Jump to content

भारतीय अणुऊर्जा आयोग

भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती . या विचारातूनच त्यांनी १० ऑगस्ट १९४८ , रोजी अणुउर्जा आयोगाची स्थापना केली . आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ.होमी भाभा याची नेमणूक झाली . अणु ऊर्जेपासून वीजनिर्मिती , अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे , यासाठी प्रगत तंत्रज्ञान उभारणे,न्यानो तंत्रज्ञान विकसित करणे अशी अणुउर्जा आयोगाची उद्दिष्टे होती . १९५६ मध्ये या विभागाने अणुउर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी 'अप्सरा' कार्यान्वित केली.

१९६९ मध्ये अणुऊर्जेपासून विद्युतनिर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना झाली . थोरियमचा विद्युतनिर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तामिळनाडू राज्यात कल्पकम येथे 'रियाक्टर रिसर्च सेंटर' सुरू करण्यात आले . अणुउर्जेच्या विकासात रियाक्टएर्सची भूमिका महत्त्वाची असते . अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या 'जड पाण्याचे ' कारखाने वडोदरा , ताल्चेर , तुतीकोरीन, कोटा इत्यादी ठिकाणी उभारले आहेत . अणुभट्टयासाठी जड पाण्याचे देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर उत्पादन व संशोधन करण्यासाठी 'जड पाण्याचे उपक्रम' या संस्थेची उभारणी करण्यात आली. पुढे याच संस्थेचे 'मोठ्या प्रमाणात जलमार्ग' असे नामकरण झाले.