Jump to content

भाद्रपद पौर्णिमा

भाद्रपद पौर्णिमा ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.


१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

हिंदू संस्कुतीत

हिंदू संस्कृतीनुसार या दिवसाला "प्रौष्ठपदी पौर्णिमा " असे म्हणले जाते.

बौद्ध धर्मात

भाद्रपद पौर्णिमा हा एक बौद्ध सणही आहे. या काळात बौद्ध भिक्खूंचा वर्षावास असतो. आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरुवात झाल्यानंतर धम्माचे चिंतन मनन करून जनजागृती व धम्मजागृतीची शिकवण भिक्खू उपासक-उपासिकांना देत असतात. या पौर्णिमेला बौद्धधर्मीय एकत्र येऊन भिक्खूंद्वारे अष्टशील ग्रहण करून धम्मरसाचे अमृत श्रवण करतात. बौद्ध उपासक आपल्या घरी मिष्टान्न तयार करून हा सण साजरा करतात.

हे सुद्धा पहा

  • बौद्ध सण