भरलेली ढोबळी मिरची
स्टफड् कॅप्सिकम किंवा भरलेली मिरची हा खाद्यपदार्थ आहे.
साहित्य
४ मोठ्या ढोबळ्या मिरच्या, १ मध्यम आकाराचा बटाटा, ५ टेबलस्पून तेल, १ टीस्पून किसलेले आले, १/२ टीस्पून किसलेला लसूण, १/२ कप कांदा पेस्ट करून, १/४ कप गाजर पेस्ट करून, १/२ कप मोडाचे मूग, १/४ कप फरसबी पेस्ट करून, १/२ टीस्पून मिरपूड, १ टीस्पून सोया सॉस, चिमूटभर अजिनोमोट, मीठ चवीनुसार.
कृती
मिरची आडवी मध्यभागी चिरून बिया काढून टाका. आवरणाला धक्का लावू नका. मिरची चांगली धुऊन बाहेरच्या भागाला मीठ लावून ठेवा. बटाटा उकडून साल काढून कुस्करून घ्या. त्यात मीठ घालून बाजूला ठेवा. २ टेबल स्पून तेल गरम करून त्यात आल, लसून, कांदा, गाजर, मुग, फरसबी, अजिनोमोटो, मिरपूड व मीठ घालून मोठ्या आचेवर ३ मिनिटे परता, त्यात सोया सोस, बटाटा घालून चांगल मिसळा. मिश्रण थंड होऊ द्या. त्याचे ८ समान भाग करा. प्रत्येक भाग एकेका मिरचीच्या भागात भरून घ्या. उरलेले तेल गरम करून त्यावर या मिरच्या ठेवा. झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा. दोन्ही बाजू शिजवझाल्या की सजवून वाढा.