Jump to content

भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे

भारताचे प्रशासकीय विभाग, २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेश.

भारत हा अठ्ठावीस राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशांनी बनला आहे. प्रत्येक राज्यास स्वतःचे सरकार आहे. बहितांश केंद्रशासित प्रदेश हे केंद्र सरकारच्या प्रशासनाखाली आहेत.

राजधानी

खालील तक्त्यामध्ये,

  • सरकारी कार्यालय आहे ती प्रशासकीय राजधानी आहे
  • विधानसभा अधिवेशन भरते ती दुसरी राजधानी / अधिवेशनीय राजधानी आहे
  • जेथे उच्च न्यायालय स्थित आहे ती न्यायालीन राजधानी आहे
  • वर्ष हे ते शहर त्या राज्य किंवा प्रदेशाची राजधानी झाल्याचे आहे
  • चौकटीत हि म्हणजे विधान सभेचे उन्हाळी व हिवाळी अधिवेशन दाखवते.

भारतातील सर्व राज्य

क्र.राज्य/प्रदेशप्रशासकीयअधिवेशनीयन्यायालयीनपासूनपूर्व राजधानी
आंध्र प्रदेशअमरावतीहैदराबाद
(आंध्र प्रदेश विधानसभा)
हैदराबाद
(आंध्र प्रदेश उच्च न्यायालय)
१९५६कुर्नुल[]
अरुणाचल प्रदेशइटानगरइटानगर
(अरुणाचल प्रदेश विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९७२
आसामगुवाहाटीदिसपूर
(आसाम विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९७२शिलाँग[] (१८७४-१९७२)
बिहारपाटणापाटणा
(बिहार विधानसभा)
पाटणा
(पाटणा उच्च न्यायालय)
१९३६
छत्तीसगढरायपूररायपूर
(छत्तीसगढ विधानसभा)
बिलासपूर
(छत्तीसगढ उच्च न्यायालय)
२०००
गोवापणजी[]पोरवोरिम
(गोवा विधानसभा)
मुंबई
(मुंबई उच्च न्यायालय)
१९६१
गुजरातगांधीनगरगांधीनगर
(गुजरात विधानसभा)
अहमदाबाद
(गुजरात उच्च न्यायालय)
१९७०अहमदाबाद (१९६०-१९७०)
हरियाणाचंदिगढचंदिगढ
(हरियाणा विधानसभा)
चंदिगढ
(पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय)
१९६६
हिमाचल प्रदेशशिमलाशिमला
(हिमाचल प्रदेश विधानसभा)
शिमला
(हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय)
१९४८
१०तेलंगणाहैदराबादहैदराबाद
(तेलंगणा विधानसभा)
हैदराबाद
(तेलंगणा उच्च न्यायालय)
२०१४
११झारखंडरांचीरांची
(झारखंड विधानसभा)
रांची
(झारखंड उच्च न्यायालय)
२०००
१२कर्नाटकबंगळूरबंगळूर
(कर्नाटक विधानसभा)
बंगळूर
(कर्नाटक उच्च न्यायालय)
१९५६मैसूर
१३केरळतिरुवनंतपुरमतिरुवनंतपुरम
(केरळ विधानसभा)
कोची
(केरळ उच्च न्यायालय)
१९५६कोची[] (१९४९-१९५६)
१४मध्य प्रदेशभोपाळभोपाळ
(मध्य प्रदेश विधानसभा)
जबलपूर
(मध्य प्रदेश उच्च न्यायालय)
१९५६नागपूर[] (१८६१-१९५६)
१५महाराष्ट्रमुंबई[]मुंबई
(महाराष्ट्र विधानसभा)
मुंबई
(मुंबई उच्च न्यायालय)
१९६०
१६मणिपूरइंफाळइंफाळ
(मणिपूर विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९४७
१७मेघालयशिलाँगशिलाँग
(मेघालय विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९७०
१८मिझोरमऐझॉलऐझॉल
(मिझोरम विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९७२
१९नागालँडकोहिमाकोहिमा
(नागालँड विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९६३
२०ओडिशाभुवनेश्वरभुवनेश्वर
(ओडिशा विधानसभा)
कटक
(ओडिशा उच्च न्यायालय)
१९४८कटक (१९३६-१९४८)
२१पंजाबचंदिगढचंदिगढ
(पंजाब विधानसभा)
चंदिगढ
(पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय)
१९६६लाहोर[] (१९३६-१९४७)
शिमला (१९४७-१९६६)
२२राजस्थानजयपूरजयपूर
(राजस्थान विधानसभा)
जोधपूर
(राजस्थान उच्च न्यायालय)
१९४८
२३सिक्कीमगंगटोक[]गंगटोक
(सिक्किम विधानसभा)
गंगटोक
(सिक्कीम उच्च न्यायालय)
१९७५
२४तमिळनाडूचेन्नईचेन्नई
(तमिळनाडू विधानसभा)
चेन्नई
(मद्रास उच्च न्यायालय)
१९५६
२५त्रिपुराआगरताळाआगरताळा
(त्रिपुरा विधानसभा)
आगरताळा
(त्रिपुरा उच्च न्यायालय )
१९५६
२६उत्तर प्रदेशलखनौलखनौ
(उत्तर प्रदेश विधानसभा)
अलाहाबाद
(अलाहाबाद उच्च न्यायालय)
१९३७
२७उत्तराखंडदेहरादून[]देहरादून
(उत्तराखंड विधानसभा)
नैनिताल
(उत्तराखंड उच्च न्यायालाय)
२०००
२८पश्चिम बंगालकोलकाताकोलकाता
(पश्चिम बंगाल विधानसभा)
कोलकाता
(कोलकाता उच्च न्यायालय)
१९०५

