भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१८-१९
महिलांच्या दौऱ्यासाठी पहा : भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१८-१९
भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१८-१९ | |||||
न्यू झीलंड | भारत | ||||
तारीख | २३ जानेवारी – १० फेब्रुवारी २०१९ | ||||
संघनायक | केन विल्यमसन | विराट कोहली (१-३ ए.दि.) रोहित शर्मा (४,५ ए.दि. आणि ट्वेंटी२०) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रॉस टेलर (१७७) | अंबाटी रायडू (१९०) | |||
सर्वाधिक बळी | ट्रेंट बोल्ट (१२) | मोहम्मद शमी (९) युझवेंद्र चहल (९) | |||
मालिकावीर | मोहम्मद शमी (भारत) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | टिम सिफर्ट (१३९) | रोहित शर्मा (८९) | |||
सर्वाधिक बळी | डॅरियल मिचेल (४) मिचेल सॅंटनर (४) | कृणाल पंड्या (४) खलील अहमद (४) | |||
मालिकावीर | टिम सिफर्ट (न्यू झीलंड) |
भारत क्रिकेट संघ २३ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ दरम्यान ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर जाणार् आहे.[१] ट्वेंटी२० मालिकेतील सामने भारतीय महिलांच्या सामन्यानंतर त्याच मैदानावर होतील. भारताने एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली.
संघ
एकदिवसीय | ट्वेंटी२० | ||
---|---|---|---|
न्यूझीलंड[२] | भारत[३] | न्यूझीलंड[४] | भारत[३] |
|
|
|
|
एकदिवसीय आणि ट्वेंटी२० मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली तर त्याच्याजागी मोहम्मद सिराजची भारतीय संघात करण्यात आली.[५] सिद्धार्थ कौललापण ट्वेंटी२० संघात घेतले गेले.
११ जानेवारी रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय कार्यक्रम कॉफी विथ करणवर केलेल्या विवादित वक्तव्यामुळे लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्याला एकदिवसीय मालिकेतून तसेच न्यू झीलंडच्या संपूर्ण दौऱ्यातून निलंबीत केले.[६][७] त्यांच्याजागी विजय शंकर आणि शुभमन गिलची संघात निवड झाली..[८] शेवटच्या दोन एकदिवसीय सामने आणि ट्वेंटी२० मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देऊन उर्वरीत दौऱ्यासाठी रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधाद करण्यात आले.[९][१०]
२४ जानेवारीला बीसीसीआयने हार्दिक पंड्यावरील निलंबन रद्द करत त्याला न्यू झीलंड दौऱ्यासाठी रवाना केले.[११] शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी डग ब्रेसवेल व इश सोधीला विश्रांती देत न्यू झीलंडच्या संघात जेम्स नीशम व टॉड ॲस्टलची निवड करण्यात आली.[१२]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
न्यूझीलंड १५७ (३८ षटके) | वि | भारत १५६/२ (३४.५ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- मावळत्या सुर्यप्रकाशामुळे भारतासमोर ४९ षटकांमध्ये १५६ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
- मोहम्मद शमी (भा) भारतातर्फे खेळताना कमी सामन्यांमध्ये १०० एकदिवसीय बळी जलद घेणारा भारतीय गोलंदाज ठरला (५६ सामने).[१३]
- शिखर धवनच्या (भा) ५,००० एकदिवसीय धावा पूर्ण.[१४]
- केदार जाधवचा (भा) ५०वा एकदिवसीय सामना.[१५]
२रा सामना
भारत ३२४/४ (५० षटके) | वि | न्यूझीलंड २३४ (४०.२ षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- ट्रेंट बोल्टच्या (न्यू) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील ४०० बळी पूर्ण.[१६]
- धावांच्या बाबतीत विचार करता भारताचा न्यू झीलंडवरील एकदिवसीय सामन्यात सर्वात मोठा विजय.[१७]
३रा सामना
न्यूझीलंड २४३ (४९ षटके) | वि | भारत २४५/४ (४३ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
४था सामना
भारत ९२ (३०.५ षटके) | वि | न्यूझीलंड ९३/२ (१४.४ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी.
