भारती सिंह
भारती सिंह | |
---|---|
भारती सिंह | |
जन्म | ३ जुलै, १९८४ [१]अमृतसर, पंजाब, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | २०१२ ते आजतागायत |
भाषा | पंजाबी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | • कॉमेडी सर्कस, • द कपिल शर्मा शो, • खतरा खतरा खतरा |
पती | हर्ष लिंबाचिया (ल. २०१७) [२] |
भारती सिंह (जन्म: ३ जुलै १९८४)[१] ह्या एक दूरचित्रवाहिनी तसेच भारतीय चित्रपट सृष्टीतील विनोदी कलाकार आहेत. सिंह यांनी असंख्य 'हास्यप्रधान लघुमालिका (कॉमेडी स्केच शो)' तयार केल्या आहेत. तसेच विविध 'पुरस्कार वितरण कार्यक्रमांचे' सूत्रसंचालन देखील केले आहे.
त्यांनी 'झलक दिखला जा' (२०१२)[३], 'नच बलिये-८' (२०१७)[४] आणि 'फियर फॅक्टर:खतरों के खिलाडी-९' (२०१९)[५] या 'वास्तव प्रदर्शनी (रिअॅलिटी शो)' मध्ये भाग घेतला होता. 'कलर्स टिव्ही' वरील 'खतरा खतरा खतरा' या कार्यक्रमातील भारतीचा सहभाग प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.[६] या कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती भारतीचेचे पती हर्ष लिंबाचिया यांची होती. इ.स. २०१६ मधील 'फोर्ब्स इंडिया'च्या 'प्रसिद्ध १०० भारतीय व्यक्तिमत्त्वे' (टॉप १००-सेलिब्रिटी)च्या यादीत प्रथमच भारतीचा समावेश झाला. त्यानंतर सलग २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये भारतीचे नाव या यादीत कायम राहिले.[७][८]
वैयक्तिक आयुष्य
भारती सिंहचे वडील नेपाळी वंशाचे होते, तर त्यांच्या आई पंजाबी हिंदू आहेत. भारती दोन वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. तसेच भारतीला एक बहीण आणि एक भाऊ आहे[९] ३ डिसेंबर २०१७ रोजी भारतीने पटकथा लेखक हर्ष लिंबाचिया यांच्याशी लग्न केले.[२] भारती सिंह यांनी तिरंदाजी आणि पिस्तूल नेमबाजीमध्येही राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवले आहे.[१०]
२१ नोव्हेंबर २०२१ रोजी, अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) भारती यांच्या निवासस्थानी एक झडती घेतली, त्यात ८६.५ ग्रॅम भांग नावाचा मादक पदार्थ सापडला. भारती आणि हर्ष यांना चौकशीसाठी नेण्यात आले आणि नंतर एनसीबीने अटक देखील केली. दोन दिवसांच्या चौकशीनंतर त्यांना २३ नोव्हेंबर २०२ रोजी जामीन मंजूर करण्यात आला.[११][१२][१३]
अभिनयाची कारकीर्द
भारती 'स्टार वन' दूरचित्रवाहिनी वरील उत्स्फूर्त विनोदी (स्टँड-अप कॉमेडी रिअॅलिटी) मालिका 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज (सीझन ४)'ची दुसरी उपविजेता होती, या कार्यक्रमातील भारतीच्या 'लल्ली' नावाच्या पात्राचे मोठे कौतुक झाले. त्यानंतर विविध सहकलाकारांसह भारती 'कॉमेडी सर्कस ३ का तडका', 'कॉमेडी सर्कस महासंग्राम', 'कॉमेडी सर्कस के सुपरस्टार', 'कॉमेडी सर्कस का जादू', 'ज्युबिली कॉमेडी सर्कस', 'कॉमेडी सर्कस के तानसेन' मध्ये दिसली.[१४][१५]
भारती ने 'इंडियाज गॉट टॅलेंट ५ (२०१४)', इंडियाज गॉट टॅलेंट ६ (२०१६) आणि इंडियाज गॉट टॅलेंट ७ (२०१६) आदित्यादी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील केले आहे.
