भारत-पाकिस्तान सीमा
international boundary between India and Pakistan | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | border, land boundary, maritime boundary, international border | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | भारताच्या सीमा, borders of Pakistan | ||
स्थान | भारत, पाकिस्तान | ||
कार्यक्षेत्र भाग | भारत, पाकिस्तान | ||
लांबी |
| ||
| |||
भारत-पाकिस्तान सीमा ही आंतरराष्ट्रीय सीमा आहे जी भारतीय प्रजासत्ताक आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान या राष्ट्रांना विभक्त करते. त्याच्या उत्तरेला नियंत्रण रेषा आहे, जी भारत-प्रशासित काश्मीरला व पाकिस्तान-प्रशासित काश्मीरला वेगळे करते. त्याच्या दक्षिणेला सर क्रीक आहे, हे भारताचे गुजरात राज्य आणि पाकिस्तानी प्रांत सिंध यांच्या दरम्यान कच्छच्या रणमधील भरती-ओहोटीचे खोरे आहे. [१]
सन् १९४७ मध्ये ब्रिटिश भारताच्या फाळणीदरम्यान रॅडक्लिफ रेषेच्या आधारे मूलतः ही सीमा रेखांकीत केलेली आहे जी प्रमुख शहरी भागांपासून ते वाळवंटापर्यंतच्या विविध भूप्रदेशांमधून जाते. [२] दोन देशांच्या स्वातंत्र्यानंतर लगेचच भारत-पाकिस्तान संघर्ष सुरू झाल्यापासून, ही सीमा असंख्य सीमापार लष्करी कार्यवाह्या आणि पूर्ण-प्रमाणावरील युद्धांचे ठिकाण आहे. [२] सीमेची एकूण लांबी ३,३२३ किलोमीटर (२,०६५ मैल) आहे[२] व जगातील सर्वात धोकादायक आंतरराष्ट्रीय सीमांपैकी एक म्हणून ओळखली जाते.[३] रात्रीच्या वेळी, भारताने अंदाजे ५०,००० खांबांवर स्थापित केलेल्या १५०,००० फ्लडलाइट्समुळे भारत-पाकिस्तान सीमा बाह्य अवकाशातून स्पष्टपणे दिसते. [४] [५]
संदर्भ
- ^ Khan, MH (5 March 2006). "Back on track". Dawn News archives. 15 April 2013 रोजी पाहिले.
- ^ a b c PBS Release (26 July 2005). "Border Jumpers The World's Most Complex Borders: Pakistan/India". PBS. 15 April 2013 रोजी पाहिले.
- ^ PHILIP WALKER (24 June 2011). "The World's Most Dangerous Borders". The Foreign Policy. 24 March 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 April 2013 रोजी पाहिले.
- ^ "India-Pakistan Borderlands at Night". India-Pakistan Border at Night. NASA. 23 September 2015. 14 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "Annotated image from NASA".