- शुभमन गिल (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- रोहित शर्माचा (भा) २००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[१८]
- ट्रेंट बोल्टने (न्यू) एकदिवसीय सामन्यात पाचव्यांदा पाच बळी घेऊन न्यू झीलंडच्या रिचर्ड हॅडलीशी बरोबरी केली.[१९]
- ट्रेंट बोल्ट (न्यू) न्यू झीलंडमध्ये १०० बळी घेणारा दुसरा गोलंदाज बनला आणि सामन्याच्या संदर्भात देशाच्या कोणत्याही गोलंदाजाकडून हा मैलाचा दगड गाठणारा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला (४९).[१९]
- न्यू झीलंडमध्ये भारताची एकदिवसीय सामन्यातील निचांकी धावसंख्या.[२०]
- एकदिवसीय सामन्यांमधील उर्वरित चेंडूंच्या बाबतीतही हा भारताचा सर्वात मोठा पराभव होता.[२१]
५वा सामना
भारत २५२ (४९.५ षटके) | वि | न्यूझीलंड २१७ (४४.१ षटके) |
अंबाटी रायडू ९० (११३) मॅट हेन्री ४/३५ (१० षटके) | जेम्स नीशम ४४ (३२) युझवेंद्र चहल ३/४१ (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
न्यूझीलंड २१९/६ (२० षटके) | वि | भारत १३९ (१९.२ षटके) |
महेंद्रसिंग धोनी ३९ (३१) टिम साउदी ३/१७ (४ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- डॅरियल मिचेल (न्यू) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- ट्वेंटी२०त भारताचा धावांच्या बाबतीत विचार करता सर्वात मोठा पराभव.
२रा सामना
न्यूझीलंड १५८/८ (२० षटके) | वि | भारत १६२/३ (१८.५ षटके) |
कॉलिन दि ग्रॅंडहॉम ५० (२८) कृणाल पंड्या ३/२८ (४ षटके) | रोहित शर्मा ५० (२९) डॅरियल मिचेल १/१५ (१ षटक) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- रोहित शर्मा (भा) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त १०० षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरला.
- न्यू झीलंडमध्ये भारताचा न्यू झीलंडवर ट्वेंटी२०त पहिला विजय.
३रा सामना
न्यूझीलंड २१२/४ (२० षटके) | वि | भारत २०८/६ (२० षटके) |
कॉलीन मन्रो ७२ (४०) कुलदीप यादव २/२६ (४ षटके) | विजय शंकर ४३ (२८) डॅरियल मिचेल २/२७ (३ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- ब्लेर टिकनर (न्यू) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
संदर्भ
- ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).
- ^ "९ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर सॅंटनरचे एकदिवसीय संघात पुनरागमन".
- ^ a b "ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय तर न्यू झीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर". 2018-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-25 रोजी पाहिले.
- ^ "ब्लेर टिकनर आणि मिचेल यांना पदार्पणाची संधी".
- ^ "बुमराहला विश्रांती ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड एकदिवसीयसाठी सिराज रवाना".
- ^ "पंड्या आणि राहुल निलंबित".
- ^ "विवादित प्रकरण भोवले".
- ^ "शुभमन गिल ला भारतीय संघात स्थान".
- ^ "कोहलीला विश्रांती, रोहित करणार नेतृत्व".
- ^ "ट्वेंटी२० मालिकेची धुरा रोहित शर्माकडे".
- ^ "पंड्या न्यू झीलंडसाठी रवाना, के.एल राहुल भारत 'अ' करता खेळणार".
- ^ "नीशम आणि टॉडचे संघात पुनरागमन".
- ^ "मोहम्मद शमी १०० ए.दि. बळी घेणारा जलद भारतीय गोलंदाज". २३ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
- ^ "शिखर धवनची ब्रायन लाराशी बरोबरी, डावखुऱ्या फलंदाजातर्फे सर्वात जलद ५,००० धावा पूर्ण करण्याच्या विक्रमाशी बरोबरी". २४ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
- ^ "भारत वि न्यू झीलंड: नेपियर मधील पहिला एकदिवसीय सामन्याची आकडेवारी". २४ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
- ^ "अष्टपैलु भारताची २-० ने मालिकेत आघाडी".
- ^ "रोहित आणि फिरकीच्या जोरावर भारत अजेय".
- ^ "भारत वि. न्यू झीलंड ४था ए.दि. : रोहित २०० नंबरी".
- ^ a b "बोल्टचे आक्रमण, भारत ९२ वर गारद".
- ^ "बोल्टच्या माऱ्यासमोर भारताची धुळधाण, किवींचा मोठा विजय".
- ^ "भारताची निराशाजनक कामगिरी, चौथा सामना गमावला".