Jump to content

भविष्य निर्वाह निधी




भारतात 'भविष्य निर्वाह निधी' हा कर्मचाऱ्यांसाठी असलेला एक प्रकारचा 'निवृत्ती निधी' आहे. 'निवृत्तीनंतरचे आयुष्यात गुजराण करण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचा खात्रीलायक स्रोत असावा' हा या किंवा अशाप्रकारच्या योजनांमागचा हेतू असतो. नोकरीत प्रवेश करतेवेळी कोणती भविष्य निर्वाह निधी योजना निवडायची याचे काही ठिकाणी स्वातंत्र्य आहे.

प्रकार

यात दोन प्रकार आहेत:

  • ज्यात कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अथवा राजिनाम्यानंतर ती संस्था अथवा कार्यालय सोडतेवेळी देण्यात येणाऱ्या एकमुश्त रकमेचा समावेश असतो.
  • निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यास एकमुश्त रक्कम व नंतर दरमहा निवृत्तीवेतन देण्यात येते.

खाजगी तसेच शासकीय अथवा निम-शासकीय कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधीसाठी वेगवेगळे नियम असतात.

भविष्य निर्वाह निधी योजना

ही किंवा अशा प्रकारची योजना भारतात सहसा केंद्र अथवा राज्याच्या शासकीय संस्था अथवा कार्यालयात राबविण्यात येते. यात सरकार आवश्यक तो ठरलेला निधी कर्मचाऱ्याचे भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करते.

अंशदायी भविष्य निर्वाह निधी योजना

यात काही संस्थांमध्ये कर्मचाऱ्यास, ती संस्था करीत असलेल्या योगदानाइतकेच भविष्य निर्वाह निधीमध्ये मासिक योगदान करावे लागते. अशा योजनांना 'अंशदायी भविष्य निर्वाह निधी'(Contributory Provident fund) असे म्हणतात.सहसा, अशी योजना ही निम-शासकीय संस्थांमध्ये राबविण्यात येते व कर्मचाऱ्यांना याव्यतिरिक्त 'उपदान'ही (gratuity) देण्यात येते.

खाते नोंदी

या किंवा अशा प्रकारच्या सर्व योजनांमध्ये कर्मचाऱ्याचे खाते तयार करणे, त्यात नोंदी ठेवणे, दरवर्षी कर्मचाऱ्यास अद्ययावत् माहिती देणे आदी त्या संस्थेस बंधनकारक करण्यात आले आहे.

उचल

कर्मचारी हा नोकरीत असतांना भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा असणाऱ्या रकमेचा काही भाग काही विशिष्ट कारणांसाठी उचल म्हणून घेऊ शकतो व त्याची परतफेड करू शकतो. अपत्यांचे लग्न अथवा घरबांधणी आदींसाठी जमा रकमेच्या ठराविक प्रमाणात अशी उचल करता येते.यातील उचल ही दोन प्रकारे असू शकते: परतफेड करण्याजोगी व न-परतफेड करण्याजोगी.

अतिरिक्त कपात

साधारणतः, अंशदायी भविष्य निर्वाह निधी योजनेत कोणताही कर्मचारी हा आपल्या भविष्याची अतिरिक्त आर्थिक तरतूद म्हणून, जास्तीचे वाढीव अंशदान पूर्वपरवानगीने जमा करू शकतो.या रकमेवर, अंशदायी भविष्य निर्वाह निधी योजनामार्फत जमा रकमेवर त्यास देण्यात येणारे व्याज मिळते पण, संस्थेच्या अंशदानाचा भाग म्हणून ती संस्था आपले योगदान यात जमा करीत नाही.निवृत्तीचे वेळेस हा निधी त्यास देण्यात येतो.