भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९२-९३ याच्याशी गल्लत करू नका.
भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३ | |||||
झिम्बाब्वे | भारत | ||||
तारीख | १८ – ३० ऑक्टोबर १९९२ | ||||
संघनायक | डेव्हिड हॉटन | मोहम्मद अझहरुद्दीन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | झिम्बाब्वे संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
भारतीय क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९९२ दरम्यान एक कसोटी सामना आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. एप्रिल १९९२ च्या आयसीसी सर्वसाधारण सभेत आयसीसीने झिम्बाब्वेला संपूर्ण सदस्याचा दर्जा देत अधिकृत कसोटी सामने खेळण्याची अनुमती दिली. झिम्बाब्वेने भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले. डेव्हिड हॉटनच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वे संघाने एकमेव कसोटी अनिर्णित राखली. पदार्पणाच्या कसोटीत पराभव टाळणारा झिम्बाब्वे पहिला वहिला देश ठरला. एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना भारताने ३० धावांनी जिंकला.
झिम्बाब्वेची मालिका झाल्यानंतर भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला.
कसोटी मालिका
एकमेव कसोटी
१८-२२ ऑक्टोबर १९९२ धावफलक |
झिम्बाब्वे | वि | भारत |
- नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी.
- झिम्बाब्वेचा पहिला कसोटी सामना.
- झिम्बाब्वेच्या भूमीवर पहिल्यांदा कसोटी सामना खेळवला गेला. भारताने झिम्बाब्वेमध्ये पहिली कसोटी खेळली तसेच झिम्बाब्वेचा देखील मायभूमीवरील पहिला कसोटी सामना.
- झिम्बाब्वे आणि भारत या दोन देशांमधला पहिला कसोटी सामना.
- केव्हिन आर्नॉट, एडो ब्रान्डेस, मार्क बर्मेस्टर, अॅलिस्टेर कॅम्पबेल, गॅरी क्रॉकर, अँडी फ्लॉवर, ग्रँट फ्लॉवर, डेव्हिड हॉटन, माल्कम जार्व्हिस आणि अँडी पायक्रॉफ्ट (झि) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतर्फे कसोटी खेळल्यानंतर जॉन ट्रायकोस याने झिम्बाब्वेतर्फे कसोटी पदार्पण केले.
- पदार्पणाच्या कसोटीत पराभव टाळणारा ऑस्ट्रेलियानंतर झिम्बाब्वे दुसरा देश ठरला.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
एकमेव एकदिवसीय सामना
२५ ऑक्टोबर १९९२ धावफलक |
भारत २३९ (४९.४ षटके) | वि | झिम्बाब्वे २०९ (४९.१ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- झिम्बाब्वेच्या भूमीवर खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- झिम्बाब्वेत भारताने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला तसेच झिम्बाब्वेने देखील मायभूमीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- क्रेग इव्हान्स, डेव्हिड ब्रेन, गॅरी क्रॉकर आणि ग्रँट फ्लॉवर (झि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.