केंद्रशासित प्रदेश

क्र.राज्य/प्रदेशप्रशासकीयअधिवेशनीयन्यायालीनपासूनपूर्व राजधानी
अंदमान आणि निकोबारपोर्ट ब्लेरकोलकाता
(कोलकाता उच्च न्यायालय)
१९५६
चंदिगढचंदिगढ[१०]चंदिगढ
(पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय)
१९६६
दादरा व नगर हवेली आणि दमण व दीवदमणमुंबई
(मुंबई उच्च न्यायालय)
२०२०
, ४जम्मू आणि काश्मीरश्रीनगर (उ)
जम्मू (हि)
श्रीनगर (उ)
जम्मू (हि)
(जम्मू आणि काश्मीर विधानसभा)
श्रीनगर (उ)
जम्मू (हि)
(जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय)
२०१९
लक्षद्वीपकवरत्तीकोची
(केरळ उच्च न्यायालय)
१९५६
दिल्लीनवी दिल्लीनवी दिल्ली
(दिल्ली विधानसभा)
नवी दिल्ली
(दिल्ली उच्च न्यायालय)
१९५६
पुडुचेरीपुडुचेरीपुडुचेरी
(पुडुचेरी विधानसभा)
चेन्नई
(मद्रास उच्च न्यायालय)
१९५४
लडाखलेह (उ)
कारगिल (हि)
श्रीनगर (उ)
जम्मू (हि)
(जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय)
२०१९

टिप्पणी

  1. ^ आंध्र प्रदेश हे राज्य आंध्र राष्ट्रम व इतर तेलुगू बोलणारे प्रदेश मिळून बनले आहे. आंध्र राष्ट्रमची राजधानी कुर्नुल होती.
  2. ^ आसामपासून मेघालय वेगळा झाल्यानंतर १९७१ साली शिलॉॅंग हे शहर दोन्ही राज्यांची राजधानी होती.
  3. ^ इ.स. १८४३ सालापासून पणजी हे गोव्याची राजधानी आहे ज्यावेळी ते पोर्तुगालकडे होता.
  4. ^ कोची हे त्रावणकोर-कोचीनची राजधानी होती, जी १९५६ साली नवीन स्थापित केरळ राज्याचा भाग झाली.
  5. ^ १८६१ पासून १९५० पर्यंत नागपूर ही सेंट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी होती. १९५० साली ही मध्य प्रदेश राज्याची राजधानी झाली, १९५६ साली बेरारविदर्भ हे बॉम्बे राज्याचे भाग झाले. नागपूर आता राजधानी शहर न राहल्याने १९६० साली ती महाराष्ट्राची दुसरी राजधानी झाली.
  6. ^ इ.स. १९५० साला पर्यंत मुंबई हे बॉम्बे प्रांताची राजधानी होती. नंतर मुंबई बॉम्बे राज्याची राजधानी झाली. हे बॉम्बे राज्य नंतर इ.स. १९६० सालात गुजरात व महाराष्ट्रात विभाजित झाले.
  7. ^ १९३६ सालापासून १९४७ पर्यंत लाहोर ही पंजाबची राजधानी होती. आता हे शहर पाकिस्तान मध्ये आहे.
  8. ^ इ.स. १८९० सालापासून गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे. इ.स. १९७५ सालामध्ये सिक्कीम भारतात सामील झाले.
  9. ^ देहरादून ही उत्तराखंडची वर्तमान राजधानी आहे. गैरसैण प्रस्तावित राजधानी आहे.
  10. ^ चंदिगढ ही पंजाब व हरियाणा राज्यांची राजधानी आहे व एक केंद्रशासीत प्रदेश आहे.

संदर्भ

  • तॉमस. मल्याळम मनोरमा वर्षपुस्तक २००३ पाने:६४९-७१४. Unknown parameter |आयडी= ignored (सहाय्य)
  • "भारतीय उच्चन्यायलय जागा व हुजूरमामला". ईस्टर्न बुक कंपनी. Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिनादिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य)
  • "आसाम विधान परिषदेचा एक संक्षिप्त ऐतिहासिक आढावा". आसाम विधान परिषद. Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिनादिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य)