Jump to content

भवानी मंडप

भवानी मंडप भवानी मंडप हे एक कोल्हपूरची प्रतिष्टा आहे. ह्याच्यामध्ये असलेल्या भव्य व जुन्या इमारती इतिहासाच प्रतिक आहेत. ज्यावेळी कोल्हापूर शासकीय यंत्रणेत आले त्यावेळी ह्या वास्तुची बांधणी करण्यात आली.14 चौरसांमध्ये याच्या आवाजांची बांधणी करण्यात आली आहे. 1813 मध्ये सर सदाखान यांनी वास्तु विस्ताराच्या हेतुने त्यातील काही भागाची बांधणी केली. दुरुस्ती केलेनंतर, 7 भुज्या अस्तित्वात राहील्या. ह्याच्या मध्यामध्ये कोल्हपूरची कुलस्वामिनी तुळजा भवानीचे मंदिर आहे. इतिहास सांगतो की, शंभू ज्यांचे टोपननाव आबासाहेब महाराज ह्या वास्तुमध्ये मरण पावले.येथेच शाहुमहाराज स्मारक ऊभारण्यात आले आहे. आणि आठवण म्हणून स्मारका मध्ये शाहुमहाराजांनी शिकार केलेले वाघ व बैल ठेवले आहेत.त्यांच्या थडग्याच्या ऊजव्या बाजूला रंगीत मासे व छोट शिव मंदिर आहे जे एक इतिहासकालीन मुर्तीमंत आहे! मंदिराच्या विरुद्ध दिशेला रूबाबदार महल आहे ज्याची स्थापना 1918 मध्ये झाली जेंव्हा श्रीमंत आक्कासाहेब महाराज यांचे नातु शाहु महाराज यांचे लग्न झाले. त्याच्यानंतर 1926-30 मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांनी एक वेगळ वळण दिले. त्याच्यामध्ये त्यांनी लाकडाच्या कमानी, हॉलची ऊंची तसेच त्याची वाढ केली.कुंपनांच्या भिंतींमध्ये मंडप, राजवाडा पोलीस स्टेशन, महाराष्ट्र पलटण यांचे आकर्षित प्रवेश दाराचे काम केले.