Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१
ऑस्ट्रेलिया
भारत
तारीख२७ नोव्हेंबर २०२० – १९ जानेवारी २०२१
संघनायकॲरन फिंच (ए.दि., १ली आणि ३री ट्वेंटी२०)
मॅथ्यू वेड (२री ट्वेंटी२०)
टिम पेन (कसोटी)
विराट कोहली (ए.दि., ट्वेंटी२०, १ली कसोटी)
अजिंक्य रहाणे (२री-४थी कसोटी)
कसोटी मालिका
निकालभारत संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावामार्नस लेबसचग्ने (४२६) ऋषभ पंत (२७४)
सर्वाधिक बळीपॅट कमिन्स (२१) मोहम्मद सिराज (१३)
मालिकावीरपॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)
एकदिवसीय मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाॲरन फिंच (२४९) हार्दिक पंड्या (२१०)
सर्वाधिक बळीॲडम झम्पा (७) मोहम्मद शमी (४)
मालिकावीरस्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
२०-२० मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावामॅथ्यू वेड (१४५) विराट कोहली (१३४)
सर्वाधिक बळीमिचेल स्वेपसन (५) टी. नटराजन (६)
मालिकावीरहार्दिक पंड्या (भारत)

भारत क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०२० - जानेवारी २०२१ दरम्यान ४ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ही २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली गेली तर वनडे मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगअंतर्गत खेळवली गेली. भारतीय क्रिकेट मार्च २०२० मध्ये कोरोना व्हायरसमुळे बंद पडल्यानंतरची ही भारताची पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. ॲडलेड येथील पहिली कसोटी ही दिवस/रात्र कसोटी आहे.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ ने जिंकली. ट्वेंटी२० मालिका भारताने २-१ ने जिंकली. कसोटी मालिका २-१ अशी जिंकत भारताने बॉर्डर-गावसकर चषक राखला.

सराव सामने

४० षटकांचा सामना: सी.के. नायडू XI वि. रणजितसिंहजी XI

धावफलक (इंडिया न्यूझ संकेतस्थळावरील बातमी)

२२ नोव्हेंबर २०२० रोजी सिडनी मध्ये भारतीय संघातच आंतर-संघीय सी.के. नायडू XI वि. रणजितसिंहजी XI असा ४० षटकांचा सराव सामना खेळवण्यात आला. विराट कोहलीने सी.के. नायडू XIचे नेतृत्व केले आणि लोकेश राहुलने रणजितसिंहजी XIचे नेतृत्व केले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू सी.के. नायडू आणि रणजितसिंहजी यांच्यावरून दोन्ही संघांची नावे ठेवली गेली. लोकेश राहुलच्या नेतृत्वात असलेल्या रणजितसिंहजी XI संघाने पहिली फलंदाजी केली. शिखर धवन, मयंक अगरवाल आणि कर्णधार लोकेश राहुलच्या दमदार फलंदाजीमुळे रणजितसिंहजी XI ने ४० षटकात २३५ धावा केल्या. दुसऱ्या डावात विराट कोहलीच्या जबरदस्त अश्या ९१ धावांच्या खेळीने सी.के. नायडू XI संघाने सामना २६ चेंडू राखत जिंकला.

नोट : सामन्याचे अधिकृत धावफलक कुठेच उपलब्ध नाही. भारतीय क्रिकेट संघाच्या इंस्टाग्राम पानावरून सामन्याची माहिती मिळाली.

तीनदिवसीय सामना:ऑस्ट्रेलिया अ वि. भारत

६-८ डिसेंबर २०२०
धावफलक
भारत
वि
ऑस्ट्रेलिया अ
२४७/९घो (९३ षटके)
अजिंक्य रहाणे ११७* (२४२)
जेम्स पॅटिन्सन ३/५८ (१९ षटके)
३०६/९घो (९५ षटके)
कॅमेरॉन ग्रीन १२५* (२०२)
उमेश यादव ३/४८ (२० षटके)
१८९/९घो (६१ षटके)
वृद्धिमान साहा ५४* (१००)
मार्क स्टीकेटी ५/३७ (१५ षटके)
५२/१ (१५ षटके)
मार्कस हॅरिस २५* (४२)
उमेश यादव १/१४ (४ षटके)
सामना अनिर्णित.
ड्रममोने ओव्हल, सिडनी
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • सामन्याला प्रथम-श्रेणी दर्जा देण्यात आला.


