Jump to content

भारतीय टपाल सेवा

भारतीय टपाल सेवा
प्रकार भारत सरकारची एकाधिकार सेवा
उद्योग क्षेत्र टपालसेवा पुरवणे
स्थापना १७६४
मुख्यालयनवी दिल्ली
संकेतस्थळइंडियापोस्ट.जीओव्ही.इन and 1 April 1774 mei Roj Mumbai and Mdras post office ni suru ki
एक भारतीय टपाल कार्यालय

भारतीय टपाल सेवा : भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स ॲन्ड टेलिग्राफ्स) इंडिया पोस्ट या ब्रॅंडनावाने चालविली जाते. देशभर पसरलेल्या एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे होय. देशाच्या दूरवरच्या आणि पोचायला अत्यंत अवघड भागातही पसरलेल्या या टपालसेवेच्या जाळ्यामार्फत अल्पबचत आणि इतर वित्तीय सेवाही चालविल्या जातात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रही येथे मिळते.

दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो.

इतिहास

सध्याच्या टपालव्यवस्थेची सुरुवात सतराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली. १६८८मध्ये मुंबई आणि मद्रास इथे कंपनी पोस्टची कार्यालये स्थापन झाली. मात्र त्याद्वारे केवळ कंपनीच्या टपालाचीच ने-आण होई. वॉरन हेस्टिंग्ज हा बंगाल प्रांताचा गव्हर्नर असताना त्याच्याकडे मुंबई आणि मद्रास इलाख्याच्या देखरेखीचे अधिकार होते. त्या काळात सन १७७४ मध्ये टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. पोस्टमास्टर जनरलची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आणि टपालसेवेसाठी पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकने टपालासोबत वापरायला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सर्व प्रेसिडेन्सीं अंतर्गतची टपाल सेवा एकसूत्री असावी असा विचार पुढे आला. त्यातूनच पहिला भारतीय टपाल कायदा, १८३७ हा अस्तित्वात आला. त्यात पुढे बदल करून १८५४चा टपाल कायदा अस्तित्वात आला व, त्याद्वारे देशात टपाल सेवेचा एकाधिकार हा टपाल खात्याला देण्यात आला. २०११पर्यंत त्यात बदल झालेला नाही. पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकने मागे पडून, १ ऑक्टोबर १८५४ पासून चिकट पार्श्वभाग असलेली टपाल तिकिटे वापरात आली.

बँकेत रूपांतर

डिजिटल इंडिया या अभियानांतर्गत, भारत सरकार टपाल कार्यालयांचे रूपांतर बँकांमध्ये करण्यात येणार आहे.[]

हे सुद्धा वाचा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ टपाल कार्यालयांचे बँकांमध्ये रूपांतर, पुढचे पाऊल,. १३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.