Jump to content

भाऊसाहेब थोरात

श्री. भाऊसाहेब संतूजी थोरात
जन्म १२ जानेवारी १९२४
जोर्वे,संगमनेर तालुका
मृत्यू १४ मार्च २०१०
तांबे हॉस्पिटल, संगमनेर
मृत्यूचे कारण वृद्धापकालीन प्रदीर्घ आजाराने
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा समाजसेवा, राजकारणी
कारकिर्दीचा काळइ.स. १९४३
प्रसिद्ध कामे संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना, संगमनेर
मूळ गावजोर्वे
ख्याती सहकार महर्षी
राजकीय पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्महिंदू धर्म
जोडीदार सौ. मथुराबाई थोरात
अपत्ये बाळासाहेब थोरात, अंजली तांबे
वडील संतुजी


भाऊसाहेब संतूजी थोरात हे स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्रसैनिकाचे काम केले. संगमनेर तालुक्यातील शेती व औद्योगिक प्रगती करण्यासाठी व शेतकऱ्यांना त्यांचे न्याय पाणी हक्क मिळवुन् देण्यासाठी संघर्ष केला. त्यांनी अमृत उद्योग समूह व संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना स्थापन केला व भरभराटीस नेला.

जन्म

त्यांचा जन्म १२ जानेवारी इ.स. १९२४ला जन्म जोर्वे तत्कालीन मुंबई प्रांत ब्रिटिश भारत येथे शेतकरी कुटुंबात झाला.

प्राथमिक शिक्षण

जोर्वे येथे जीवन शिक्षण मंदिर बेलापूर येथे दुस-या इयत्तेत दाखल. सहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण वडगाव पान येथे सातवी, उदोजी मराठा वस्तीगृह नाशिक येथे प्रवेश, त्याच संस्थेच्या मराठा माध्य. विद्यालयात झाले.

