रप्रदेश,या प्रदेशांतील शेतीचे सपाट क्षेत्र आणि नदीकाठच्या भागात क्रौंच आढळतो.

कळ्या मानेचा क्रौंच': लडाख,अपतानीचे,खोरे,नेफा,तिबेटचे पठार,या प्रदेशांतील कापणी झालेले भातशेतीचे क्षेत्र व दलदलीमध्ये कळ्या मानेचा क्रौंच आढळून येतो.

पांढऱ्या मानेचा क्रौंच: आसाम व मणिपूर भागात येणारे हिवाळी पाहुणे म्हणजे पांढऱ्या मानेचा क्रौंच. या काळात तेथील दलदलीच्या क्षेत्रात ते आश्रय घेतात.

सैबेरीअन क्रौंच: वायव्य पाकिस्तान,उत्तर भारत,राजस्थान,(कोल्देव घना भरतपूर पक्षीअभयारण्य ) या प्रदेशांत येणारे हिवाळी पाहुणे म्हणजे सैबेरीअन क्रौंच.या क्षेत्रातील झिलानी व दलदलीच्या आश्रयाने ते राहतात. क्रौंच पक्षांची निवासस्थाने म्हणजे झिलानी व दलदली ही आहेत.उत्तरोत्तर ही क्षेत्रे अनेक कारणांनी नष्ट होत आहेत.

कुल: जालांगुलिक

हिलीऑनीरथिडी

६.१ जालांगुलिक:बांगला देश,पू.आसाम,या प्रदेशातील दलदलीच्या वनात जालांगुलिक आढळून येतात. परंतु गेल्या पन्नास वर्षात त्याची विश्वसनीय अशी नोंद केली गेली नाही.

कुल:माळढोक

ओटीडीडी :बसटड ७.१ छोटा माळढोकःEastern little Bustard (Otis tetra orientalis)

७.२ माळढोकःGreat Indian Bustard (Choriotis nigriceps)


७.३ होबारा माळढोक :Houbara Bustard ( Chamyaotis undulata macqueenii)

७.४ बंगाल तनमोर:begal florican (eupodotis bengalensis )

७.५ तनमोर: Leekh or Lesser florican (Sypheotis indica)

छोटा माळढोक:वायव्य पाकिस्तान,मक्रानचा किनारा,गीलागीट,काश्मीर,सिंध,हरियाना,उत्तर प्रदेश,या भागातील गवती कुरणे व शेतीच्या क्षेत्रात छोटे माळढोक आढळून येतात.हे हिवाळी पाहुणे आहेत.