भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ
भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ - १५७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, भांडुप पश्चिम मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. २३८४ मधील इन्युमरेशन ब्लॉक ११९ ते १२३ आणि जनगणना वॉर्ड क्र. २३८५ मधील इन्युमरेशन ब्लॉक १०८ ते ११०, १७० ते ५२२, ६४० ते ६८७, ६९० आणि ७०० ते ७२८ यांचा समावेश होतो. भांडुप पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेनेचे रमेश गजानन कोरगावकर हे भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | रमेश गजानन कोरगावकर | शिवसेना | |
२०१४ | अशोक पाटील | शिवसेना | |
२००९ | शिशिर शिंदे | महाराष्ट्र नवनिर्माण सेना |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
भांडुप पश्चिम | ||
उमेदवार | पक्ष | मत |
शिशिर शिंदे | मनसे | ६८३०२ |
शिवाजीराव विष्णू नलावडे | राष्ट्रवादी | ३७३५९ |
सुनील राजाराम राउत | शिवसेना | ३४४६७ |
सुजित पगारे | बसपा | ३०३० |
सुजय गोपाळ धुराट | अपक्ष | १९०२ |
रमेश हरशी छेडा | अपक्ष | १४४१ |
चंद्रशेखर मारुती कांबळे | अपक्ष | ९९० |
सत्यजीत गुरूदीन तथा राजू पाल | अपक्ष | ४८५ |
वामन भोनाजी झरे | अपक्ष | ४५९ |
दीपक माणिकराव काळे | अपक्ष | ३४२ |
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".