अभिनय सूची
दूरचित्रवाहिनी
वर्ष | कार्यक्रम | पात्र | सहकलाकार | स्वरूप | चॅनेल | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|
२००८ | द ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेंज | प्रतियोगी | स्टैंड अप कॉमेडी | स्टार वन | दूसरी रनर अप | |
२००९ | कॉमेडी सर्कस ३ का तड़का | परेश गणात्रा आणि शरद केलकर | सोनी टीवी | — | ||
२०१० | कॉमेडी सर्कस महा संगम | परेश गणात्रा आणि शरद केलकर [१६] | ||||
कॉमेडी सर्कस के सुपरस्टार्स | परेश गणात्रा | |||||
कॉमेडी सर्कस का जादू | अभिषेक | रनर अप | ||||
जुबली कॉमेडी सर्कस | मनीष पॉल | |||||
२०११ | कॉमेडी सर्कस के तानसेन | अभिजीत सावंत | ||||
कॉमेडी सर्कस का नया दौर | सिद्धार्थ जाधव | |||||
२०१२ | कॉमेडी सर्कस - कहानी कॉमेडी सर्कस की | सिद्धार्थ जाधव | निष्काषित | |||
कॉमेडी सर्कस के अजूबे | सिद्धार्थ जाधव आणि विकास गिरी | अनुपलब्ध | ||||
कॉमेडी सर्कस के महाबली | सिद्धार्थ सागर व इतर | |||||
झलक दिखला जा ५ | सेविओ बार्नेस | नृत्य(डांस) | कलर्स टीव्ही | २२ सप्टेंबर २०१२ | ||
एफ आय आर | कमसिन आहा | कॉमेडी | सब टीवी | |||
बिग बॉस ६ | अतिथि | रियालिटी | कलर्स टीव्ही | |||
२०१३ | बिग बॉस ७ | |||||
नच बलिए ६ | स्टार प्लस | |||||
इंडियाज़ गॉट टेलेंट | होस्ट | कलर्स टीव्ही | ||||
बाल वीर | भारती मासी | कॉमेडी | सब टीवी | |||
२०१४ | गैंग्स ऑफ़ हंसीपुर | प्रतियोगी | झी टीवी | |||
दिल से नाचें इंडिया वाले | स्वयं | डांस | झी टीव्ही | |||
कॉमेडी क्लासेस | डांस टीचर भारती | कृष्णा अभिषेक | सिटकॉम | लाइफ ओके |
चित्रपट
वर्ष | चित्रपट | भाषा |
---|---|---|
२०११ | एक नूर | पंजाबी |
२०१२ | यमले जट यमले | पंजाबी |
२०१२ | खिलाड़ी ७८६ | हिंदी |
२०१३ | जट एंड जूलियट २ | पंजाबी |
२०१३ | रंगन स्टाइल | कन्नड़] |
पुरस्कार
वर्ष | पुरस्कार | वर्ग | कशासाठी | परिणाम |
---|---|---|---|---|
2011 | न्यू टैलेंट अवार्ड्स | बेस्ट न्यू एक्टर इन अ कॉमिक रोल | प्यार में ट्विस्ट | विजयी |
2012 | इंडियन टेलीविज़न अकैडमी अवॉर्ड्स | बेस्ट एक्ट्रेस -कॉमेडी | कहानी कॉमेडी सर्कस की | |
पीपलस चॉइस अवॉर्ड्स इंडिया | ||||
2013 | लायंस गोल्ड अवॉर्ड्स | बेस्ट कॉमेडियन (फीमेल) |
संदर्भ
- ^ a b "Happy Birthday Bharti Singh: A woman who lives life queen size". 4 July 2018.
- ^ a b "Bharti Singh and Haarsh Limbachiyaa are wife and husband now. See pics and videos" (इंग्रजी भाषेत). 3 December 2017. १९ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Bharti Singh eliminated from Jhalak Dikhhla Jaa". 22 September 2012 रोजी पाहिले.
- ^ "Nach Baliye 8 contestants: From Bharti-Harsh, Divyanka-Vivek to Sanaya-Mohit, Dipika-Shoaib; Get the final names of celebrity couples participating on Star Plus dance reality show". 30 March 2017.
- ^ "Khatron Ke Khiladi 9: From Shamita Shetty to Bharti Singh, here are the confirmed list of contestants". 12 July 2018.
- ^ "Khatra Khatra Khatra review: Bharti Singh's jokes on her husband Haarsh are more entertaining than the challenges" (इंग्रजी भाषेत). १९ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Bharti Singh" (इंग्रजी भाषेत). १९ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "2016 Celebrity 100" (इंग्रजी भाषेत). १९ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Bharti Singh, who lost her dad at two, says she has no photos of him at home: 'I don't allow anyone to put them up'" (इंग्रजी भाषेत). १९ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Brave move". The Hindu (इंग्रजी भाषेत). 14 June 2012. १९ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "NCB arrests comedian Bharti Singh after cannabis seizure from her house". The Hindu (इंग्रजी भाषेत). Press Trust of India. 21 November 2020. १९ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Comedian Bharti Singh, husband remanded in judicial custody till December 4". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 22 November 2020. १९ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Mumbai: Bharti Singh, husband granted bail in drug consumption case | Mumbai News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). १९ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Bharti Singh's birthday surprise on Jhalak sets!". The Times of India. 4 July 2012. 14 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "She can dance too!". Hindustan Times. 10 June 2012. 11 June 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Comedy Circus Mahasangram begins". द टाइम्स ऑफ़ इंडिया (इंग्रजी भाषेत). 6 February 2010. 24 July 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील भारती सिंह चे पान (इंग्लिश मजकूर)