Jump to content

भारतीय जेवण

भारतामध्ये अनेक प्रथा अशा आहेत, ज्यांचा संबंध मनुष्याच्या आरोग्याशी आहे. यामधीलच एक प्रथा जमिनीवर बसून जेवण करण्याची आहे. आजही ज्या भारतीय घरांमध्ये जेवण पारंपारिक पद्धतीने वाढते जाते, ते जमिनीवर बसून अन्न ग्रहण करतात.

सध्याच्या काळात अनेक लोक जमिनीवर बसून जेवण करत नाहीत तर काही लोक टीव्हीसमोर बसून किंवा पलंगावर बसून जेवण करणे पसंत करतात. तुम्हाला हे आरामदायक वाटत असेल परंतु आरोग्यासाठी ही सवय ठीक नाही.

आपल्या पूर्वजांनी निश्चितपणे खूप विचार करून जमिनीवर सुखासनात बसून जेवण्याचे विधान सांगितले आहे. जमिनीवर बसून जेवण करण्याची सवय आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. येथे जाणून घ्या, या सवयीचे खास आणि महत्त्वपूर्ण फायदे...

१)वजन नियंत्रणात राहते -

जेव्हा तुम्ही सुखासनात बसता, तेव्हा तुमचा मेंदू शांत होतो. तुमच्या व्यवस्थितपणे जेवणावर लक्ष केंद्रित करू शकता. डायनिंग टेबलवर जेवण न करता सुखासनात बसून केल्याने खाण्याची गती संथ होते. यामुळे पोट आणि मेंदूला योग्य वेळेवर तृप्तीची जाणीव होते. अशाप्रकारे सुखासनात बसून जेवण केल्याने तुम्ही गरजेपेक्षा जास्त जेवण करण्यापासून दूर राहू शकता. जमिनीवर बसून जेवन केल्‍यानंतर पोट सुटत नाही. शिवाय अपचन, जळजळ, पोटासंबधीत विकार होत नाहीत.

२)पचन क्रिया व्यवस्थित राहते...

जेव्हा तुही पद्मासनात बसता तेव्हा तुमची श्रोणी(नाभी) पाठीचा खालील भाग, पोटाच्या जवळपासच्या आणि पोटाच्या मांसपेशींमध्ये तन्यता(ताणल्या जातात) येते. यामुळे चयापचय क्रिया व्यवस्थितपणे कार्य करते. या स्थितीमुळे तुमच्या पोटावर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त दबाव पडत नाही. यामुळे तुम्हाला खाण्यात आणि अन्न पचवण्यास मदत मिळते.

३)अन्न पचवणे सोपे -

सुखासनात बसून जेवण केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही जमिनीवर बसून जेवण करता तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे खाण्यासाठी थोडेसे पुढे वाकता आणि अन्न गिळण्यासाठी पुन्हा पूर्वस्थितीमध्ये येतात. अशाप्रकारे वारंवार पुढे आणि मागे वाकल्यामुळे तुमच्या पोटातील मांसपेशी सक्रिय होतात. यामुळे तुमच्या पोटातील अ‍ॅसिडही वाढते. यामुळे तुम्हाला अन्न पचवणे सोपे जाते.

४)कुटुंबाला एकत्रित ठेवते -

सामान्यतः जमिनीवर बसून जेवण्याची प्रथा एक कौटुंबिक गतिविधि आहे. योग्य वेळेवर संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे जेवण करत असेल तर एकमेकांमधील सामंजस्य वाढते. तुमच्या कुटुंबाशी समरस होण्याचा हा अतिशय उत्तम पर्याय आहे, कारण जमिनीवर बसून जेवण केल्याने तुमचे मन शांत राहते. यामुळे हा उपाय तुमच्या कुटुंबाला एकत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

५)वेळेआधीच म्हातारपण येऊ देत नाही...

जेवण करण्याची ही पारंपारिक पद्धत तुम्हाला वृद्धावस्थेपासून दूर ठेवते, कारण सुखासनात बसून जेवण केल्याने मणका आणि पाठीच्या समस्या होत नाहीत. सुखासनात बसून जेवल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत.

६)वय वाढू शकते -

एका संशोधनानुसार जे लोक जमिनीवर पद्मासन किंवा सुखासनात बसतात आणि कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता उठून उभे राहण्यास सक्षम असतात, त्यांची दीर्घ काळ जगण्याची शक्यता जास्त असते. या मुद्रेतून उठण्यासाठी जास्त लवचिकपणा आणि शारीरिक शक्तीची आवश्यकता असते.

७)डोकं शांत राहते -

जे लोक सुखासनात बसून जेवण करतात, त्यांचा मेंदू तणाव रहित राहण्याची शक्यता जास्त असते, कारण यामुळे मेंदू रीलॅक्स आणि तंत्रीका शांत होतात.जमिनीवर बसून जेवण केल्‍यांनतर एकाग्रता वाढते.

आयुर्वेदानुसार मन शांत ठेवून जेवण केल्यास अन्न व्यवस्थित पचते तसेच जेवल्यानंतर संतुष्टतेची जाणीव होते.

सुखासनात बसल्याने जठराग्नी प्रदीप्त होतो, त्यामुळे अन्नपचनात मदत मिळते. प्राणवायुला गती मिळते. यकृत व आमाशय दोघांचे कार्य सुलभरीत्या होते.

टेबल-खुर्चीवर बसून जेवल्याने शारीरिक उष्णता योग्यप्रकारे निर्माण होत नाही, त्यामुळे अन्नपचनात मदत मिळत नाही. यकृत व आमाशय व मलाशयाला हानी पोहोचते. पोटाचे विकार उद्भवतात, मूत्ररोग वाढतो.