भारत माता मंदिर, वाराणसी
भारत माता मंदिर | ||
नाव: | भारत माता मंदिर, वाराणसी | |
---|---|---|
स्थान: | ||
सॄष्टिकर्ता: | बाबू शिवप्रसाद गुप्ता | |
स्थान: | म<nowiki>हात्मा गांधी काशी विश्वविद्यालय, वाराणसी | |
निर्देशांक: | 25°19′02″N 82°59′21″E / 25.317209°N 82.989291°E | |
भारतातील वाराणसी येथे काशी विश्वविद्यालयाच्या प्रांगणात भारत माता मंदिर नावाचे एक देऊळ आहे. पारंपरिक हिंदू देवदेवतांच्या मूर्तीऐवजी ह्या मंदिरात भारत मातेचा मोठा नकाशा लावला आहे.
इतिहास
भारत माता मंदिराचे बांधकाम बाबू शिवप्रसाद गुप्ता यांनी केले आहे व उद्घाटन १९३६ साली महात्मा गांधींंनी केले. मंदिराचे बांधकाम दगडी आहे. भारत माता ही फ़ाळणीपूर्व नकाशाच्या रूपात संगमरवरी दगडाने कोरलेली आहे. हा नकाशा अगदी मापात नकाशा बनवण्याच्या तंत्राचा वापर करून सर्व भौगोलिक घटक त्यांच्या वास्तविक आकाराच्या प्रमाणात दाखवतो. [४]
- मंदिरातील भारत मातेचा नकाशा
- मंदिरातील भारत मातेचा नकाशा
- मंदिरातील भारत मातेचे चित्र
स्थान
भारत मातेचे हे मंदिर महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या आवारात (जुने नाव काशी विश्वविद्यालय) आहे. हे वाराणसी रेल्वे स्थानकापासून दीड किमी अंतरावर, तसेच बनारस हिंदू विद्यापीठापासून ६ किमी अंतरावर आहे.[५]
अन्य मंदिरे
अशा प्रकारची भारतमातेची मंदिरे इंदूर, उज्जैन, औरंगाबाद, कानपूर, झांशी, दांतिया, हरिद्वार आदि गावांत आहेत.
हे सुद्धा पहा
- भारत माता
- हिंदू मंदिरे वाराणसी
संदर्भ
- ^ "Bharat Mata Mandir in Varanasi, Mother India Temple" (इंग्रजी भाषेत). 2012-07-16. 2018-06-19 रोजी पाहिले.
- ^ Planet, Lonely. "Attractions in Varanasi, India". Lonely Planet (इंग्रजी भाषेत). 2017-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-06-19 रोजी पाहिले.
- ^ "Bharat Mata temple stands tall amidst garbage - Times of India". The Times of India. 2018-06-19 रोजी पाहिले.
- ^ "Bharat Mata Mandir in Varanasi, Mother India Temple" (इंग्रजी भाषेत). 2012-07-16. 2018-06-19 रोजी पाहिले.
- ^ "Location". Google Maps. Mar 2015 रोजी पाहिले.
|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)