भांडुप रेल्वे स्थानक
भांडुप हे मुंबईचे उपनगर आहे. मुंबईच्या बऱ्याचशा उपनगरांप्रमाणे भांडुपचे दोन मुख्य भाग आहेत - भांडुप पूर्व आणि भांडुप पश्चिम. ही नावे लोहमार्गापासूनच्या दिशेप्रमाणे ठेवण्यात आली आहेत. पश्चिम भांडुपमध्ये अनेक कारखाने व उद्योग आहेत तर पूर्व भागात नागरी वस्ती आहे. भांडुपमध्ये समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनविण्याची मिठागरे अनेक दशकांपासून आहेत. अजूनही यातील काही मिठागरे येथे आहेत. भांडुप हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.
भांडुप | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: कांजुर मार्ग | मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: नाहूर | |
स्थानक क्रमांक: १६ | मुंबई छशिमटपासूनचे अंतर: २८ कि.मी. |