भादली
भादली (Panicum pilosum (पॅनिकम पिलोजम)) वरी व सावा यांच्या पॅनिकम या वंशातील ही एक उपयुक्त भरड धान्य आहे. जगात या वंशाच्या एकूण सु. ५०० जाती असून त्यापैकी भारतात फक्त २३ आहेत. अनेक जाती चराऊ गवतांबद्दल व उपयुक्त धान्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. भादली उष्ण कटिबंधातील अनेक देशांत आढळते. भारतात ओरिसा, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व तमिळनाडू येथे आणि आफ्रिकेत पिकविले जाणारे हे एक खरीप गवत आहे. डोंगरावर हलक्या जमिनीत याचे पीक काढतात. हे गवत सु. ०.५ – १ मी. उंच वाढते व याला सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये परिमंजरीवर फुले येतात. याचे लालसर पिंगट दाणे किंवा बी राळ्याप्रमाणे असून ते शिजवून खातात अगर त्यांचे पीठ करून भाकरी करतात. ह्या गवताचा हिरवा चारा पाळीव जनावरांना उपयुक्त आहे.[१][२]
संदर्भ
- ^ "भादली". मराठी विश्वकोश. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "Panicum pilosum Sw" (इंग्रजी भाषेत). ८ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.