जीवन कार्य

अ.नं.वर्षजीवन कार्य
इ.स. १९४२पेटीट विद्यालय, संगमनेर येथे इंग्रजी पाचवीत प्रवेश, चले जाव चळवळीत सक्रीय सहभाग
इ.स. १९४३]]सशस्त्र लढयात सहभाग स्वातंत्र्यलढयात तुरुंगवास - अहमदनगर सबजेलमध्ये 15 दिवस, नंतर नाशिक सेंट्रल जेलमध्ये रवानगी
इ.स. १९४४तुरुंगातून सुटका
इ.स. १९४४कामगार युनियनचे सेक्रेटरी म्हणून निवड
इ.स. १९४५कौटुंबिक परिस्थितीमुळे शेती केली.
इ.स. १९४५प्लेग रोग्यांसाठी कॅंप (क्वारंटाईन) मध्ये सवयंसेवक म्हणून रुग्ण सेवा
इ.स. १९४५अहमदनगर जिल्हयात किसान सभेच्या स्थापनेत सक्रीय सहभाग
इ.स. १९४५शेतक-यांच्या प्रश्नावर किसान सभेच्या वतीने वरुडी परिष्द घेतली
इ.स. १९४५कॅनॉल खालील शेतक-यांच्या प्रश्नावर परिषदेचे आयोजन.
१०इ.स. १९४७मुंबर्इ्र राज्याच्या विधानसभा निवडणूकीत अकोले तालुक्यातील शेतक-यांची परिषद राजूर येथे घेतली.
११इ.स. १९४७स्वातंत्र्याच्या जल्लोषात सामील.
१२इ.स. १९४७कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचे शिबीर जोर्वे येथे घेतले.
१३इ.स. १९४७गुहा येथील कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र प्रांतिकच्या कार्यकर्ता शिबीरात सक्रीय सहभाग.
१४इ.स. १९४८कलकत्ता येथे कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनात सहभाग.
१५इ.स. १९५०संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे शेतकरी परिषदेचे आयोजन
१६इ.स. १९५०शेवगाव, पाथर्डी तालुकयांत कम्युनिस्ट पक्षाचा संघटक म्हणून नेमणूक.
१७इ.स. १९५१खिरविरे येथील सावकारकीचे कागदपत्र जाळल्याच्या आरोपावरून नंबर एकचा आरोपी म्हणुन खटला व अटक.
१८इ.स. १९५१15 दिवस कोठडी, अहतदनगर सबजेलमध्ये रवानगी. सहा महिन्यांचा काळ तुरुंगात.
१९इ.स. १९५३जोर्वे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेरमन म्हणुन निवड
२०इ.स. १९५६संगमनेर तालुका सहकारी सुपरवायझिंग युनियनचे अध्यक्ष
२१इ.स. १९५७अहमदनगर जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य म्हणून निवड.
२२इ.स. १९५९संगमनेर शेतकी सहकारी संघाची स्थापना व संघाचे चेरमन म्हणून निवड.
२३इ.स. १९५९संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना Archived 2018-08-05 at the Wayback Machine. काढण्यासाठी तालुका सुपरवायझिंग युनियनने शेतक-यांची सभा बोलविली. कारखान्याचे भागभांडवल उभारण्याचा निर्णय.
२४इ.स. १९६०अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून निवड.
२५इ.स. १९६०जून इ.स. १९६० मध्ये जोर्वे येथे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेमार्फत समाज विद्यामंदिर या माध्यमिक विद्यालयाची सुरुवात.
२६इ.स. १९६१अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये व्यक्तिगत सभासदत्वाच्या प्रश्नावर संघर्ष.
२७इ.स. १९६३१४ जानेवारी इ.स. १९६२ रोजी संगमनेर येथील नेहरु चौकात यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेमध्ये काँग्रेस पक्षाला पाठिंबा.
२८इ.स. १९६५अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेरमन म्हणून पहिल्यांदा निवड. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही निवड.
२९इ.स. १९६६संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्यास ८०० मे.टन गाळप क्षमतेची जुनी यंत्रसामुग्री घेण्याच्या अटीवर परवाना मिळाला.
३०इ.स. १९६६संगमनेर येथे सहयाद्रि बहुजन विद्या प्रसारक समाज या शैक्षणिक सेस्थेची स्थापना व सहयाद्रि विद्यालय सुरू.
३१इ.स. १९६७संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीस प्रारंभ.
३२इ.स. १९६८दि.२४ मार्च इ.स. १९६० रोजी संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगाम यशवंतराव चव्हाण यांचे शुभहस्ते सुरू.
३३इ.स. १९७०संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्यास १२५० मे.टन गाळप क्षमतेचे नवीन यंत्रसामुग्रीसाठी परवाना मिळावा म्हणून मागणी.
