भारतामधील प्रमुख बंदरे
भारतामधील प्रमुख बंदरे.
भारतामध्ये एकूण १3 प्रमुख बंदरे असून शिवाय १८५ लहान बंदरे आहेत.
१3प्रमुख बंदरे खालील प्रमाणे आहेत.:-
१.कांडला गुजरात
२.मुंबई
३.जवाहरलाल नेहरू बंदर (न्हावा शेवा)
४.मार्मागोva
५.नवीन मंगरूळ
६.कोचीन
७.तुतीकोरीन
८.विशाखापट्टण
९..चेन्नई
१०.एन्नोरे
११.पारादीप.
१२.हल्दिया (कोलकात्ता) [१] ही सर्व प्रमुख बंदरे ७व्या 13.पोर्ट ब्लेअर पोर्ट (अंदमान आणि निकोबार) पूर्व किनारपट्टीवरील 7वे बंदर आहे)7अनुसूचीनुसार केेंद्र सरकारच्या अधीन येतात.
कांडला
हे बंदर गुजरात राज्यामध्ये कच्छच्या खाडीमध्ये असून येथे प्रामुख्याने तेलाची आयात होते. या बंदराचा विकास स्वातंत्र्यानंतर चालू झाला.फाळणीनंतर कराची बंदर पाकिस्तानांमध्ये गेल्यामुळे हे बंदर सन १९५१मध्ये बांधण्यात आले.
मुंबई
मुंबई हे एक नैसर्गिक बंदर असून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये याला महत्त्वाचे स्थान आहे. सुएझ कालवा १८६९ मध्ये बनल्यावर या बंदराला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
जवाहरलाल नेहरू बंदर (मूळ नाव न्हावा शेवा बंदर)
या बंदराचे उद्घाटन सन १९८९ मध्ये झाले. मुंबई बंदरावरील भार कमी करण्यासाठी या न्हावा शेवा बंदराचा विकास करण्यात आला. अत्यंत आधुनिक अशा संगणक प्रणालीद्वारे या बंदारचे काम नियंत्रित केलेले असून हे बंदर लोहमार्गाने व रस्त्यांनी देशाशी जोडलेले आहे.
मडगांव
हे बंदर गोवा राज्यामध्ये झुआरी नदीच्या मुखावर आहे. या बंदरामधून कर्नाटक भागात खाणीतून नघणाऱया कच्च्या लोखंडाची निर्यात होते.
नवीन मंगलोर
हे बंदर कर्नाटक राज्यामध्ये गुरूपूर नदीच्या उत्तरेला आहे. ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७शी जोडलेले आहे.[२]
संदर्भ व नोंदी
- ^ http://www.business-standard.com/india/news/port-blair-declared-as-major-port/97059/on
- ^ indian geography by kullar isbn 81-272-2636-x