तीनदिवसीय सामना:ऑस्ट्रेलिया अ वि. भारत

११-१३ डिसेंबर २०२० (दि/रा)
धावफलक
भारत
वि
ऑस्ट्रेलिया अ
१९४ (४८.३ षटके)
जसप्रीत बुमराह ५५* (५७)
जॅक विल्डरमथ ३/१३ (८ षटके)
१०८ (३२.२ षटके)
ॲलेक्स कॅरे ३२ (३८)
नवदीप सैनी ३/१९ (५.२ षटके)
३८६/४घो (९० षटके)
हनुमा विहारी १०४* (१९४)
मार्क स्टेकिट २/५४ (१६ षटके)
३०७/४ (७५ षटके)
जॅक विल्डरमथ १११* (२१९)
मोहम्मद शमी २/५८ (१३ षटके)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • पॅट्रीक रो (ऑ.अ.) याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले.


२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

विश्वचषक सुपर लीग
२७ नोव्हेंबर २०२०
१४:४० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३७४/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३०८/८ (५० षटके)
ॲरन फिंच ११४ (१२४)
मोहम्मद शमी ३/५९ (१० षटके)
हार्दिक पंड्या ९० (७६)
ॲडम झम्पा ४/५४ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ६६ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया‌)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : ऑस्ट्रेलिया‌ - १०, भारत- ० .


२रा सामना

विश्वचषक सुपर लीग
२९ नोव्हेंबर २०२०
१४:४० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३८९/४ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३३८/९ (५० षटके)
स्टीव्ह स्मिथ १०४ (६४)
हार्दिक पंड्या १/२४ (४ षटके)
विराट कोहली ८९ (८७)
पॅट कमिन्स ३/६७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ५१ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : ऑस्ट्रेलिया‌ - १०, भारत- ० .

३रा सामना

विश्वचषक सुपर लीग
२ डिसेंबर २०२०
१४:४० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३०२/५ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२८९ (४९.३ षटके)
हार्दिक पंड्या ९२* (७६)
ॲश्टन अगर २/४४ (१० षटके)
ॲरन फिंच ७५ (८२)
शार्दूल ठाकूर ३/५१ (१० षटके)
भारत १३ धावांनी विजयी.
मानुका ओव्हल, कॅनबेरा
सामनावीर: हार्दिक पंड्या (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • कॅमेरॉन ग्रीन (ऑ) आणि टी. नटराजन (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : भारत - १०, ऑस्ट्रेलिया - ०.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

४ डिसेंबर २०२०
१९:१० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१६१/७ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५०/७ (२० षटके)
ॲरन फिंच ३५ (२६)
युझवेंद्र चहल ३/२५ (४ षटके)
भारत ११ धावांनी विजयी.
मानुका ओव्हल, कॅनबेरा
सामनावीर: युझवेंद्र चहल (भारत)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • टी. नटराजन (भा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

६ डिसेंबर २०२०
१९:१० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९४/५ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९५/४ (१९.४ षटके)
मॅथ्यू वेड ५८ (३२)
टी. नटराजन २/२० (४ षटके)
शिखर धवन ५२ (३६)
मिचेल स्वेपसन १/२५ (४ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: हार्दिक पंड्या (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • डॅनियेल सॅम्स (ऑ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


३रा सामना

८ डिसेंबर २०२०
१९:१० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८६/५ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७४/७ (२० षटके)
विराट कोहली ८५ (६१)
मिचेल स्वेपसन ३/२३ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया १२ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: मिचेल स्वेपसन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.


१ली कसोटी

१७-२१ डिसेंबर २०२० (दि/रा)
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
बॉर्डर-गावसकर चषक
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४४ (९३.१ षटके)
विराट कोहली ७४ (१८०)
मिचेल स्टार्क ४/५३ (२१ षटके)
१९१ (७२.१ षटके)
टिम पेन ७३* (९९)
रविचंद्रन अश्विन ४/५५ (१८ षटके)
३६ (२१.२ षटके)
मयंक अगरवाल ९ (४०)
जोश हेजलवूड ५/८ (५ षटके)
९३/२ (२१ षटके)
ज्यो बर्न्स ५१* (६३)
रविचंद्रन अश्विन १/१६ (६ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: टिम पेन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • ऑस्ट्रेलियन भूमीवर भारताची पहिली दिवस/रात्र कसोटी.
  • कॅमेरॉन ग्रीन (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.
  • मयंक अगरवाल (भा) याच्या १,००० कसोटी धावा पूर्ण.
  • पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड (ऑ) या दोघांनी अनुक्रमे १५० आणि २०० कसोटी बळी पूर्ण केले.
  • दुसऱ्या डावातील ३६ ही धावसंख्या भारताची कसोटीतील सर्वात निचांकी धावसंख्या आहे. कसोटीच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले की एका डावामध्ये सर्व ११ फलंदाज दुहेरी धावसंख्येपर्यंत पोहोचु शकले नाहीत.
  • कसोटी विश्वचषक गुण - ऑस्ट्रेलिया - ३०, भारत - ०.