३४इ.स. १९७२भीषण दुष्काळाशी मुकाबला.
३५इ.स. १९७२संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्यासाठी १२५० मे.टन गाळप क्षमतेच नवीन यंत्रसामुग्रीची मागणी नोंदवली.
३६इ.स. १९७४१२५० मे.टन गाळप क्षमतेच नवीन यंत्रसामुग्री येण्यास प्रारंभ. (दि. 7 एप्रिल इ.स. १९७४)
३७इ.स. १९७६१२५० मे.टन गाळप क्षमतेच्या नवीन साखर कारखान्याचा शुभारंभ मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे शुभहस्ते संपन्न.
३८इ.स. १९७७कर्जाचा व्याजदर कमी करावा या मागणीसाठी भारतीय रिजर्व बँकेवर मोर्चा. ५००० शेतकरी मोर्चात सामील तत्कालीन मुख्यमंत्री पद्मभुषण वसंतदादा पाटील यांनी स्वतः आमदार निवासापुढे मोर्चाचे स्वागत करून मोर्चास शुभेच्छा दिल्या आणि नंतर मोर्चा रिझर्व बँकेवर नेण्यात आला.
३९इ.स. १९७७संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्यात विकास कक्षाची निर्मीती.
४०इ.स. १९७८संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून ११११ मतांनी विजयी.
४१इ.स. १९७८संगमनेर तालुक्यातील शेतक-यांची मीटर हटाव मोहिम. ॲड. अप्पासाहेब सुर्वे व इतर कार्यकर्त्यांनी ५००० मीटर काढून आणले व मिरवणुकीने वीज मंडळाच्या कार्यालयात जमा केले.
४२इ.स. १९७८युनिटऐवजी अश्वशक्तीनुसार वीज दर आकारणीची मागणी मान्य. प्रति अश्वशक्ती १७० रुपये असा दर निश्चित झाला. महाराष्ट्रातील शेतक-यांच्या हिताचा ऐतिहासिक निर्णय.
४३इ.स. १९७८डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या सहकार्याने संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना. तालुक्यात गावोगावी सहकारी दूध संकलन केंद्रे सुरू.
४४इ.स. १९७८निळवंडे धरणाच्या मंजुरीची घोषणा. धरणचा उजवा कालवा काढण्याचा निर्णय. खांडगाव येथे शेतकरी मेळावा. मुख्यमंत्री शरदराव पवार यांचेहस्ते उजव्या कालव्यावे भूमिपुजन.
४५इ.स. १९७९अहमदनगर येथे शेतक-यांची परिषद दुष्काळपीडीत थकबाकीदार शेतक-यांना कर्जमुक्तीसाठी शासनाने अनुदान द्यावे म्हणुन मागणी.
४६इ.स. १९८०महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत अध्यक्षपदी फेरनिवड.
४७इ.स. १९८३संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचा पूरक उद्योग म्हणून बगॅसवर आधारित कागद कारखाना उभारण्याचा निर्णय.
४८इ.स. १९८३अमृतवाहिनी रुरल हॉस्पीटलची निर्मिती.अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेमार्फत अमृतवाहिनी इंजिनीअरींग कॉलेज, अमृतवाहिनी पॉलिटेक्निकल कॉलेज व औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू.
४९इ.स. १९८४भारतीय औद्योगिक वित्तीय महामंडळ नवी दिल्ली या वित्त संस्थेवर संचालक म्हणुन निवड.संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचा पूरक उद्योग म्हणून आसवनी प्रकल्प काढण्याचा निर्णय.
५०इ.स. १९८६बगॅसवर आधारित कागद कारखाना सुरू.
५१इ.स. १९८७संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याची देनिक गाळप क्षमता 2000 मे. टनांवरून 3500 मे.टनांपर्यंत वाढविण्यासाठी विस्तारीकरणाचा निर्णय.
५२इ.स. १९८८विस्तारीत कारखान्याची उभारणी पूर्ण करून कारखाना सुरू केला.
५३इ.स. १९८९भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या फेरवाटपाचा प्रश्न यशस्वीपणे सोडविला. संगमनेर-अकोले तालुक्यासाठी 30 टक्के पाण्याचा हक्क मिळविला.
५४इ.स. १९८९दि बगॅस बेड्स पेपर मिल्स असोसिएशनची स्थापना व अध्यक्षपदी निवड.
५५इ.स. १९९१संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर उभ्या केलेल्या पूरक उद्योगांसाठी मोठया प्रमाणावर लागणा-या विजेची गरज भागविण्यासाठी अपारंपारिक उर्जा निर्मिती प्रकल्पांतर्गत सौरशक्तीपासून विद्युतनिर्मितीकरिता प्रकल्प आराखडा तयार केला.
५६इ.स. १९९१राज्यस्तरीय उर्जा परिषदेचे नाशिक येथे आयोजन.
५७इ.स. १९९५अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष.
५८इ.स. २०१०१४ मार्च इ.स. २०१० निधन.