Jump to content

भव्य करमळ

Dillenia pentaphylla fruit( डिलयना पेन्टाफायला)Family-Dilleniaceae (डिलेनिएसी)

हा एक पानगळीचा वृक्ष आहे. हा साधारणपणे १० मी . उंचीपर्यंत वाढणारा वृक्ष आहे. महाराष्ट्रातील सर्व वनांमध्ये आढळतो .

इंग्रजी नाव

Elephant Apple (एलिफन्ट ॲप्पल)

माहिती

खोड- खोडाचा रंग फिकट तपकिरी असतो . खोडाची आतली साल पांढऱ्या रंगाची असुन त्यावर हिरवे किंवा काळे ठिपके अथवा पट्टे असतात

पाने -पाने लक्षवेधक असतात . फांदयाच्या टोकाशी झुबक्यांनी येतात. पानांची लांबी ३० ते ६० सेमी व रुदी१५तेेे ३० सेमी असते. पानांची कड करवतीसारखी दातेरी असते . पानांच्या उपशिरा संमातर असतात. मार्च किंवा एप्रिल महिन्यात पानगळ होते

फुले - पिवळ्या रंगाची , पाच पाकळ्यांची २० मि.मि. रुंदीची असतात .एप्रिल- मे महिन्यात येतात व त्यांना मंद सुंगध असतो .

फळे - मे- जून महिन्यात येतात . फळे पिवळ्या रंगाची आंबट चवीची असतात. फळे साधारणपणे रायआवळयाएवढी असतात.

उपयोग -खोडापासून कोळसा बनवतात तर पानांचा वापर पत्रावळ तयार करण्यासाठी व हिरवे खत तयार करण्यासाठी होतो .

या वृक्षाचे संस्कृत नाव आहे 'भव्य'. याच्या फळाच्या आकारामुळे त्याला इंग्रजीत एलिफन्ट ॲपल असे नाव पडले असावे. डिलेनिअेसी या कुळातील. डिलेनिआ इंडिका हा वृक्ष मुलाचा मलेशिया, इंडोनेशियाचा. या सदाहरित वृक्षांची वाढ ६० फुटांपर्यंत होते. पणे मोठी, लांब व जाडसर, ठळक मोठ्या शिरा असणारी असतात. फुल पांढरे, साधारण मोठ्या गुलाबाच्या फुलाच्या आकाराचे सुगंधी असते. फुलांमध्ये मध असल्यामुळे सतत त्यावर मधमाशा रुंजी घालत असतात. जून-जुलैच्या आसपास हा वृक्ष फुललेला दिसतो. फुल उंचावर व फांद्याच्या आतील बाजूला असल्यामुळे व मोठ्या पानांमुळे झाकले जात असल्यामुळे शोधण्यास वेळ लागतो. याची फळे ताडाच्या फळासारखी मोठी व आकारालाही तशीच असतात. फळे हिरवट असतात. कच्ची फळे चटणीलोणचे बनवण्यासाठी वापरतात. पिकलेल्या फळांपासून मिळणारा रस हा सरबतासाठी वापरला जातो. मलेशियामध्ये याच्या फळांची भाजी व जाम बनवतात. फळांचा गर केस धुण्यासाठीही वापरला जातो. याच्या फळांचा व खोडाच्या सालाचा औषधी उपयोगही होतो. पोटातील वेदनांवर याचा उपयोग होतो. खोड व पानांपासून टॅनिन मिळते. भारतात हा वृक्ष हिमालयाच्या उतारावर, गाढवाल, आसाम, बंगाल, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व दक्षिणेकडे तामिळनाडू, केरळमध्ये आढळतो.

संदर्भ

वृक्षराजी मुंबईची डॉ.मुग्धा कर्णिक