२री कसोटी

२६-३० डिसेंबर २०२०
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
बॉर्डर-गावसकर चषक
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
१९५ (७२.३ षटके)
मार्नस लेबसचग्ने ४८ (१३२)
जसप्रीत बुमराह ४/५६ (१६ षटके)
३२६ (११५.१ षटके)
अजिंक्य रहाणे ११५ (२२३)
नॅथन ल्यॉन ३/७२ (२७.१ षटके)
२०० (१०३.१ षटके)
कॅमेरॉन ग्रीन ४५ (१४६)
मोहम्मद सिराज ३/३७ (२१.३ षटके)
७०/२ (१५.५ षटके)
शुभमन गिल ३५* (३६)
मिचेल स्टार्क १/२० (४ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: अजिंक्य रहाणे (भारत)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • बॉक्सिंग डे कसोटी.
  • मोहम्मद सिराज आणि शुभमन गिल (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
  • ऑस्ट्रेलियामध्ये कर्णधार म्हणून खेळली गेलेली पहिलीच कसोटी जिंकणारा अजिंक्य रहाणे हा पहिला भारतीय कर्णधार ठरला.
  • सलग दोन बॉक्सिंग डे कसोटी जिंकणारा भारत पहिलाच आशियाई देश.
  • २०१०च्या दशकात ऑस्ट्रेलियन बॉक्सिंग डे कसोटी जिंकणारा भारत एकमेव विदेशी देश ठरला.
  • कसोटी विश्वचषक गुण - भारत - ४०, ऑस्ट्रेलिया - ०.


३री कसोटी

७-११ जानेवारी २०२१
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
बॉर्डर-गावसकर चषक
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
३३८ (१०५.४ षटके)
स्टीव्ह स्मिथ १३१ (२२६)
रविंद्र जडेजा ४/६२ (१८ षटके)
२४४ (१००.४ षटके)
शुभमन गिल ५० (१०१)
पॅट कमिन्स ४/२९ (२१.४ षटके)
३१२/६घो (८७ षटके)
कॅमेरॉन ग्रीन ८४ (१३२)
नवदीप सैनी २/५४ (१६ षटके)
३३४/५ (१३१ षटके)
रिषभ पंत ९७ (११८)
जोश हेजलवूड २/३९ (२६ षटके)
सामना अनिर्णित.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)


४थी कसोटी

१५-१९ जानेवारी २०२१
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
बॉर्डर-गावसकर चषक
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
३६९ (११५.२ षटके)
मार्नस लेबसचग्ने १०८ (२०४)
टी. नटराजन ३/७८ (२४.२ षटके)
३३६ (१११.४ षटके)
शार्दुल ठाकूर ६७ (११५)
जोश हेजलवूड ५/५७ (२४.४ षटके)
२९४ (७५.५ षटके)
स्टीव्ह स्मिथ ५५ (७४)
मोहम्मद सिराज ५/७३ (१९.५ षटके)
३२९/७ (९७ षटके)
शुभमन गिल ९१ (१४६)
पॅट कमिन्स ४/५५ (२४ षटके)
भारत ३ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: ऋषभ पंत (भारत)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
  • टी. नटराजन (भा) हा भारताकडून कसोटी खेळणारा ३००वा क्रिकेट खेळाडू ठरला.
  • १९८८ नंतर प्रथमच गॅब्बा वर ऑस्ट्रेलियन संघ कसोटी सामना हरला.
  • गॅब्बावर भारताचा पहिला कसोटी विजय.
  • ऑस्ट्रेलियात भारताने पहिल्यांदाच कसोटीमध्ये ३०० पेक्षा आधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला.
  • या सामन्याच्या निकालामुळे बॉर्डर-गावसकर चषक भारताने राखला.
  • कसोटी विश्वचषक गुण - भारत - ३०, ऑस्ट्रेलिया - ०.


भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे
१९४७-४८ | १९६७-६८ | १९७७-७८ | १९८०-८१ | १९८५-८६ | १९९१-९२ | १९९९-२००० | २००३-०४ | २००७-०८ | २०११-१२ | २०१४-१५ | २०१५-१६ | २०१८-१९ | २०२०-२१