Jump to content

भलान

भलान ही ऋग्वेदामध्ये उल्लेखलेल्या दाशराज युद्धात भाग घेणाऱ्या दहा जमातींपैकी एक जमात आहे.

महाभारत युद्धाच्या सुमारे अडीच हजार वर्षे आधी दाशराज युद्ध झाले होते. या युद्धाचे वर्णन ऋग्वेदाच्या सातव्या मंडलात आहे. हे युद्ध तृत्सु राजा सुदास याचा गट आणि पुरु, यदु, तुर्वश, अनु, द्रुह्मु, अलिन, पक्थ, भलान, शिव आणि विषाणिन या दहा जमातींचे गट यांच्यात झाले. या युद्धाच्या वर्णनावरून आर्यांच्या किती जमाती होत्या आणि त्यांची सत्ता कुठपर्यंत होती ते समजते. इतिहासकारांच्या मते हे युद्ध सध्याच्या पाकिस्तानातील परुष्णी नदी (रावी नदी)च्या किनारी झाले होते.

काही इतिहासकारांच्या मते भलान जमातीचे राज्य, बोलन घाट प्रदेशात होते. भलान हे समुदायाचे नाव आहे; या समुदायाचा राजा कोण होता, ते नाव मात्र अजूनही अज्ञात आहे.