भातसा नदी
भातसा नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र |
भातसा नदी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. या नदीचा उगम कसारा घाटात घाटनदेवी, उंटदरी येथे होतो. भातसा नदीला चोरणा नदी, गांवदेवीपाड़या जवळ नवलया ओहळ आवरी नदीभारंगी नदी, सरळांबे गावाजवळ मुरबी नदी,पुढे घोरपडी नदी भुमरी नदी आणि कुंभेरी नदी येऊन मिळतात. त्यांतल्या चोरणा आणि भातसा या नद्यांच्या संगमावर बांधलेल्या धरणाला भातसा धरण म्हणतात. ह्या धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होतो आणि वीज निर्मितीही होते. धरणाची माहिती भातसा या पानावर आहे. पुढे ही नदी आंबिवली येथे काळू नदीला येऊन मिळते.