Jump to content

भद्राद्री कोठगुडम जिल्हा

भद्राद्री कोठगुडम जिल्हा
భద్రాద్రి కొత్తగూడెం జిల్లా (तेलुगु)లా
तेलंगणा राज्यातील जिल्हा
भद्राद्री कोठगुडम जिल्हा चे स्थान
भद्राद्री कोठगुडम जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यतेलंगणा
मुख्यालयकोठगुडम
मंडळ२३
क्षेत्रफळ
 - एकूण ७,४८३ चौरस किमी (२,८८९ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १०,८०,८५८ (२०११)
-लोकसंख्या घनता१४४ प्रति चौरस किमी (३७० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ३१.७१%
-साक्षरता दर६६.४०%
-लिंग गुणोत्तर१००८ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघखम्मम लोकसभा मतदारसंघ
संकेतस्थळ


भद्राद्री कोठगुडम हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१६ साली खम्मम जिल्ह्याचे विभाजन करून ह्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. भद्राद्री कोठगुडम जिल्हा तेलगंणाच्या पूर्व भागात आंध्र प्रदेशछत्तीसगढ राज्यांच्या सीमेजवळ स्थित आहे. गोदावरी ही भद्राद्री कोठगुडम जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी आहे.

२०११ साली भद्राद्री कोठगुडम जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १०.६९ लाख इतकी होती. क्षेत्रफळाच्या दृष्टीने, भद्राद्री कोठगुडम हा तेलंगणा राज्यातील ७,४८३ किमी २ (२,८८९ चौरस मैल) क्षेत्रफळ असलेला सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या उत्तरेला आणि ईशान्येला छत्तीसगढ राज्यातील बीजापुर आणि सुकमा जिल्हा, पूर्वेला पूर्व गोदावरी जिल्हा, दक्षिणेला खम्मम जिल्हा आणि पश्चिम गोदावरी जिल्हा, पश्चिमेला महबूबाबाद जिल्हा आणि वायव्येला मुलुगु जिल्हा आहे.

जिल्हा जिल्ह्यात २३ मंडळे आणि कोथागुडेम आणि भद्राचलम या दोन महसूल विभागांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग ३० हा येथील प्रमुख महामार्ग आहे. भद्राचलम हे एक पवित्र हिंदू स्थान ह्याच जिल्ह्यामध्ये आहे.

प्रमुख शहरे

भूगोल

भद्राद्री कोठगुडम जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७,४८३ चौरस किलोमीटर (२,८८९चौरस मैल) आहे.

लोकसंख्या

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या भद्राद्री कोठगुडम जिल्ह्याची लोकसंख्या १०,८०,८५८ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे १००८ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६६.४% आहे. एकूण लोकसंख्येच्या ३१.७१% शहरी भागात राहतात.

मंडळ (तहसील)

खालील तक्त्यामध्ये जिल्ह्यातील २३ मंडळांचे त्यांच्या संबंधित महसूल विभागांमध्ये वर्गीकरण केले आहे:

क्रममंडळगाव
अल्लापल्ली १२
अन्नपुरेड्डीपल्ली १०
मनुगुरू १४
अस्वराओपेता ३०
मुलाकलपल्ली २०
अस्वपुरम २४
पिनापाका २३
भद्राचलम
पालवांचा ३६
१० बुर्गमपहाड १७
११ सुजातानगर २०
१२ चेर्ला २६
१३ तेकुलापल्ली ३६
१४ चंद्रगोंडा १४
१५ येलांडू २९
१६ चुंचुपल्ली १८
१७ डम्मापेटा ३१
१८ दुम्मुगुडेम ३७
१९ गुंडाळा ११
२० जुलुरपद २४
२१ कराकागुडेम १६
२२ कोठागुडेम
२३ लक्ष्मीदेवीपल्ली ३१

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे


संदर्भ