Jump to content

भरताचे नाट्यशास्त्र

ख्रिस्तपूर्व काळात भारतात भरत नावाचे मुनी होऊन गेले. त्यांनी नाट्यकलेवर एक ३६ अध्यायी ग्रंथ लिहिला. तोच ग्रंथ भरताचे नाट्यशास्त्र म्हणून प्रसिद्ध आहे.

अशी आख्यायिका आहे की देवतांनी ब्रम्हदेवास सर्वसामान्यांस कळतील असे वेद निर्माण करण्यास सांगितले. त्यावर, ब्रह्मदेवाने 'नाट्यवेद' नावाचा पाचवा वेद निर्माण केला. त्यात ऋग्वेदातील पाठ्य, यजुर्वेदातील अभिनय, सामवेदातील गायन आणि अथर्ववेदातील रस घेण्यात आले. नाट्यवेदाच्या निर्मितीनंतर ब्रह्मदेवाने भरतमुनींना त्याचा पृथ्वीवर प्रसार करण्यास सांगितले. शिवाने भरतमुनीचे नाट्य बघून, आपला शिष्य तंडू यास भरत मुनीस नृत्याचे अधिकृत सिद्धान्त कथन करण्यास पाठविले. या सिद्धान्तांचा समावेश त्याने ’तांडव लक्षण’ या सदरात केला आहे. भरत मुनींनी शरीराच्या १० मुद्रांचा, मानेच्या व हातांच्या ३६ तर डोक्याच्या १३ मुद्रांचा त्यात समावेश केला आहे. नृत्यातील वेगवेगळ्या शाखांनी या मूळ सिद्द्धान्तांचा वापर करून व त्यांस फुलवुन, त्यांची, कंठ व वाद्य संगीताशी एकतानता करून, त्याचा एखाद्या कथेच्या/कथानकाच्या सादरीकरणासाठी विस्तृतपणे वापर केला.

नाट्याची व्याख्या

"लोक- वृत्त-अनुकरणं नाट्यम" "नाटय म्हणजे अनुकरण" संदर्भ:- १.भरताचे नाट्यशास्त्र (इसवी सन पूर्व ५०० ते इसवी सन ३००)

अमरकोष(पाचवे शतक):- "तौर्य त्रिकं नृत्य- गीत - वाद्यं नाट्यम"

संदर्भ:- "श्रीमदभरतमुनिप्रणीतम नाट्यशास्त्रम"- (सं) मधुसूदन शास्त्री भाग-१ ,पृष्ठ.१८.